श्रीरामपूर (प्रतिनिधी) - समाजाची कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस करीत असतात हे काम करीत असताना त्यांच्याकडून चुका देखील होऊ शकतात त्यावर अंकुश ठेवून योग्य पद्धतीने कामकाज होण्यासाठी पत्रकारांचे मोलाचे सहकार्य पोलिसांना मिळत असते.कायदा व सुव्यवस्था राखण्यामध्ये पत्रकारांचे देखील मोलाचे योगदान आहे.काही प्रकरणांमध्ये कोकणीचा बाळगणे आवश्यक असल्याने पत्रकारांना विनंती केल्यानंतर ते सहकार्य करतात त्यामुळे आम्हाला देखील काम करताना पत्रकारांची साथ महत्त्वाची असते असे प्रतिपादन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी केले.
पत्रकार दिनानिमित्ताने शहर पोलीस स्टेशनमध्ये आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी संपादक बाळासाहेब आगे होते. या वेळी पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब मगरे व पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके जेष्ठ पत्रकार प्रमाण मुद्दा संपादक करण नवले सुभाष नन्नवरे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
श्री देशमुख पुढे म्हणाले की शहरात कायदा सुव्यवस्था राखताना पत्रकारांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केले आहे आणि गोष्टींकडे ते आमचे लक्ष वेधत असतात काही बाबी आमच्या लक्षात आणून देतात चुकीचा असेल तर त्यावर टीका देखील करतात परंतु सुदृढ प्रशासनासाठी या बाबी आवश्यक आहेत श्रीरामपूरचे पत्रकारांचे पोलीस खात्याला नेहमी सहकार्य आहे ते पुढे मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार रमण मुथा यांनी सध्या शहरांमध्ये अनेक प्रश्न आहेत त्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे पूर्वीच्या काळी असणारी कामकाजाची पद्धत आता बदलली आहे त्यामुळे पत्रकार आणि पोलीस यांनी एकमेकाला सहकार्य करणे आवश्यक आहे असे सांगितले.
मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सलीमखान पठाण यांनी शहरातील कायद्यावर सुव्यवस्थेकडे लक्ष वेधताना गेल्या वर्षभरामध्ये शहरामध्ये अनेक स्फोटक प्रसंग आले मात्र पोलीस निरीक्षक देशमुख व त्यांच्या सर्व टीमने अतिशय कुशलतेने परिस्थिती हाताळली त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले सन आणि उत्सवाच्या प्रसंगी झेंडे लावणे गैर नाही मात्र त्याला काल मर्यादा असावी शिवाजी चौक सय्यद बाबा चौक आणि मौलाना आझाद चौकामध्ये लावलेले झेंडे काढून घेणे आवश्यक आहे अन्यथा या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे अशी सूचना केली.
संपादक करण नवले यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात आता सायबर सेलची आवश्यकता भासत आहे कारण सायबर क्राईम मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे या संदर्भात नवीन तंत्रज्ञान व पोलीस तपासासाठी पत्रकार व पोलिसांची एखादी कार्यशाळा आयोजित करावी अशी सूचना केली.
जय सावंत यांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि पोलिसांचे सलोख्याचे संबंध आहेत आम्हाला पोलिसांचे सहकार्य मिळते तसेच आमच्या सूचना देखील विचारात घेतल्या जातात फक्त एक दिवस कौतुक न करता वर्षभर असे सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना बाळासाहेब आगे यांनी श्रीरामपूरची परिस्थिती आता बदलली आहे राखीव मतदार संघ असल्याने पूर्वीसारख्या संघर्ष येथे नसला तरी मागील काही काळामध्ये शहराच्या कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत परंतु पोलिसांनी योग्य रीतीने परिस्थिती हाताळल्याने शहर शांत राहिले आगामी काळात नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्या दृष्टीने पोलिसांनी प्रत्येक भागामध्ये शांतता कशी राहील याकडे लक्ष द्यावे अशी सूचना केली.
याप्रसंगी उपस्थित पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोकराव गाडेकर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश रक्ताटे जेष्ठ पत्रकार रमण मुथा करण नवले प्रदीप आहेर सलीमखान पठाण महेश माळवे अनिल पांडे मधुकर माळवे गौरव साळुंके सचिन उघडे राजेंद्र बोरसे मामा विशाल वर्धावे स्वप्निल सोनार स्वामीराज कुलथे जयेश सावंत असलम दिवसात शफिक पठाण विजया बारसे व इतर उपस्थित पत्रकाराचा पोलीस निरीक्षक देशमुख उपनिरीक्षक मगरे सोळुंके आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांनी मानले.