Latest Post

बेलापूर (प्रतिनिधी)-बेलापूर खुर्द येथील सहयोग सामाजिक मंचच्या वतीने मारुती मंदिर बेलापूर खुर्द येथे भाविकांना बसण्यासाठी दोन बाक त्याचबरोबर बेलापूर खुर्द येथील स्मशानभूमीकरिता दोन बाक व  एक तिरडी तसेच शिकळी प्रदान करण्यात आली.               बेलापूर खुर्द येथील सहयोग सामाजिक  मंच नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असते गावात होणारे निधन व त्यानंतर नातेवाईकांची होणारे धावपळ हे लक्षात घेऊन सहयोग सामाजिक मंचने बेलापूर खुर्द येथील ग्रामपंचायतीला एक तिरडी व शीकळी प्रदान केली तसेच बेलापूर खुर्द येथील मारूती  मंदिरात दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांसाठी बसण्याकरता दोन बाक व बेलापूर खुर्द येथील स्मशानभूमीसाठी दोन बाक भेट देण्यात आले. यावेळी सहयोग सामाजिक मंचचे ज्येष्ठ सदस्य पंढरीनाथ बोर्डे ज्ञानदेव महाडिक बाबुराव फुंदे भाऊसाहेब म्हसे जगन्नाथ महाडिक पुंजाहरी सुपेकर गुरुजी नंदकुमार कुर्हे अशोक सुळ अशोक क्षीरसागर सहयोग पुरुष बचत गटाचे अध्यक्ष प्रशांत बडदे उपसरपंच दीपक बारहाते ग्रामपंचायत सदस्य नयनाताई बडदे राणीताई पुजारी ग्राम विकास अधिकारी तुकाराम जाधव निलेश बडदे जगन्नाथ बडदे विलास भालेराव अर्जुन गोरे सुनील बाराते जगन्नाथ बडदे आधीच ग्रामस्थ उपस्थित होते. सहाय्यक सामाजिक सहयोग मंचावतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले

रयत शिक्षण संस्था, साताराच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालय, कोल्हार बुद्रुक येथील तांत्रिक विभागाचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी समर्थ धनंजय शिरसाठ याने तयार केलेला डायनॅमिक सायकलचा प्रोजेक्ट अहिल्यानगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनामध्ये तृतीय क्रमांक मिळाला. या विद्यार्थ्याला तांत्रिक विभागाचे शिक्षक शुभम पवार, ऋषिकेश जाधव, राजेंद्र चव्हाणके, मुख्याध्यापिका संजीवनी आंधळे, प्र. पर्यवेक्षक शब्बीर शेख यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाच्या प्र. मुख्याध्यापिका संजीवनी आंधळे, प्र. पर्यवेक्षक शब्बीर शेख, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव बी. एन. पवार, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष ॲड. सुरेंद्र खडे पाटील, जनरल बॉडी सदस्य रावसाहेब म्हस्के, स्थानिक स्कूल सदस्य बी. के. खर्डे, अजीत मोरे, अशोक आसावा, रविंद्र देवकर, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी नाईकवाडी, श्री. तोरणे यांसह सर्व शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

