देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही सैन्य दलाच्या जवानांनी ऑपरेशन सिंदूर मोहीम फत्ते करून पाकिस्तानातील अतिरेक्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले या घटनेचा बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने आनंदोत्सव साजरा
बेलापूर( प्रतिनिधी)-- देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही सैन्य दलाच्या जवानांनी ऑपरेशन सिंदूर मोहीम फत्ते करून पाकिस्तानातील अतिरेक्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले या घटनेचा बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्याचबरोबर पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात जे 15 निष्पाप नागरिक मारले गेले त्या नागरिकांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पहेलगाम हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेला शब्द दिला होता की यातील एकालाही माफ केले जाणार नाही त्या पद्धतीने तिनही सैन्य दलाच्या मदतीने अतिरेकी प्रशिक्षण देणारे 9 केंद्र उध्वस्त करण्यात आले या घटनेचा बेलापूर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याचबरोबर अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी देशातील निष्पाप नागरिकांवर व लहान मुलावर गोळीबार केला त्यात पंधरा नागरिक मरण पावले व एक जवान शहीद झाला. त्यांनाही बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विष्णुपंत डावरे, हाजी इस्माईल शेख, प्रफुल्ल डावरे, संजय भोंडगे,विलास मेहत्रे, रवींद्र खटोड, प्रशांत लड्डा, गोपी दाणी आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुवालाल लुक्कंड,शांतीलाल हिरण ,बाळासाहेब दाणी,अशोक प्रधान, सतीश सोनवणे ,रत्नेश गुलदगड, डॉक्टर रवींद्र गंगवाल, भास्कर बंगाळ, बाबुलाल पठाण, राजेंद्र राशिनकर ,विजय कटारिया,रामनाथ शिंदे ,प्रवीण बाठीया, औदुंबर राऊत,मधुकर अवचिते, ज्ञानेश्वर कुलथे इस्माईल आतार दिलीप दायमा संजय शिंदे सतिश सोनवणे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास देसाई यांनी केले तर विष्णुपंत डावरे यांनी आभार मानले
Post a Comment