
तेलंगणा (गौरव डेंगळे) ःपी जे आर स्टेडियम,तेलंगणा येथे झालेल्या पहिल्या 3A साईड व्हॉलिबॉल फेडरेशन कप स्पर्धेत कर्णधार श्रिया गोठोस्कर नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने यजमान संघाला सरळ दोन सेटमध्ये हरवून सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर मुलांमध्ये महाराष्ट्र संघाला कांस्यपदक समाधान मानावे लागले.तेलंगणा येथे झालेल्या या स्पर्धेत देशभरातील आठ राज्य पात्र ठरले होते.अंतिम सामन्याच्या सुरुवातीला यजमान तेलंगाना संघाने सामन्यावर वर्चस्व गाजवत पहिल्या सेटमध्ये ४ गुणांची आघाडी घेतली.श्रिया गोठोस्कर,संजना गोठोस्कर, अरमान भावे यांनी आपला खेळ उंचावत महाराष्ट्र संघाला आघाडी मिळवून दिली.पहिला सेट मध्ये महाराष्ट्राने १९- १९ बरोबरी सादत पहिला सेट २१- १९ ने पटकावला. दुसऱ्या सेटमध्ये देखील महाराष्ट्राच्या मुलींनी सुरेख खेळण्याचा प्रदर्शन करत दुसरा सेट २१- १७ ने जिंकत पहिल्या फेडरेशन कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. महाराष्ट्राची कर्णधार श्रिया गोठोस्कर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली.उमा सायगावकर,अरमान भावे,उपन्या कार्ले, संजना गोठोस्कर व अनुष्का बनकर यांनी देखील स्पर्धेमध्ये सुरेख खेळाचे प्रदर्शन केले.प्रशिक्षक नितीन बलराज यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या महाराष्ट्र मुलींचा संघाने स्पर्धेत एकही सेट गमावला नाही.सुवर्णपदक विजेत्या महाराष्ट्र मुलीच्या संघाचे गोदावरी बायोरिफायनरीचे (साखरवाडी)अध्यक्ष श्री सुहास गाडगे, प्राचार्य श्री के एल वाकचौरे,संत तेरेजा गर्ल्स हायस्कूल हरेगावच्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्योती गजभिव,3A साईड व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव श्री मारुती हजारे,3A साईड महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष श्री स्वामीराज कुलथे आदींनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
अंतिम निकाल:
मुली:
सुवर्णपदक: महाराष्ट्र
रोप्यपदक : तेलंगाना
कांस्यपदक: हरियाणा
मुले:
सुवर्णपदक: तेलंगणा
रोप्यपदक : पंजाब
कांस्यपदक: महाराष्ट्र
कोट: प्रत्येक खेळामध्ये मुला- मुलींनी चिकाटीने सराव केला तर निश्चितच आगामी काही वर्षांमध्ये भारत विश्व क्रीडा क्षेत्रामध्ये अव्वल असेल. तेलंगणामध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी मोठ्या गटात खेळताना सुरेख खेळ करत विजेतेपद पटकावले.युवा खेळाडूंनी खेळाकडे करिअर म्हणून बघितले पाहिजे.
( श्री गौरव डेंगळे श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगाव)
Post a Comment