कर्णधार श्रिया गोठोस्कर अप्रतिम खेळीच्या जोरावर महाराष्ट्राचा छत्तीसगड व मध्यप्रदेश संघावर २-० ने विजय.उपांत्य फेरी गाठणारा महाराष्ट्र ठरला पहिला संघ!!!

चंदानगर,तेलंगणा (गौरव डेंगळे) : पीजेआर क्रीडा संकुल चंदानगर तेलंगणा येथे आजपासून सुरू झालेल्या पहिल्या 3A साईड फेडरेशन कप स्पर्धेमध्ये पहिल्याच सामन्यात कर्णधार श्रिया गोठोस्करच्या अप्रतिम खेळीच्या जोरावर महाराष्ट्राचा छत्तीसगडवर २१- ०७ व २१-१९  अशा सरळ सेटमध्ये पराभव करत साखळीतील पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला.

पहिल्या सेटमध्ये कर्णधार श्रीया, उमा व आरमान यांनी लयबद्ध खेळ करत छत्तीसगड संघावर पहिल्या सर्विस पासून वर्चस्व प्रस्थापित केले.श्रिया व उमाने उत्कृष्ट अशी अटॅकिंग करत पहिला सेट २१-०७ ने पटकावला.अरमान कडून सुरेखाची सेटिंग बघायला मिळाली.दुसऱ्या सेटमध्ये चंदीगड संघाकडून अप्रतिम खेळ बघायला मिळाला.१५ गुणांपर्यंत सामना बरोबरीत सुरू होता. त्यानंतर छत्तीसगड संघाने सलग ४ गुण घेऊन ४ गुणांची आघाडी घेतली.१५- १९ ने पिछाडीवर असताना महाराष्ट्राने आपला खेळ उंचावत १९-१९ अशी बरोबरी साधली.कर्णधार श्रिया ने शेवटचे २ गुण मिळवत सामना २१-१९ गुणांनी जिंकला. साखळीतील दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राने मध्य प्रदेश संघावर २१-१३ व २३-२१ ने मात करून उपांत्य फेरी प्रवेश केला.साखळीतील शेवटच्या सामन्यात महाराष्ट्राची गाठ पडेल ती दिव दमन या संघाबरोबर.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget