Latest Post

!२० डिसेंबर २०२२ रोजी भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतचा कार अपघात झाला होता. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला.यामुळे पंत एक वर्षाहून अधिक काळ क्रिकेटपासून दूर राहिला आणि एकदिवसीय विश्वचषक खेळू शकला नाही. आता पंतने सांगितले की तीन चमत्कारांमुळे तो पुन्हा खेळण्याच्या स्थितीत आहे.

२०२२ मध्ये एका भीषण कार अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतने सांगितले की,त्या अपघातानंतर 'तीन चमत्कारांनी' त्याचे आयुष्य आणि करिअर वाचवले.आप की अदालत या कार्यक्रमात ऋषभने हे सांगितले.

पंत म्हणाला,मला बरे होण्यासाठी दोन ते तीन वर्षे लागतील,असे डॉक्टरांनी सांगितले होते. माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर दिनशा पार्डीवाला यांनी खूप छान काम केले.ते माझ्याकडे आला आणि म्हणाले,ऋषभ बघ,तुला ३ चमत्कार हवे आहेत. तु आधीच २ चमत्कार केले आहेत.पहिले म्हणजे,तू अपघातातून वाचलात,दुसरे म्हणजे, तुमचा उजवा गुडघा जो ९० अंश उजवीकडे वळला होता, तो अपघातानंतर लगेचच कोणाच्या तरी मदतीने पुन्हा जागी ठेवण्यात आला.त्याने हे सर्व केले नसते तर तुम्ही अपंग होऊ शकले असते.तु आधीच दोन चमत्कार केले आहेत,आता ACL (Anterior Cruciate Ligament) आणि PCL (Posterior Cruciate Ligament) साठी शस्त्रक्रिया झाली नाही तर हा तिसरा चमत्कार असेल.


#पंत_भाग्यवान_होता!

ऋषभ पुढे म्हणाला,माझे लिगामेंट खराब झाले होते, काहीही राहिले नाही.मी डॉक्टरांना म्हणालो,साहेब काळजी करू नका.मी पण हे करेन.हा तिसरा चमत्कार होता कारण डॉक्टरांनी मला सांगितले की लाखो केसेसपैकी फक्त काही केसेस आहेत ज्यात ACL आणि PCL दोन्ही स्वतःहून बरे होतात. देव खूप दयाळू होता.एसीएल आणि पीसीएल दोन्ही स्वतःहून बरे झाले.पुन्हा क्रिकेट खेळण्याच्या प्रश्नावर पंत म्हणाला, एक-दोनदा मला असे वाटले की मी पुन्हा खेळू शकणार नाही,पण मी ते स्वीकारण्यास मानसिकदृष्ट्या तयार नव्हते.हळूहळू व्यायाम करण्यास सुरुवात केली.शरीर साथ देण्यास सुरुवात झाली एक नवीन आशा पल्लवीत झाली की आता आपण क्रिकेटमध्ये पुन्हा पुनरागमन करू शकतो.जिद्दीने वेदनावर मात करीत क्रिकेटच्या सरावाला सुरुवात केली.असंख्य वेदना होत असताना देखील जिद्द सोडली नाही.हळूहळू क्रिकेटचे सामने खेळण्यास सुरुवात केली.सराव सामन्यांमध्ये प्रदर्शन चांगलं होत गेले. दिल्ली कॅपिटल संघाकडून कर्णधारपद मिळाले.निश्चय केला होता की आयपीएलमध्ये अफलातून प्रदर्शन करायचे व टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळायचे.डीसी संघाचा कर्णधार म्हणून खेळताना पंतने आयपीएल २०२४ मध्ये शानदार कामगिरी केली आहे.त्याने १० सामन्यांमध्ये ४६.३८ च्या सरासरीने आणि १६०.६० च्या स्ट्राइक रेटने ३७१ धावा केल्या आहेत.ऑरेंज कॅप शर्यतीच्या यादीत डावखुरा फलंदाज सहाव्या क्रमांकावर होता.आयपीएल मधल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर त्याने T-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघामध्ये स्थान पटकाविले. आयर्लंड विरुद्ध पहिल्या सामन्यात ३६ धावा तर पाकिस्तान विरुद्ध दुसऱ्या सामन्यांमध्ये ४२ धावांची विजयी खेळी केली.

बेलापूरःशानिजयंती निमित्त बेलापूर येथे याञोत्सव संपन्न होत आहे.यानिमित्त गावकरी मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने 'ग्रामोत्सव २०२४' चे आयोजन करण्यात आले आहे.                                                            शनिजयंतीनिमित्त शनैश्वर देवतेला आज (गुरुवारी)दहावी व बारावीचे गुणवंत विद्यार्थी ओंकार रावताळे,शिवराज नवले,पवन बावचे,अजय चव्हाण यांचे हस्ते अभिषेक करण्याचा अभीनव उपक्रम पार पडला.                                                        शनिवार(ता.८)रोजी   दुपारी ४ वा. जि.प.मराठी शाळेच्या मैदानावर  कुस्त्यांचा हगामा होणार आहे. कुस्त्यांमध्ये सहभागी होणाऱ्या मल्लांना योग्य ती बिदागी आयोजकां कडून देण्यात येणार आहे.अनेक वर्षांनंतर कुस्यांचा हगामा होत असून यात नामांकित मल्ल सहभागी होणार असल्याने  ग्रामस्थांना उत्कंठा आहे.तर सोमवार (ता.१०)रोजी सायं.६ वा. वाबळे पाटील मैदान, अरुण कुमार वैद्य पथ येथे क्रांतीनाना  मळेगावकर(ठाणे)प्रस्तुत होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा हा महिलांसाठी चा मनोरंजनात्मक  कार्यक्रम संपन्न होणार आहे.या कार्यक्रमात सहभागी होऊन विजेत्या होणाऱ्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.या कार्यक्रमा साठी राजस्थानी गृह उद्योग चे विशेष सहकार्य लाभले आहे.तरी ग्रामस्थ व पंचक्रोशितील भाविकांनी याप्रसंगी उपस्थित राहावे असे आवाहन गावकरी मंडळ  व ग्रामस्थांनी केले आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता दहावी परिक्षेच्या निकालात अन्वय क्लासेसच्या सर्वच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असुन अन्वय क्लासेसचा निकाल हा १०० % लागला असल्याचे क्लासच्या संचालिका सौ  भक्ती गवळी यांनी सांगितले  ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक स्वर्गीय नामदेवराव देसाई यांची कन्या सौ.भक्ति किशोर गवळी यांनी सुरु केलेल्या अन्वय क्लासेसचा निकाल या ही वर्षी शंभर टक्के लागला  नुकत्याच पार पडलेल्या दहावी च्या परिक्षेत ओझर येथील माधवराव बोरस्ते विद्यालयातील अन्वय क्लासेसची विद्यार्थीनी कु.मैथिली प्रदीप घोडेकर विद्यालयात प्रथम आली.तसेच  कु.साक्षी काळे ही हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या शाळेची विद्यार्थिनी केंद्रात प्रथम आली आहे. एअर फोर्स जिथे फक्त एअर फोर्स  कंपनीतील मुलांना ऍडमिशन मिळते असे सर्वात अवघड सीबीसी पॅटर्न मधले विद्यालय म्हणजे केंद्रीय विद्यालय एअर फोर्स चा विद्यार्थी ज्ञानदीप पाटील याने 93% मार्क मिळवुन विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला तसेच  एअरफोर्स विद्यालयातील विद्यार्थी अर्णव श्रीवास्तव याने 92 टक्के गुण मिळवुन द्वितीय क्रमांक पटकावला या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अन्वय क्लासच्या वतीने  सौ.भक्ती किशोर गवळी यांनी केला  या वेळी क्लासेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना सॅमसंग कंपनीचा टॅब आणि स्मार्ट वॉच देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला .

सौ भक्ती किशोर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली अन्वय क्लासेसमध्ये  दर वर्षी तीनशे विद्यार्थी शिक्षण घेत असतात.

राहाता प्रतिनिधी:सध्याचा तरुण वर्ग हा मोठ्या प्रमाणात पत्रकारीतेकडे वळत असुन आपल्या उज्वल करिअरची संधी निर्माण करु पाहत आहे, करीता विविध वर्तमानपत्रे,न्यूज पोर्टल्स, न्यूज चॅनल्सद्वारे क्षणात,गांव परिसराची/ तालुका,शहराची यासोबतच संपूर्ण जगाची खबरबात मिळणे आगदी सोपे झालेले आहे. यातच काही नवोदित पत्रकारांनी देखील मोठी आगेकुच केली असल्याचे बघावयास मिळत आहे,मात्र निम हकीम खतरे जान  (वैद्य जर परिपूर्ण नसला तर त्याने दिलेले औषधं खाल्याने जीवावर बेतू शकते) याच उक्ती प्रमाणे जर पत्रकार देखील तसाच कमी माहितीगार असल्यास त्याने केलेली बातमी त्याच्या अंगलट येवू शकते, म्हणून खास यासाठीच स्वाभिमानी संपादक सेवा संघ संचलित इलेक्ट्रॉनिक ॲण्ड प्रिंट मिडिया यांचे संयुक्त विद्यमाने इलेक्ट्रॉनिक आणी प्रिंट मिडिया क्षेत्रातील नवोदित पत्रकारांना प्रबोधनत्मक मार्गदर्शन कार्यशाळेचे वेळोवेळी आयोजन केले जाते आहे.