बेलापूर (वार्ताहर)श्रीरामपूर तालुका सहकारी फेडरेशनच्या वतीने  पहिल्या गटात गावकरी सहकारी पतसंस्थेला श्रीरामपूर  तालुक्यातील सर्वोत्तम कार्यक्षम पतसंस्था म्हणून प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.यावेळी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक व तालुका फेडरेशनचे अध्यक्ष वासुदेव काळे , अनिरुद्ध महाले, याकुबभाई बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथील गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्षा सौ.राजश्री पाटील आणि श्रीमंत थोरले बाजीराव पतसंस्थेचे चेअरमन नारायण वाझे यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक चेअरमन साहेबराव वाबळे यांच्यासह संचालक मंडळाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.कार्यक्रमास सर्वश्री संचालक व्हा.चेअरमन रामेश्वर सोमाणी,जालिंदर पा. कु-हे, शशिकांत उंडे, जनार्दन ओहोळ, रावसाहेब अमोलीक,अजीज शेख, कुलकर्णी यांच्यासह व्यवस्थापक व सेवकवृंद उपस्थीत होते. या सुयशाबद्दल सभासद, खातेदार आणि ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळीभान या ठिकाणी भेट दिली आसता त्या ठिकाणी वृत्तपत्रात प्रसिध्द झालेली  प्रसूती महिलेची झालेले हेडसांड या आशयाच्या बातमीच्या अनुषंगाने भेट दिली असता दोन्ही वैद्यकीय अधिकारी आपल्या कर्तव्यावर  हजर नसल्याचे आढळून आले प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये केवळ तीनच कर्मचारी हजर होते परंतु बातमीदार आल्याचे समजतात हळूहळू एक एक जण गोळा होऊ लागले मागील महिन्यात परिसरातील रात्री प्रसुती रुग्ण महिला बेलपिंपळगाव तालुका नेवासा येथून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसूतीसाठी रात्री साडेनऊ वाजता आल्याचे समजले त्यावेळी त्यांना निवासी सिस्टर यांनी तपासले होते त्यानंतर तिला प्रसूतीला वेळ लागेल व पोटात दुखत असल्यामुळे तिला ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर या ठिकाणी संदर्भित केले सदर रुग्णाला घेऊन जाण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ॲम्बुलन्स त्यांनी मागणी केली त्यावेळी त्या ठिकाणी ड्रायव्हर उपस्थित होते त्यांनी गाडीची चावी यापूर्वी त्या ठिकाणी काम करत असणाऱ्या स्थानिकप्राथमिक आरोग्य केंद्रात राहणाऱ्या सिस्टर यांच्याकडे स्थानिक वैद्यकीय अधिकारी यांच्या आदेशाने जमा केली असल्याची माहिती मिळाली 


या संदर्भात महिला पेशंटच्या नातेवाईकांनी त्यांना विनंती करून देखील त्यांनी अंबुलन्स दिली नसल्याची माहिती वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती त्या ठिकाणी कंत्राटी बेसवरील कर्मचारी ड्रायव्हर यांची ऑर्डर संपलेली होती त्यामुळे त्यांनी रुग्णास ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन जाण्यास नकार दिला त्यामुळे रुग्ण हे गावातील एका व्यक्तीच्या वाहनाने ग्रामीण रुग्णालय पोहोचले त्या ठिकाणी सदर रुग्नेची लगेच प्रसूती झाली नाही तिची प्रसूती ही चवथ्या पाचव्या दिवशी संध्याकाळी झाली असल्याची माहिती पंचायत समिती तालुका आरोग्य अधिकारी डॉकटर मोहन शिंदे यांच्याकडे संपर्क साधला असता मिळाली या वेळी बातमीत सत्यता नसून बातम्या कुठल्याही प्रकारची शहानिशा झाली नाही

असे डॉक्टर शिंदे यांनी सांगितले तसेच या टाकळीभान प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर अनेक वेळा गैर हजर राहतात याविषयी माहिती विचारली आसता या संदर्भात आपण वरिष्ठांना पत्रव्यवहार पूर्वीही वेळोवेळी केल्याचे त्यांनी सांगितले


