संगीत म्हणजे जीवन, संगीत हे मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. संगीत आपल्याला आनंद आणि समाधान देते, आपल्या भावना व्यक्त करण्याचा मार्ग म्हणजे संगीत, आणि या कारणानेच महिलांसाठी जल्लोष- या आणि गा या अनोख्या शो चे प्रथमच श्रीरामपूरात आयोजन केल्याचे मत संस्थापक सदस्य कैलास सोमाणी यांनी कार्यक्रमाची रुपरेषा मांडताना व्यक्त केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ .सौ. रिमा गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद व भरभरून उत्साह दिसल्याचे मत ग्रुप चे संस्थापक सदस्य श्री. दिपकजी बोरसे यांनी मांडले.
साडेतीन वर्षाच्या भूमी शिंपी, पाच वर्षाची गार्गी चौधरी, नवोदित तसेच नावाजलेल्या महिला कलाकारांनी अतिशय उत्तम सादरीकरण केल्याचे ग्रुपचे संस्थापक सदस्य श्री. सुरजी ईसर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व सुत्रसंचालन ग्रुपचे संस्थापक सदस्य डॉ. दिलीप शेजवळ आणि सौ पुजा मुंदडा यांनी उत्तमरित्या सांभाळले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोमनाथ साळुंके,रवि बोर्डे, अशोक शिंदे, भिमगिरी कांबळे, भाऊसाहेब दळवी, फत्तुभाई, अशोकजी गायकवाड, सौ. त्रिवेणी साळुंके, वढणे मॅडम, सौ. राखी लोढा यांनी अथक परिश्रम घेतले.
सामाजिक हेतूने सांस्कृतिक वारसा जपत श्रीरामपूरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्याच्या उद्देशाने 'सितारों की दुनिया' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे मत कराओके ग्रुपचे कैलास सोमाणी यांनी व्यक्त केले.
Post a Comment