Latest Post

बेलापूरःमहिलांमध्ये उपजत गुणवत्ता व कौशल्य असते.ते विकसित होण्यासाठी सामाजिक प्रेरणेची गरज आहे.महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन पातळीवरुन विविध योजनांव्दारे प्रयत्न केले जातात.महिलांनी या योजनांचा लाभ घेवून आत्मनिर्भर बनावे.महिला बचत गटाच्या महिलांनी विविध उद्योग व व्यवसाय सुरु करावेत त्यासाठी महिलांना जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाईल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी आध्यक्ष सौ.शालिनीताई पा.विखे यांनी केले.                                   

बेलापूर बुll ग्रामपंचायत आयोजित नविन घरकुल वसाहतीचे राधाकृष्णनगर व सुजयनगर नामकरण,महिला बचत गटांना फुड प्रोसेसिंग युनिट,दिव्यांगांना बॕटरी सायकल तसेच जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना टॕबचे वाटप कार्यक्रमप्रसंगी सौ.विखे पा. बोलत होत्या.अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले होते.                                                                     सौ.विखे म्हणाल्या की,विखे परिवार हा राजकारणी नसून समाजकारणी आहे.मिळालेल्या पदाचा वापर सर्वसामान्यांच्या हितासाठी केला पाहिजे.बेलापूर ग्रामपंचायत नेहमीच महिलांच्या विकासाला प्राधान्य व प्रेरणा देते हे कौतुकास्पद आहे.नाम.राधाकृष्ण विखे यांना मंञी म्हणून जेवढी  खाती मिळाली त्या माध्यमातून त्यांनी जनतेचे प्रश्न सोडविले.महिला बचत गटांना विविध साहित्य वितरित केले जात आहे.त्याचा वापर व्यवसायासाठी करावा.यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण व सहकार्य केले जाईल असे आश्वासन सौ.विखे यांनी दिले.                                                                                     अध्यक्षपदावरुन बोलताना शरद नवले म्हणाले की,नाम.राधाकृष्ण विखे  यांचेसह विखे परिवाराचे बेलापूरच्या विकासात मोठे योगदान आहे.तालुक्यात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे ती विखे परिवाराने भरुन काढावी.नजिकच्या काळातील स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत शतप्रतिशत भाजपचे नाम.विखे पा.यांचे स्वप्न पूर्ण करु.नाम.विखे यांनी खंडकरी व आकारी पड शेतक-यांचा प्रश्न मार्गी लावला.वर्ग २च्या जमिनी विनामोबदला वर् १ केल्या.तालुक्यातील १४ गावांना गावठाण,घरकुले यासाठी मोफात जमिनी दिल्या.माजी महसूलमंञी श्री.थोरात यांनी एक गुंठाही जागा दिली नाही.त्यासाठी नाम.विखेंसारखी दानत लागते.भविष्यात नदी संवर्धन योजनेतून घाट विकास,जाॕगिंग ट्रॕक,जलतरण सुविधा विकसित करायची आहे.तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे  स्मारक निर्माण करायचे आहे.त्यासाठी निधी उपलब्ध करणेबाबत पालकमंञी नाम.श्री.विखे पा. व सौ.शालिनीताई विखे पा.यांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.                                           बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे म्हणाले की,नाम.राधाकृष्ण विखे पा.यांचे नेतृत्वाखाली गावकरी मंडळाची सत्ता आल्यावर गावाच्या विकासाला गती मिळाली.गावासाठी १२६कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली.साठावण तलाव व १२०० घरकुलांची वसाहत,हिंदू,मुस्लिम,आदिवासी स्मशानभुमी,घनकचरा प्रक्रिया प्रकल्प व क्रिडा संकुलासाठी नाम.विखे पा.यांनी बाजारभावाप्रमाणे सुमारे ९० कोटी मुल्याची ४३ एकर शेती महामंडळाची जमिन ग्रामपंचायतला मोफत दिली.आज जनसेवा फौंडेशनच्या वतीने ३९ महिला बचत गटांना ५० लाख रु.