बेलापूरःआज माणूस भौतिक  सुखाच्या मोहजालात अडकल्याने त्याचे जिवन कष्टमय बनले आहे.यातून बाहेर पडून जगणे सकारात्मक करणे हाच जिवन आनंदी  करण्याचा मंञ असल्याचे प्रतिपादन बेलापूर पञकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे यांनी केले.                               साविञीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आर.बी.एन.बी काॕलेज व स्वामी सहजानंद भारती काॕलेज आॕफ एज्युकेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित शिबिरात "जिवन जगण्याची कला"या विषयावर श्री.खंडागळे प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते.यावेळी प्रा.डाॕबाबासाहेब तोंडे,प्रा.डाॕ.भागवत शिंदे,प्रा.डाॕ जलाल पटेल,प्रा.डाॕ.किरण थोरात,प्र.किर्ती अमोलिक ,प्रा.वैशाली वाघ,प्रा.डाॕ.मेघराज औटी उपस्थित होते.                                                                  श्री.खंडागळे म्हणाले की,आधुनिक भौतिक साधनांनी मानवी जिवन बदलून टाकले आहे.या साधनांनी मानवी भौतिक सुखी झाला असला तरी तो मानसिक सुखाला पारखा झाला आहे.माणसातील संवाद हरपला असून जगण्यात कृञिमपणा आला आहे.आज पैशाला नको इतके महत्त्व प्राप्त झाल्याने पैशासाठी जिवघेणी स्पर्धा सुरु झाली आहे.या स्पर्धेत ख-या जगण्याची घुसमट होत आहे.                                                                                      जिवन हे अतिशय सुंदर आहे आणि ते आनंदाने कसे जगावे हे आपल्या हाती आहे.आजकाल माणसे चिंता विकत घेतात घेतात.यामुळे तो दुःखी होतो.जगण्यातला विनोदही हरवत चालला आहे.खरे तर विनोद हे अत्यंत चांगले औषध असून विनोदामुळे जगणे सुसह्य होते.विनादामुळे व हसत खेळत राहिल्याने नकारात्मक विचारांना तिलांजली मिळते.कोणतीही हाव न धरता आणि भौतिक साधनांच्या मागे न पळता सकारात्मकतेने जगणे हा आनंदी जीवनाचा मंञ आहे असे श्री.खंडागळे यांनी अनेक मजेदार किस्से सांगून विशद केले त्यास विद्यार्थ्यांनी मनमुराद दाद दिली.                                                                                       प्रा.डाॕ.भागवत शिंदे यांनी अतिथी परिचय करुन दिला , देविदास गावित याने सूञसंचलन केले तर प्रा.डाॕ.किरण थोरात यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी अध्यापकांसह विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी आदी उपस्थित होते.आज गुरुवार (ता.९)रोजी सकाळी १० वा.शिबिराचा मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - समाजाची कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस करीत असतात हे काम करीत असताना त्यांच्याकडून चुका देखील होऊ शकतात त्यावर अंकुश ठेवून योग्य पद्धतीने कामकाज होण्यासाठी पत्रकारांचे मोलाचे सहकार्य पोलिसांना मिळत असते.कायदा व सुव्यवस्था राखण्यामध्ये पत्रकारांचे देखील मोलाचे योगदान आहे.काही प्रकरणांमध्ये कोकणीचा बाळगणे आवश्यक असल्याने पत्रकारांना विनंती केल्यानंतर ते सहकार्य करतात त्यामुळे आम्हाला देखील काम करताना पत्रकारांची साथ महत्त्वाची असते असे प्रतिपादन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी केले.

पत्रकार दिनानिमित्ताने शहर पोलीस स्टेशनमध्ये आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी संपादक बाळासाहेब आगे होते. या वेळी पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब मगरे व पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके जेष्ठ पत्रकार प्रमाण मुद्दा संपादक करण नवले सुभाष नन्नवरे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

श्री देशमुख पुढे म्हणाले की शहरात कायदा सुव्यवस्था राखताना पत्रकारांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केले आहे आणि गोष्टींकडे ते आमचे लक्ष वेधत असतात काही बाबी आमच्या लक्षात आणून देतात चुकीचा असेल तर त्यावर टीका देखील करतात परंतु सुदृढ प्रशासनासाठी या बाबी आवश्यक आहेत श्रीरामपूरचे पत्रकारांचे पोलीस खात्याला नेहमी सहकार्य आहे ते पुढे मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार रमण मुथा यांनी सध्या शहरांमध्ये अनेक प्रश्न आहेत त्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे पूर्वीच्या काळी असणारी कामकाजाची पद्धत आता बदलली आहे त्यामुळे पत्रकार आणि पोलीस यांनी एकमेकाला सहकार्य करणे आवश्यक आहे असे सांगितले.

मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सलीमखान पठाण यांनी शहरातील कायद्यावर सुव्यवस्थेकडे लक्ष वेधताना गेल्या वर्षभरामध्ये शहरामध्ये अनेक स्फोटक प्रसंग आले मात्र पोलीस निरीक्षक देशमुख व त्यांच्या सर्व टीमने अतिशय कुशलतेने परिस्थिती हाताळली त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले सन आणि उत्सवाच्या प्रसंगी झेंडे लावणे गैर नाही मात्र त्याला काल मर्यादा असावी शिवाजी चौक सय्यद बाबा चौक आणि मौलाना आझाद चौकामध्ये लावलेले झेंडे काढून घेणे आवश्यक आहे अन्यथा या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे अशी सूचना केली.

संपादक करण नवले यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात आता सायबर सेलची आवश्यकता भासत आहे कारण सायबर क्राईम मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे या संदर्भात नवीन तंत्रज्ञान व पोलीस तपासासाठी पत्रकार व पोलिसांची एखादी कार्यशाळा आयोजित करावी अशी सूचना केली.

जय सावंत यांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि पोलिसांचे सलोख्याचे संबंध आहेत आम्हाला पोलिसांचे सहकार्य मिळते तसेच आमच्या सूचना देखील विचारात घेतल्या जातात फक्त एक दिवस कौतुक न करता वर्षभर असे सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

अध्यक्षस्थानावरून बोलताना बाळासाहेब आगे यांनी श्रीरामपूरची परिस्थिती आता बदलली आहे राखीव मतदार संघ असल्याने पूर्वीसारख्या संघर्ष येथे नसला तरी मागील काही काळामध्ये शहराच्या कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत परंतु पोलिसांनी योग्य रीतीने परिस्थिती हाताळल्याने शहर शांत राहिले आगामी काळात नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्या दृष्टीने पोलिसांनी प्रत्येक भागामध्ये शांतता कशी राहील याकडे लक्ष द्यावे अशी सूचना केली.

याप्रसंगी उपस्थित पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोकराव गाडेकर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश रक्ताटे जेष्ठ पत्रकार रमण मुथा करण नवले प्रदीप आहेर सलीमखान पठाण महेश माळवे अनिल पांडे मधुकर माळवे गौरव साळुंके सचिन उघडे राजेंद्र बोरसे मामा विशाल वर्धावे स्वप्निल सोनार स्वामीराज कुलथे   जयेश सावंत असलम दिवसात शफिक पठाण विजया बारसे व इतर उपस्थित पत्रकाराचा पोलीस निरीक्षक देशमुख उपनिरीक्षक मगरे सोळुंके आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांनी मानले.

बेलापूर*(प्रतिनिधी)-वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथे कार्यरत असणारे राजेंद्र सखाराम कासोदे यांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली असून त्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे राजेंद्र कासोदे  हे मूळचे आगर वाडगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथील रहिवासी असून सन 1990 मध्ये ते छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस भरती झाले होते सन 1990 ते 1993 त्यांनी पोलीस मुख्यालय येथे सेवा केली त्यानंतर सन 1993 ला एस आय डी मुंबई यांचे मार्फत बॉम्बशोधक पथकात काम केले 1997 ला महामार्ग रस्ता सुरक्षा पथक ट्रॅफिक मध्ये सेवा केली 2000 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा कार्यालयामध्ये सेवा केली 2004 ते 2009 ग्रामीण ट्रॅफिक पोलीस म्हणून सेवा केली 2009 ते 2014 छत्रपती संभाजीनगर येथे बॉम्बशोधक पथकात सेवा केली 2014 ते 2021पोलीस स्टेशन विरगाव येथे सेवा केली 2021 ते 2024 त्यांनी पोलीस स्टेशन वैजापूर येथे काम केले त्यांना  नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली असून आपल्या समाजाच्या दृष्टीने ही एक आनंदाची बाब आहे त्यांच्या हातून अशी सेवा घडो सदिच्छा अनेक नियुक्ती केली कासोदे यांना मिळालेल्या बढतीबद्दल अनेकांनी त्यांच्या अभिनंदन केले आहे

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget