Latest Post

बेलापूर (प्रतिनिधी )- बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे कडक उन्हापासून संरक्षण व्हावे या करिता बेलापूर बु ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने नगर बायपास रोडला मंडप (शेड )टाकून निवाऱ्याची सोय केल्याबद्दल बेलापूर ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुपच्या सर्व सदस्यांना प्रवाशांनी मनापासून धन्यवाद दिले आहे.                .  बेलापूर बायपासला ओढ्यावर फुलाचे काम चालू आहे. हे काम गेल्या दीड दोन महिन्यापासून सुरू आहे त्यामुळे श्रीरामपूर हुन नगर कडे जाणाऱ्या व नगरहून श्रीरामपूर कडे येणाऱ्या बसेस या बेलापूर बस स्टॅन्डवर न येता बाहेरुन जातात.  बसने प्रवास करणारे सर्व प्रवासी हे बायपासलाच जाऊन थांबतात. ज्या ठिकाणी प्रवासी उभे राहतात तिथे कुठलीही सावली नव्हती. प्रवाशांना बसची वाट पाहत उन्हातच उभे रहावे लागत होते ही बाब जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व सत्यमेव जयते ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य देविदास देसाई यांच्या लक्षात आली व सामाजिक दायित्व म्हणून या ठिकाणी तात्पुरते शेड किंवा मंडप उभा करून देण्याची अत्यंत आवश्यकता असल्याची बाब  ग्रामपंचायत पदाधिकारी व सत्यमेव जयते ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या लक्षात आणून दिली. ग्रुपचे सदस्य व बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी तातडीने या ठिकाणी प्रवासांच्या सोयीकरिता शेडचा मंडप टाकून दिला .त्यामुळे आता प्रवाशांना बसची वाट पाहत सावलीत थाबंता येते.ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने बायपासला तात्पुरता बस स्टॅन्ड  निवारा म्हणून शेड उभे करण्यात आले आणि त्या शेडचा लाभ खरोखर आता अनेक प्रवासी घेत आहेत.ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने उभारलेल्या या तात्पुरत्या बस थांबा निवाऱ्यामुळे प्रवाशांना उन्हापासून थोडासा का होईना दिलासा मिळाला आहे.

बेलापूर ( प्रतिनिधी )-आज समाजाचे आरोग्यच धोक्यात आलेले आहे ते दुरुस्त करायचे असेल तर आपल्या सर्वांनाच पुढाकार घ्यावा लागेल .वैद्यकीय व्यवसाय हा सेवाभाव म्हणून केला तर त्यातून मिळणारे समाधान हे फार मोठे असल्याचे मत माजी जि प सदस्य शरद नवले यांनी व्यक्त केले.           बेलापुरातील ऋषभ शांतीलाल हिरण व प्रणव रमेश राव पवार यांनी एमबीबीएस ही पदवी मिळवली तसेच कुमारी प्राची सतीश चायल हिने बीडीएस ही पदवी मिळवीली त्याबद्दल गावकरी मंडळ व बेलापूर ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांच्या सत्कारचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी शरद नवले बोलत होते यावेळी बोलताना बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे म्हणाले की पूर्वी बेलापूर गाव हे सीएंच गाव म्हणून ओळखलं जात होतं आता हिरण,पवार, चायल यांनी मिळविलेल्या यशामुळे आता हे गाव वैद्यकीय पंढरी म्हणून ओळखले जाणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करताना आपण सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून काम केले तर भविष्यात आपल्याला कुठलीच अडचण येणार नाही. यावेळी जनसेवा पतसंस्थेचे संस्थापक सुवालालजी लुक्कड, पत्रकार देविदास देसाई, वृषभ हिरण, प्रणव पवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शांतीलाल हिरण प्रशांत शेठ लड्डा,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,बाळासाहेब वाबळे, बाबूलाल पठाण, प्रकाश कटारिया, रावसाहेब गाढे, भाऊसाहेब तेलोरे, बाबुराव पवार, बंटी शेलार, शफिक आतार, सोमनाथ जावरे, प्रवीण शेठ बाठीया आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते

श्रीरामपूर/( प्रतिनिधी)-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने प्रथम वर्ग   न्यायदंडाधिकार या पदाकरता घेण्यात आलेल्या परीक्षेत श्रीरामपूर बार असोसिएशनच्या ॲडव्होकेट कोमल फकीरचंद चौधरी याचीं न्यायाधीश पदी नियुक्ती झाली आहे.                              महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने सन 2024-25 या कालावधीमध्ये प्रथम वर्ग  न्याय दंडाधिकारी या पदाकरीता परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेत एडवोकेट कोमल चौधरी यांनी घवघवीत यश मिळविले असून पहिल्याच प्रयत्नात तिने प्रथम दंड न्याय अधिकारी या पदाला गवसणी घातले आहे .      अतिशय हलकीच्या परिस्थिती मधून शिक्षण घेऊन तसेच कुठलेही क्लास न लावता स्वतः घरच्या घरी अभ्यास करून हे यश संपादन केले आहे . खानापूर सारख्या ग्रामीण भागातून अभ्यास करून तिने हे यश मिळवले आहे .अर्बन बँक शाखा बेलापूरचे माजी मॅनेजर फकीरचंद गणपतराव चौधरी व पद्मा चौधरी यांची ती कन्या असून ॲडव्होकेट दिलीप औताडे यांची भाची आहे तिने मिळविलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

