बेलापूर (प्रतिनिधी )- बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे कडक उन्हापासून संरक्षण व्हावे या करिता बेलापूर बु ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने नगर बायपास रोडला मंडप (शेड )टाकून निवाऱ्याची सोय केल्याबद्दल बेलापूर ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुपच्या सर्व सदस्यांना प्रवाशांनी मनापासून धन्यवाद दिले आहे. . बेलापूर बायपासला ओढ्यावर फुलाचे काम चालू आहे. हे काम गेल्या दीड दोन महिन्यापासून सुरू आहे त्यामुळे श्रीरामपूर हुन नगर कडे जाणाऱ्या व नगरहून श्रीरामपूर कडे येणाऱ्या बसेस या बेलापूर बस स्टॅन्डवर न येता बाहेरुन जातात. बसने प्रवास करणारे सर्व प्रवासी हे बायपासलाच जाऊन थांबतात. ज्या ठिकाणी प्रवासी उभे राहतात तिथे कुठलीही सावली नव्हती. प्रवाशांना बसची वाट पाहत उन्हातच उभे रहावे लागत होते ही बाब जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व सत्यमेव जयते ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य देविदास देसाई यांच्या लक्षात आली व सामाजिक दायित्व म्हणून या ठिकाणी तात्पुरते शेड किंवा मंडप उभा करून देण्याची अत्यंत आवश्यकता असल्याची बाब ग्रामपंचायत पदाधिकारी व सत्यमेव जयते ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या लक्षात आणून दिली. ग्रुपचे सदस्य व बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी तातडीने या ठिकाणी प्रवासांच्या सोयीकरिता शेडचा मंडप टाकून दिला .त्यामुळे आता प्रवाशांना बसची वाट पाहत सावलीत थाबंता येते.ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने बायपासला तात्पुरता बस स्टॅन्ड निवारा म्हणून शेड उभे करण्यात आले आणि त्या शेडचा लाभ खरोखर आता अनेक प्रवासी घेत आहेत.ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने उभारलेल्या या तात्पुरत्या बस थांबा निवाऱ्यामुळे प्रवाशांना उन्हापासून थोडासा का होईना दिलासा मिळाला आहे.
Post a Comment