किमतीचे फुड प्रोसेसिंग युनीटस्,दिव्यांगांना बॕटरी सायकलस्,शालेय मुलांना टॕब आदि साहित्याचे वाटप केले जात आहे.यापुढील काळात नाम.श्री.विखे पा.यांचे नेतृत्वाखाली गावाची विकासकामे मार्गी लावू असे श्री.खंडागळे म्हणाले.                                     कार्यक्रमाचे प्रास्तविक सरपंच स्वाती अमोलिक यांनी केले.तर प्रफुल्ल डावरे यांनी मनोगत व्यक्त केले.ग्रामविकास अधिकारी श्री.निलेश लहारे यांनी आभार मानले तर डाॕ.आदिनाथ जोशी यांनी सूञसंचलन केले.यावेळी  उपसरपंच प्रियंका कुऱ्हे, बाळासाहेब तोरणे,भाऊसाहेब बांद्रे, बाबासाहेब शेटे,किशोर बनकर,महेश खरात,मुकुंद लबडे, विराज भोसले,प्रवीण लिप्टे, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,चंद्रकांत नवले,तबसुम बागवान, मीना साळवी,सुशीलाबाई पवार,उज्वला कुताळ, वैभव कुऱ्हे,मानवी खंडागळे,प्रतिभा नवले, रणजीत श्रीगोड , पुरुषोत्तम भराटे, जालिंदर कुऱ्हे, कनजीशेठ टाक,  भाऊसाहेब कुताळ, हाजी इस्माईल शेख, सुभाष अमोलिक,सुधाकर खंडागळे, विष्णुपंत डावरे,वृद्धेश्वर कुऱ्हे,सागर खरात, अशोक गवते,अशोक प्रधान,प्रभात कुऱ्हे, अॕड. अरविंद साळवी, बाबुराव पवार,भाऊसाहेब तेलोरे,विशाल आंबेकर,महेश कुऱ्हे,सचिन वाघ,किशोर महापुरे, अभिषेक नवले,गोपी दाणी,भैया शेख,रावसाहेब अमोलिक,प्रवीण बाठिया,मोहसिन सय्यद, वैभव खंडागळे,प्रशांत मुंडलिक, जिना शेख, गफ्फुर शेख, दादासाहेब कुताळ,सुधीर तेलोरे,बंटी शेलार,बबन मेहेत्रे,संजय भोंडगे,बाबूलाल पठाण,सचिन देवरे, अल्ताफ शेख, शहानवाज सय्यद,रवींद्र कुताळ, दस्तगीर शेख, उल्हास कुताळ,राहुल माळवदे, अन्वर सय्यद,समीर सय्यद,राम सोनवणे,शाम सोनवणे, सचिन मेहेत्रे,श्रीकांत अमोलिक, गणेश बंगाळ, राजेंद्र कुताळ, राज गुडे, गोरख कुताळ,सचिन अमोलिक,शाहरुख शेख,जाकीर हसन शेख, दिपक गायकवाड, राजेंद्र काळे, सद्दाम आतार,रफिक शहा, अनिल कुऱ्हे,युनुस शेख यांचे सह कार्यक्रमास महिला व ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बेलापूर ग्रामपंचायत कमर्चारी यांनी विशेष प्रयत्न केले.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे): 3A साईड व्हॉलिबॉल फेडरेशन कप साठी महाराष्ट्र संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली होती. दिनांक ११ एप्रिल ते १३ एप्रिल दरम्यान हैदराबाद,तेलंगणा येथे होत असलेल्या फेडरेशन कप स्पर्धेसाठी कोपरगाव येथील श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी कुमारी अनुष्का बनकर हिची महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली आहे तसेच संघाच्या प्रशिक्षकपदी श्रीरामपूरचे नितीन बलराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुरुष संघाचा कर्णधार म्हणून विनित शेट्टी व महिला संघाची कर्णधार म्हणून श्रीया गोठोस्कर यांची निवड करण्यात आली आहे.फेडरेशन कप स्पर्धेसाठी तेलंगणा,महाराष्ट्र,दिव दमन,गुजरात,छत्तीसगड हरियाणा,पंजाब व मध्य प्रदेश या आठ  राज्यांचे संघ सहभागी होणार असल्याची माहिती 3A साईड व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व्ही एस ए राजू व सचिव श्री मारुती हजारे यांनी दिली.स्पर्धेचे तांत्रिक अधिकारी म्हणून क्रीडा प्रशिक्षक श्री गौरव डेंगळे काम बघतील. निवड झालेल्या संघाचे गोदावरी बायोरिफायनरीचे (साखरवाडी)अध्यक्ष श्री सुहास गाडगे, प्राचार्य श्री के एल वाकचौरे,उपप्राचार्या शुभांगी अमृतकर,पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे,नेथलीन फर्नांडिस,क्रीडा विभाग प्रमुख डॉ धनंजय देवकर तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या..


