सामाजिक कार्यकर्ते डावरे यांच्याकडून बाक भेट
बेलापूर (प्रतिनिधी )--सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने विष्णुपंत डावरे यांच्या सौजन्याने हनुमान मंदिर बेलापूर त्याचबरोबर श्री हरिहर केशव गोविंद भगवान मंदिर व तलाठी कार्यालय बेलापूर खुर्द या ठिकाणी तीन बाक भेट देण्यात आले. बेलापूर खुर्द येथील कामगार तलाठी श्रीमती कातोरे मॅडम यांनी सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत डावरे यांच्याकडे खंत व्यक्त केली होती की तलाठी कार्यालयात आपल्या कामाकरिता शेतकरी येतात परंतु येथे बसण्याची गैरसोय होत आहे त्यांनी व्यक्त केलेली खंत लक्षात घेता विष्णुपंत डावरे यांनी तात्काळ त्या ठिकाणी बाकडे देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार त्यांनी बेलापूर खुर्द तलाठी कार्यालयात एक ,श्री हरिहर केशव गोविंद भगवान मंदिर येथे एक व रामगड येथील हनुमान मंदिर या ठिकाणी एक असे तीन बाकडे भेट दिले. त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच सत्यमेव जयते ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या समवेत करण्यात आला .यावेळी विष्णुपंत डावरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपल्याजवळ जे आहे त्याच्यातील थोडाफार जरी वाटा आपण समाजाकरता दिला तर फार मोठे समाजकार्य होऊ शकते यावेळी पत्रकार देविदास देसाई म्हणाले की आपल्याकडे नुसती संपत्ती असून चालत नाही त्यातील थोडे फार समाजाकरता देण्याची दानत पण असावी लागते आज डावरे यांनी तीन ठिकाणी नागरिकांना तसेच भाविकांना बसण्याची गैरसोय होऊ नये याकरिता बाकडे भेट दिले त्याबद्दल त्यांचा सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला या वेळी बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे ,संजय भो़ंडगे , बाबूलाल पठाण, राधेश्याम आंबीलवादे ,महेश ओहोळ, महेश कुऱ्हे ,दिलीप आमोलिक, जाकीर शेख, सचिन कणसे, बाबासाहेब काळे, इरफान जहागीरदार, सलीम शेख ,निजाम शेख, विलास नागले, इब्राहिम शेख राकेश खैरनार किरण गागरे विशाल आंबेकर आदी सह सत्यमेव जयते ग्रुपचे सदस्य उपस्थित होते
Post a Comment