बेलापूरःमहिलांमध्ये उपजत गुणवत्ता व कौशल्य असते.ते विकसित होण्यासाठी सामाजिक प्रेरणेची गरज आहे.महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन पातळीवरुन विविध योजनांव्दारे प्रयत्न केले जातात.महिलांनी या योजनांचा लाभ घेवून आत्मनिर्भर बनावे.महिला बचत गटाच्या महिलांनी विविध उद्योग व व्यवसाय सुरु करावेत त्यासाठी महिलांना जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाईल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी आध्यक्ष सौ.शालिनीताई पा.विखे यांनी केले.
बेलापूर बुll ग्रामपंचायत आयोजित नविन घरकुल वसाहतीचे राधाकृष्णनगर व सुजयनगर नामकरण,महिला बचत गटांना फुड प्रोसेसिंग युनिट,दिव्यांगांना बॕटरी सायकल तसेच जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना टॕबचे वाटप कार्यक्रमप्रसंगी सौ.विखे पा. बोलत होत्या.अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले होते. सौ.विखे म्हणाल्या की,विखे परिवार हा राजकारणी नसून समाजकारणी आहे.मिळालेल्या पदाचा वापर सर्वसामान्यांच्या हितासाठी केला पाहिजे.बेलापूर ग्रामपंचायत नेहमीच महिलांच्या विकासाला प्राधान्य व प्रेरणा देते हे कौतुकास्पद आहे.नाम.राधाकृष्ण विखे यांना मंञी म्हणून जेवढी खाती मिळाली त्या माध्यमातून त्यांनी जनतेचे प्रश्न सोडविले.महिला बचत गटांना विविध साहित्य वितरित केले जात आहे.त्याचा वापर व्यवसायासाठी करावा.यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण व सहकार्य केले जाईल असे आश्वासन सौ.विखे यांनी दिले. अध्यक्षपदावरुन बोलताना शरद नवले म्हणाले की,नाम.राधाकृष्ण विखे यांचेसह विखे परिवाराचे बेलापूरच्या विकासात मोठे योगदान आहे.तालुक्यात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे ती विखे परिवाराने भरुन काढावी.नजिकच्या काळातील स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत शतप्रतिशत भाजपचे नाम.विखे पा.यांचे स्वप्न पूर्ण करु.नाम.विखे यांनी खंडकरी व आकारी पड शेतक-यांचा प्रश्न मार्गी लावला.वर्ग २च्या जमिनी विनामोबदला वर् १ केल्या.तालुक्यातील १४ गावांना गावठाण,घरकुले यासाठी मोफात जमिनी दिल्या.माजी महसूलमंञी श्री.थोरात यांनी एक गुंठाही जागा दिली नाही.त्यासाठी नाम.विखेंसारखी दानत लागते.भविष्यात नदी संवर्धन योजनेतून घाट विकास,जाॕगिंग ट्रॕक,जलतरण सुविधा विकसित करायची आहे.तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक निर्माण करायचे आहे.त्यासाठी निधी उपलब्ध करणेबाबत पालकमंञी नाम.श्री.विखे पा. व सौ.शालिनीताई विखे पा.यांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे म्हणाले की,नाम.राधाकृष्ण विखे पा.यांचे नेतृत्वाखाली गावकरी मंडळाची सत्ता आल्यावर गावाच्या विकासाला गती मिळाली.गावासाठी १२६कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली.साठावण तलाव व १२०० घरकुलांची वसाहत,हिंदू,मुस्लिम,आदिवासी स्मशानभुमी,घनकचरा प्रक्रिया प्रकल्प व क्रिडा संकुलासाठी नाम.विखे पा.यांनी बाजारभावाप्रमाणे सुमारे ९० कोटी मुल्याची ४३ एकर शेती महामंडळाची जमिन ग्रामपंचायतला मोफत दिली.आज जनसेवा फौंडेशनच्या वतीने ३९ महिला बचत गटांना ५० लाख रु.किमतीचे फुड प्रोसेसिंग युनीटस्,दिव्यांगांना बॕटरी सायकलस्,शालेय मुलांना टॕब आदि साहित्याचे वाटप केले जात आहे.यापुढील काळात नाम.श्री.विखे पा.यांचे नेतृत्वाखाली गावाची विकासकामे मार्गी लावू असे श्री.खंडागळे म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्तविक सरपंच स्वाती अमोलिक यांनी केले.तर प्रफुल्ल डावरे यांनी मनोगत व्यक्त केले.ग्रामविकास अधिकारी श्री.निलेश लहारे यांनी आभार मानले तर डाॕ.आदिनाथ जोशी यांनी सूञसंचलन केले.यावेळी उपसरपंच प्रियंका कुऱ्हे, बाळासाहेब तोरणे,भाऊसाहेब बांद्रे, बाबासाहेब शेटे,किशोर बनकर,महेश खरात,मुकुंद लबडे, विराज भोसले,प्रवीण लिप्टे, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,चंद्रकांत नवले,तबसुम बागवान, मीना साळवी,सुशीलाबाई पवार,उज्वला कुताळ, वैभव कुऱ्हे,मानवी खंडागळे,प्रतिभा नवले, रणजीत श्रीगोड , पुरुषोत्तम भराटे, जालिंदर कुऱ्हे, कनजीशेठ टाक, भाऊसाहेब कुताळ, हाजी इस्माईल शेख, सुभाष अमोलिक,सुधाकर खंडागळे, विष्णुपंत डावरे,वृद्धेश्वर कुऱ्हे,सागर खरात, अशोक गवते,अशोक प्रधान,प्रभात कुऱ्हे, अॕड. अरविंद साळवी, बाबुराव पवार,भाऊसाहेब तेलोरे,विशाल आंबेकर,महेश कुऱ्हे,सचिन वाघ,किशोर महापुरे, अभिषेक नवले,गोपी दाणी,भैया शेख,रावसाहेब अमोलिक,प्रवीण बाठिया,मोहसिन सय्यद, वैभव खंडागळे,प्रशांत मुंडलिक, जिना शेख, गफ्फुर शेख, दादासाहेब कुताळ,सुधीर तेलोरे,बंटी शेलार,बबन मेहेत्रे,संजय भोंडगे,बाबूलाल पठाण,सचिन देवरे, अल्ताफ शेख, शहानवाज सय्यद,रवींद्र कुताळ, दस्तगीर शेख, उल्हास कुताळ,राहुल माळवदे, अन्वर सय्यद,समीर सय्यद,राम सोनवणे,शाम सोनवणे, सचिन मेहेत्रे,श्रीकांत अमोलिक, गणेश बंगाळ, राजेंद्र कुताळ, राज गुडे, गोरख कुताळ,सचिन अमोलिक,शाहरुख शेख,जाकीर हसन शेख, दिपक गायकवाड, राजेंद्र काळे, सद्दाम आतार,रफिक शहा, अनिल कुऱ्हे,युनुस शेख यांचे सह कार्यक्रमास महिला व ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बेलापूर ग्रामपंचायत कमर्चारी यांनी विशेष प्रयत्न केले.
Post a Comment