निवड झालेल्या संघ पुढीलप्रमाणे!

महाराष्ट्र पुरुष संघ : विनित शेट्टी (कर्णधार),मोहम्मद सय्यद,सागर पूजारी,प्रीथमा,रंजित पुजारी,प्रीतम व विशाल यादव 

प्रशिक्षक : योगेश तडवी


महिला महाराष्ट्र संघ:श्रीया गोठोस्कर (कर्णधार),संजना गोठोस्कर,उमा सायगावकर,उपतज्ञ कार्ले,अरमान भावे व अनुष्का बनकर.

मुख्य प्रशिक्षक : नितीन बलराज 

संघ व्यवस्थापक: गीतांजली भावे

श्रीरामपूर :(प्रतिनिधी)-  सितारों की दुनिया या श्रीरामपूरातील नावाजलेल्या कराओके ग्रुप तर्फे २ एप्रिल रोजी आगाशे हॉल, टिळक वाचनालय येथे 'जल्लोष' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीरामपूरातील होतकरु कलाकार, गाण्याची आवड असून सवड न मिळणाऱ्या महिला गायकांना व्यासपीठ उपल्ब्ध करून देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे ग्रुप चे संस्थापक सदस्य  श्रीगित हिरे यांनी सांगितले.


संगीत म्हणजे जीवन, संगीत हे मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. संगीत आपल्याला आनंद आणि समाधान देते, आपल्या भावना व्यक्त करण्याचा मार्ग म्हणजे संगीत, आणि या कारणानेच महिलांसाठी जल्लोष- या आणि गा या अनोख्या शो चे प्रथमच श्रीरामपूरात आयोजन केल्याचे मत संस्थापक सदस्य कैलास सोमाणी यांनी कार्यक्रमाची रुपरेषा मांडताना व्यक्त केले.


कार्यक्रमाचे उद्‌घाटन डॉ .सौ. रिमा गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद व भरभरून उत्साह  दिसल्याचे मत ग्रुप चे संस्थापक सदस्य श्री. दिपकजी बोरसे यांनी मांडले.

         साडेतीन वर्षाच्या भूमी शिंपी,  पाच वर्षाची गार्गी चौधरी,  नवोदित तसेच नावाजलेल्या महिला कलाकारांनी अतिशय उत्तम सादरीकरण केल्याचे ग्रुपचे संस्थापक सदस्य श्री. सुरजी ईसर यांनी सांगितले.

 कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व सुत्रसंचालन ग्रुपचे संस्थापक सदस्य डॉ. दिलीप शेजवळ आणि सौ पुजा मुंदडा यांनी उत्तमरित्या सांभाळले.

            कार्यक्रम यशस्वीतेसाठी  सोमनाथ साळुंके,रवि बोर्डे, अशोक शिंदे, भिमगिरी कांबळे,  भाऊसाहेब दळवी, फत्तुभाई, अशोकजी गायकवाड, सौ. त्रिवेणी साळुंके, वढणे मॅडम, सौ. राखी लोढा यांनी अथक परिश्रम घेतले.


सामाजिक हेतूने सांस्कृतिक वारसा जपत श्रीरामपूरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्याच्या उद्दे‌शाने 'सितारों की दुनिया' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे मत कराओके ग्रुपचे कैलास सोमाणी यांनी व्यक्त केले.