बेलापूर /(प्रतिनिधी)-  येथील दुकानासमोर पडलेली एक तोळ्याची अंगठी बेलापूर येथील मिठाई व्यापारी एकनाथ नागले यांनी प्रामाणिकपणे ग्राहकास परत केली असून नागले यांच्या प्रामाणिकपणाबद्दल  सर्वत्र कौतुक होत आहे.                    याबाबत माहिती अशी की बेलापूर खुर्द येथील अमोल रामनाथ पुजारी यांचे नातेवाईक संतोष दामू शिंदे व सुनील नामदेव शिंदे राहणार संगमनेर हे काही कामानिमित्त बेलापूर येथे आले होते आपले काम आटोपल्यानंतर ते बेलापूर येथील एकनाथ नागले यांच्या श्री बालाजी स्विट गोडीशेव रेवडी या दुकानात गेले त्यावेळी त्यांच्या पत्नी सौ शैलाबाई नागले या दुकानात होत्या संतोष व सुनील शिंदे यांनी नागले यांच्या दुकानात गोडीशेव व रेवडी फरसाण विकत घेतली. घेतलेल्या मालाचे पैसे देण्याकरता त्यांनी खिशातून पैसे काढले त्याच वेळेस त्यांच्या खिशात असलेले अंगठी देखील खाली पडली ही बाब त्यांच्या लक्षात आली नाही. पैसे देऊन ते निघून गेले. त्यानंतर  सौ शैलाबाई नागले यांना त्यांच्या दुकानासमोर एक अंगठी पडलेली दिसली त्यांनी ती उचलून पती एकनाथ नागले यांच्याकडे दिली. ती अंगठी सोन्याची असल्याचे नागले यांच्या लक्षात आले व आपल्या दुकानावर नुकतेच आलेले ग्राहक यांचीच ती पडली असावी अशी शंका त्यांना आली व काही तासाने शिंदे बंधु देखील या ठिकाणी येऊन अंगठीची विचारपूस करू लागले. ते प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होते. त्यावेळी नागले यांनी त्यांना सांगितले की काळजी करू नका तुमची अंगठी येथेच पडली होती आणि ती व्यवस्थित आहे त्यानंतर त्यांनी याबाबत बेलापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे यांना कल्पना दिली त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे यांच्या हस्ते ती एक तोळ्याची सोन्याची अंगठी मूळ मालक संतोष दामू शिंदे  यांना देण्यात आली. बेलापूर येथील प्रसिद्ध हलवाई श्री एकनाथ नागले व त्यांच्या पत्नी सौ शैलाबाई नागले यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

बेलापूर (प्रतिनिधी )--सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने विष्णुपंत डावरे यांच्या सौजन्याने हनुमान मंदिर बेलापूर त्याचबरोबर श्री हरिहर केशव गोविंद भगवान मंदिर व तलाठी कार्यालय बेलापूर खुर्द या ठिकाणी तीन बाक भेट देण्यात आले.                               बेलापूर खुर्द येथील कामगार तलाठी श्रीमती कातोरे मॅडम यांनी सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत डावरे यांच्याकडे खंत व्यक्त केली होती की तलाठी कार्यालयात आपल्या कामाकरिता शेतकरी येतात परंतु येथे बसण्याची गैरसोय होत आहे त्यांनी व्यक्त केलेली खंत लक्षात घेता विष्णुपंत डावरे यांनी तात्काळ त्या ठिकाणी बाकडे देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार त्यांनी बेलापूर खुर्द तलाठी कार्यालयात एक ,श्री हरिहर केशव गोविंद भगवान मंदिर येथे एक व रामगड येथील हनुमान मंदिर या ठिकाणी एक असे तीन बाकडे भेट दिले. त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच सत्यमेव जयते ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या समवेत करण्यात आला .यावेळी विष्णुपंत डावरे यांनी मनोगत  व्यक्त करताना सांगितले की आपल्याजवळ जे आहे त्याच्यातील थोडाफार जरी वाटा आपण समाजाकरता दिला तर फार मोठे समाजकार्य होऊ शकते यावेळी पत्रकार देविदास देसाई म्हणाले की आपल्याकडे नुसती संपत्ती असून चालत नाही त्यातील थोडे फार समाजाकरता देण्याची दानत पण असावी लागते आज डावरे यांनी तीन ठिकाणी नागरिकांना तसेच भाविकांना बसण्याची गैरसोय होऊ नये याकरिता बाकडे भेट दिले त्याबद्दल त्यांचा सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला या वेळी बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे ,संजय भो़ंडगे , बाबूलाल पठाण, राधेश्याम आंबीलवादे ,महेश ओहोळ, महेश कुऱ्हे ,दिलीप आमोलिक, जाकीर शेख, सचिन कणसे, बाबासाहेब काळे, इरफान जहागीरदार, सलीम शेख ,निजाम शेख, विलास नागले, इब्राहिम शेख राकेश खैरनार किरण गागरे विशाल आंबेकर आदी सह सत्यमेव जयते ग्रुपचे सदस्य उपस्थित होते

बेलापूर (प्रतिनिधी )-श्रीरामपूर येथील पत्रकार सलीम पठाण यांना झालेल्या मारहाणीचा बेलापूर व परिसरातील पत्रकारांनी तिव्र शब्दात निषेध करून मारहाण करणाऱ्यांना कठोर शासन व्हावे अशी मागणी केली आहे.                  श्रीरामपूर शहरातील पत्रकार सलीम पठाण यांना काही व्यक्तींनी जबर मारहाण केली या घटनेचा बेलापूर व  परिसरातील पत्रकारांनी तीव्र शब्दात निषेध केला असून आरोपींना तात्काळ अटक करून कडक शासन व्हावे अशी मागणी पत्रकारांनी केली आहे याबाबतचे निवेदन बेलापूर पोलीस स्टेशन येथे देण्यात आले बेलापूर पोलीस स्टेशनचे हवलदार बाळासाहेब कोळपे यांनी  निवेदन स्वीकारले यावेळी पत्रकार देविदास देसाई,असलम बिनसाद मारोतराव राशिनकर, प्राध्यापक ज्ञानेश गवले, महेश मोहोळ, दिलीप दायमा,सुहास शेलार, शरद थोरात ,भरत थोरात  आदी पत्रकार उपस्थित होते

२२ संघांचा सहभाग,दोन दिवस स्पर्धा,आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन मुलींचा सन्मान!!!धनकवडी(गौरव डेंगळे): जागतिक महिला दिनाचे औचित साधून धनकवडी येथील प्रियदर्शनी विद्या मंदिरच्या भव्य प्रांगणात ए बी एस फ स्पोर्ट क्लब व ऐश्वर्या स्पोर्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच पार पडलेल्या १४ वर्षांखालील मुलांच्या व मुलींच्या निमंत्रित व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात ए बी एस एफ तर मुलींच्या गटात मिलेनियम स्कूलने चिंतामणी चषक पटकावला, 

स्पर्धेत मुलांमध्ये निमंत्रित १२ संघ व मुलीं मध्ये निमंत्रित १० संघां नी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन प्रियदर्शिनी विद्यालया च्या मुख्याध्यापिका राजश्री दिघे व रूपाली मालुसरे यांच्या हस्ते करण्यात आले, लिघ स्वरूपाच्या स्पर्धेत दोन दिवसांमध्ये ४८ सामने झाले झाले. 

मुलांच्या गटात फुरसुंगी येथील शिवमुद्रा संघ व धनकवडीतील एबीएसएफ संघात अंतिम सामना झाला या सामन्यांमध्ये एबीएसएफ हा संघ २-० असा सरळ सेट मध्ये विजय मिळवला तर मुलींच्या संघामध्ये मिलेनियम संघाने २-० नी सामना जिंकला 

या स्पर्धेमध्ये वेदांत म्हमाणे, राजवीर भोसले तर मुलींमध्ये अकोला कोंडे, सिद्धी सनस, अमृता सिंग उत्कृष्ट खेळ करून वैयक्तिक पारितोषिक प्राप्त केले. गौरव येरावार सर्वोत्तम खेळाडू तर मुलींमध्ये देवकी राऊत हिने सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळविला. 

आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या हस्ते मैदानाचे पूजन करण्यात आले, सोबत अप्पा रेणूसे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते भाऊ मोरे, पुणे जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष उदय कड, पोलीस निरीक्षक शहाजी पवार, सेंट्रल रेल्वे प्रशिक्षक अभय कुलकर्णी, इन्कमटॅक्स प्रशिक्षक अनुराग नाईक, प्रा. निलेश जगताप, विलास घोगरे, नगरसेवक युवराज रेणुसे, दिनेश जगताप, विलासराव भणगे,गौरव डेंगळे, मयूर संचेती उपस्थित होते.

स्पर्धेचे बक्षीस वितरण ए बी एस एफ क्लबचे मार्गदर्शक रुस्तम हिंद.महाराष्ट्र केसरी पै. अमोल बुचडे व  भारती विद्यापीठचे क्रीडा संचालक डॉ. नेताजी जाधव यांचे हस्ते पार पडला. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी ए बी एस फ क्लबचे मार्गदर्शक डॉ संतोष पवार, मनोज तोडकर, संदीप भोसले, रोहित मालगावकर व ए बी एस एफ क्लब चे सर्व आजी-माजी राष्ट्रीय खेळाडू यांनी नियोजन केले.



*चौकट* - जागतिक महिला दिनानिमित्त तीन आंतरराष्ट्रीय खेळाडू सलोनी जाधव, श्रुती गोडसे, श्रेया बोरस्कर यांचा चिंतामणी ज्ञानपीठाचे संस्थापक अध्यक्ष आप्पा रेणुसे यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget