
चदानगर,तेलंगणा (गौरव डेंगळे) : पीजेआर क्रीडा संकुल चंदानगर तेलंगणा येथे सुरू असलेल्या पहिल्या 3A साईड फेडरेशन कप स्पर्धेमध्ये साखळीतील तिसऱ्या सामन्यात कर्णधार श्रिया गोठोस्कर,उमा सायगावकर,अरमान भावे, उपन्या कार्ले, संजना गोठोस्कर व अनुष्का बनकर यांच्या सांघिक खेळाच्या जोरावर देवधमन संघावर २१- ०७ व २१-१४ अशा सरळ सेटमध्ये पराभव करत साखळीतील सर्वसामान्य जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.महाराष्ट्र महिला संघाचा उपांत्य फेरीचा सामना रंगला तो हरियाणा संघाबरोबर.पहिल्या सेटमध्ये कर्णधार श्रीया, उमा व आरमान यांनी लयबद्ध खेळ करत हरियाणा संघावर पहिल्या सर्विस पासून वर्चस्व प्रस्थापित केले.श्रिया व उमाने उत्कृष्ट अशी अटॅकिंग करत पहिला सेट २१-१२ ने पटकावला.अरमान कडून सुरेख सेटिंग बघायला मिळाली.दुसऱ्या सेट मध्ये देखील संजना व उपन्या यांनी सुरेख सर्विस व अटॅकिंग करत सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. महाराष्ट्राच्या आक्रमक खेळापुढे हरियाणा संघ हतबल झाला व उपांत्य फेरीचा सामना महाराष्ट्राने २१ - १२ व २१ - १२ फरकाने जिंकत अंतिम फेरी प्रवेश केला. महाराष्ट्र मुलींचा अंतिम सामना रंगेल तो यजमान तेलंगाना संघाबरोबर आज सायंकाळी ६:०० वाजता.अंतिम सामन्यात कर्णधार श्रिया गोठोस्कर कडून आक्रमक खेळाची अपेक्षा असून महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देण्यासाठी तिच्यावर भिस्त असणार आहे.
कोट: महाराष्ट्र मुलींचा संघ लयबद्ध खेळ करत असून स्पर्धेतील सर्व ४ सामने जिंकून संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.आम्हाला आशा आहे की अंतिम सामना जिंकून फेडरेशन कप जिंकू.
( श्री नितीन बलराज,महाराष्ट्र महिला संघ प्रशिक्षक)
Post a Comment