बेलापूर (प्रतिनिधी )- बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे कडक उन्हापासून संरक्षण व्हावे या करिता बेलापूर बु ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने नगर बायपास रोडला मंडप (शेड )टाकून निवाऱ्याची सोय केल्याबद्दल बेलापूर ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुपच्या सर्व सदस्यांना प्रवाशांनी मनापासून धन्यवाद दिले आहे.                .  बेलापूर बायपासला ओढ्यावर फुलाचे काम चालू आहे. हे काम गेल्या दीड दोन महिन्यापासून सुरू आहे त्यामुळे श्रीरामपूर हुन नगर कडे जाणाऱ्या व नगरहून श्रीरामपूर कडे येणाऱ्या बसेस या बेलापूर बस स्टॅन्डवर न येता बाहेरुन जातात.  बसने प्रवास करणारे सर्व प्रवासी हे बायपासलाच जाऊन थांबतात. ज्या ठिकाणी प्रवासी उभे राहतात तिथे कुठलीही सावली नव्हती. प्रवाशांना बसची वाट पाहत उन्हातच उभे रहावे लागत होते ही बाब जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व सत्यमेव जयते ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य देविदास देसाई यांच्या लक्षात आली व सामाजिक दायित्व म्हणून या ठिकाणी तात्पुरते शेड किंवा मंडप उभा करून देण्याची अत्यंत आवश्यकता असल्याची बाब  ग्रामपंचायत पदाधिकारी व सत्यमेव जयते ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या लक्षात आणून दिली. ग्रुपचे सदस्य व बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी तातडीने या ठिकाणी प्रवासांच्या सोयीकरिता शेडचा मंडप टाकून दिला .त्यामुळे आता प्रवाशांना बसची वाट पाहत सावलीत थाबंता येते.ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने बायपासला तात्पुरता बस स्टॅन्ड  निवारा म्हणून शेड उभे करण्यात आले आणि त्या शेडचा लाभ खरोखर आता अनेक प्रवासी घेत आहेत.ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने उभारलेल्या या तात्पुरत्या बस थांबा निवाऱ्यामुळे प्रवाशांना उन्हापासून थोडासा का होईना दिलासा मिळाला आहे.

बेलापूर ( प्रतिनिधी )-आज समाजाचे आरोग्यच धोक्यात आलेले आहे ते दुरुस्त करायचे असेल तर आपल्या सर्वांनाच पुढाकार घ्यावा लागेल .वैद्यकीय व्यवसाय हा सेवाभाव म्हणून केला तर त्यातून मिळणारे समाधान हे फार मोठे असल्याचे मत माजी जि प सदस्य शरद नवले यांनी व्यक्त केले.           बेलापुरातील ऋषभ शांतीलाल हिरण व प्रणव रमेश राव पवार यांनी एमबीबीएस ही पदवी मिळवली तसेच कुमारी प्राची सतीश चायल हिने बीडीएस ही पदवी मिळवीली त्याबद्दल गावकरी मंडळ व बेलापूर ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांच्या सत्कारचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी शरद नवले बोलत होते यावेळी बोलताना बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे म्हणाले की पूर्वी बेलापूर गाव हे सीएंच गाव म्हणून ओळखलं जात होतं आता हिरण,पवार, चायल यांनी मिळविलेल्या यशामुळे आता हे गाव वैद्यकीय पंढरी म्हणून ओळखले जाणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करताना आपण सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून काम केले तर भविष्यात आपल्याला कुठलीच अडचण येणार नाही. यावेळी जनसेवा पतसंस्थेचे संस्थापक सुवालालजी लुक्कड, पत्रकार देविदास देसाई, वृषभ हिरण, प्रणव पवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शांतीलाल हिरण प्रशांत शेठ लड्डा,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,बाळासाहेब वाबळे, बाबूलाल पठाण, प्रकाश कटारिया, रावसाहेब गाढे, भाऊसाहेब तेलोरे, बाबुराव पवार, बंटी शेलार, शफिक आतार, सोमनाथ जावरे, प्रवीण शेठ बाठीया आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते

श्रीरामपूर/( प्रतिनिधी)-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने प्रथम वर्ग   न्यायदंडाधिकार या पदाकरता घेण्यात आलेल्या परीक्षेत श्रीरामपूर बार असोसिएशनच्या ॲडव्होकेट कोमल फकीरचंद चौधरी याचीं न्यायाधीश पदी नियुक्ती झाली आहे.                              महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने सन 2024-25 या कालावधीमध्ये प्रथम वर्ग  न्याय दंडाधिकारी या पदाकरीता परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेत एडवोकेट कोमल चौधरी यांनी घवघवीत यश मिळविले असून पहिल्याच प्रयत्नात तिने प्रथम दंड न्याय अधिकारी या पदाला गवसणी घातले आहे .      अतिशय हलकीच्या परिस्थिती मधून शिक्षण घेऊन तसेच कुठलेही क्लास न लावता स्वतः घरच्या घरी अभ्यास करून हे यश संपादन केले आहे . खानापूर सारख्या ग्रामीण भागातून अभ्यास करून तिने हे यश मिळवले आहे .अर्बन बँक शाखा बेलापूरचे माजी मॅनेजर फकीरचंद गणपतराव चौधरी व पद्मा चौधरी यांची ती कन्या असून ॲडव्होकेट दिलीप औताडे यांची भाची आहे तिने मिळविलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

बेलापूर /(प्रतिनिधी)-  येथील दुकानासमोर पडलेली एक तोळ्याची अंगठी बेलापूर येथील मिठाई व्यापारी एकनाथ नागले यांनी प्रामाणिकपणे ग्राहकास परत केली असून नागले यांच्या प्रामाणिकपणाबद्दल  सर्वत्र कौतुक होत आहे.                    याबाबत माहिती अशी की बेलापूर खुर्द येथील अमोल रामनाथ पुजारी यांचे नातेवाईक संतोष दामू शिंदे व सुनील नामदेव शिंदे राहणार संगमनेर हे काही कामानिमित्त बेलापूर येथे आले होते आपले काम आटोपल्यानंतर ते बेलापूर येथील एकनाथ नागले यांच्या श्री बालाजी स्विट गोडीशेव रेवडी या दुकानात गेले त्यावेळी त्यांच्या पत्नी सौ शैलाबाई नागले या दुकानात होत्या संतोष व सुनील शिंदे यांनी नागले यांच्या दुकानात गोडीशेव व रेवडी फरसाण विकत घेतली. घेतलेल्या मालाचे पैसे देण्याकरता त्यांनी खिशातून पैसे काढले त्याच वेळेस त्यांच्या खिशात असलेले अंगठी देखील खाली पडली ही बाब त्यांच्या लक्षात आली नाही. पैसे देऊन ते निघून गेले. त्यानंतर  सौ शैलाबाई नागले यांना त्यांच्या दुकानासमोर एक अंगठी पडलेली दिसली त्यांनी ती उचलून पती एकनाथ नागले यांच्याकडे दिली. ती अंगठी सोन्याची असल्याचे नागले यांच्या लक्षात आले व आपल्या दुकानावर नुकतेच आलेले ग्राहक यांचीच ती पडली असावी अशी शंका त्यांना आली व काही तासाने शिंदे बंधु देखील या ठिकाणी येऊन अंगठीची विचारपूस करू लागले. ते प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होते. त्यावेळी नागले यांनी त्यांना सांगितले की काळजी करू नका तुमची अंगठी येथेच पडली होती आणि ती व्यवस्थित आहे त्यानंतर त्यांनी याबाबत बेलापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे यांना कल्पना दिली त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे यांच्या हस्ते ती एक तोळ्याची सोन्याची अंगठी मूळ मालक संतोष दामू शिंदे  यांना देण्यात आली. बेलापूर येथील प्रसिद्ध हलवाई श्री एकनाथ नागले व त्यांच्या पत्नी सौ शैलाबाई नागले यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget