बेलापूर ( प्रतिनिधी )-आज समाजाचे आरोग्यच धोक्यात आलेले आहे ते दुरुस्त करायचे असेल तर आपल्या सर्वांनाच पुढाकार घ्यावा लागेल .वैद्यकीय व्यवसाय हा सेवाभाव म्हणून केला तर त्यातून मिळणारे समाधान हे फार मोठे असल्याचे मत माजी जि प सदस्य शरद नवले यांनी व्यक्त केले. बेलापुरातील ऋषभ शांतीलाल हिरण व प्रणव रमेश राव पवार यांनी एमबीबीएस ही पदवी मिळवली तसेच कुमारी प्राची सतीश चायल हिने बीडीएस ही पदवी मिळवीली त्याबद्दल गावकरी मंडळ व बेलापूर ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांच्या सत्कारचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी शरद नवले बोलत होते यावेळी बोलताना बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे म्हणाले की पूर्वी बेलापूर गाव हे सीएंच गाव म्हणून ओळखलं जात होतं आता हिरण,पवार, चायल यांनी मिळविलेल्या यशामुळे आता हे गाव वैद्यकीय पंढरी म्हणून ओळखले जाणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करताना आपण सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून काम केले तर भविष्यात आपल्याला कुठलीच अडचण येणार नाही. यावेळी जनसेवा पतसंस्थेचे संस्थापक सुवालालजी लुक्कड, पत्रकार देविदास देसाई, वृषभ हिरण, प्रणव पवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शांतीलाल हिरण प्रशांत शेठ लड्डा,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,बाळासाहेब वाबळे, बाबूलाल पठाण, प्रकाश कटारिया, रावसाहेब गाढे, भाऊसाहेब तेलोरे, बाबुराव पवार, बंटी शेलार, शफिक आतार, सोमनाथ जावरे, प्रवीण शेठ बाठीया आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते
Post a Comment