पत्रकार पठाण यांना झालेल्या मारहाणीचा बेलापुरात निषेध
बेलापूर (प्रतिनिधी )-श्रीरामपूर येथील पत्रकार सलीम पठाण यांना झालेल्या मारहाणीचा बेलापूर व परिसरातील पत्रकारांनी तिव्र शब्दात निषेध करून मारहाण करणाऱ्यांना कठोर शासन व्हावे अशी मागणी केली आहे. श्रीरामपूर शहरातील पत्रकार सलीम पठाण यांना काही व्यक्तींनी जबर मारहाण केली या घटनेचा बेलापूर व परिसरातील पत्रकारांनी तीव्र शब्दात निषेध केला असून आरोपींना तात्काळ अटक करून कडक शासन व्हावे अशी मागणी पत्रकारांनी केली आहे याबाबतचे निवेदन बेलापूर पोलीस स्टेशन येथे देण्यात आले बेलापूर पोलीस स्टेशनचे हवलदार बाळासाहेब कोळपे यांनी निवेदन स्वीकारले यावेळी पत्रकार देविदास देसाई,असलम बिनसाद मारोतराव राशिनकर, प्राध्यापक ज्ञानेश गवले, महेश मोहोळ, दिलीप दायमा,सुहास शेलार, शरद थोरात ,भरत थोरात आदी पत्रकार उपस्थित होते
Post a Comment