खानापूर ची कोमल झाली न्यायदंडाधिकारी
श्रीरामपूर/( प्रतिनिधी)-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार या पदाकरता घेण्यात आलेल्या परीक्षेत श्रीरामपूर बार असोसिएशनच्या ॲडव्होकेट कोमल फकीरचंद चौधरी याचीं न्यायाधीश पदी नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने सन 2024-25 या कालावधीमध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी या पदाकरीता परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेत एडवोकेट कोमल चौधरी यांनी घवघवीत यश मिळविले असून पहिल्याच प्रयत्नात तिने प्रथम दंड न्याय अधिकारी या पदाला गवसणी घातले आहे . अतिशय हलकीच्या परिस्थिती मधून शिक्षण घेऊन तसेच कुठलेही क्लास न लावता स्वतः घरच्या घरी अभ्यास करून हे यश संपादन केले आहे . खानापूर सारख्या ग्रामीण भागातून अभ्यास करून तिने हे यश मिळवले आहे .अर्बन बँक शाखा बेलापूरचे माजी मॅनेजर फकीरचंद गणपतराव चौधरी व पद्मा चौधरी यांची ती कन्या असून ॲडव्होकेट दिलीप औताडे यांची भाची आहे तिने मिळविलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
Post a Comment