प्रिंट मिडियासाठी बातमी कशी लिहावी,बातमीसाठी फोटो कसे असावे त्याकरीता कोणते ॲंगल वापरावे यासोबतच बातमी लिहिताना कोणकोणत्या प्रकारची खबरदारी घेण्यात यावी आदी विषयांवर स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांचे तर इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी बातमी करताना शुटिंग (व्हॅयूज्वल) कसे असावे,ॲंगल कसे असावे किती.दुर, किती जवळ, आवाज स्पष्ट असण्याकरीता काय पद्धत वापरावी बातमीसाठी स्क्रीप्ट कशी थोड्याच शब्दात असावी बातमी चलतचित्रामागे व्हाईस (आवाज) कसा असावा आदी विषयांवर स्वाभिमानी संपादक सेवा संघ संचलित इलेक्ट्रॉनिक मिडिया सेल चे प्रदेशाध्यक्ष असलमभाई बिनसाद यांचेकडून सुयोग्य मार्गदर्शन लाभते, ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभराच्या विविध जिल्हा आणी तालुकास्तरावर अनेक शेकडो असे दैनिक, साप्ताहिक,पाक्षिक, मासिक वर्तमानपत्र यासोबच हजारो संपादक जोडले गेलेले आहेत.

त्याच प्रमाणे असलमभाई बिनसाद यांचे कार्य देखील मोठे विशाल आहे, राज्यभरातील विविध ठिकाणी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मिडिया क्षेत्रातील युट्यूब चॅनल संपादकांना मोठे पाठबळ दिलेले आहे, इलेक्ट्रॉनिक मिडिया क्षेत्रातील नुतन संपादकांच्या या विषयीच्या कोणत्याही जटील समस्या असल्यास ते केवळ एका फोन कॉल वर सॉल करुन देतात ही त्यांची मोठी महारथ आहे, म्हणून शौकतभाई शेख आणी असलमभाई बिनसाद यांच्या  निर्पेक्ष एकाविचाराने इलेक्ट्रॉनिक ॲंड प्रिंट मिडिया क्षेत्रातील नवोदित पत्रकार, संपादकांसाठी वेळोवेळी श्रीरामपूर येथील स्वाभिमानी संपादक सेवा संघाच्या प्रमुख कार्यालयात विनामूल्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असते. यासोबतच नवीन वर्तमानपत्र किंवा न्यूज पोर्टल/ न्यूज चॅनल सुरु करण्यासाठी तथा त्यांची अत्यल्प दरात सर्व्हिस मिळविण्यासाठी देखील सुयोग्य मार्गदर्शन केले जाते.ज्या कोणास आवश्यकता आहे तथा जे कोणी पत्रकारिता क्षेत्रात आपले करिअर घडविण्याची आपल्या उराशी इच्छा बाळगतात त्यांनी जरुर *9561174111* या क्रमांकावर संपर्क करुन सदरील वेळोवेळी होत असलेल्या या शिबीराचा आवश्य लाभ घ्यावा असे इलेक्ट्रॉनिक ॲंड प्रिंट मिडिया च्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-श्रीरामपुर तालुक्यातील नाऊर सारख्या ग्रामीण भागातुन शिक्षण घेवुन देखील चिरंजीव अनिकेत नवनाथ देसाई याने अकाऊंट या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवुन राज्यात  प्रथम येण्याचा बहुमान मिळवीला आहे               अनिकेत देसाई याने चंद्ररुप डाकले जैन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना इयत्ता बारावीच्या परिक्षेत एकुण ८५ % गुण मिळवीले तसेच अकाऊंट या विषयात १०० पैकी १०० गुण मीळवुन राज्यात पहीला आला आहे अनिकेत नवनाथ देसाई  हा पत्रकार देविदास देसाई यांचा पुतण्या आहे. सी डी जैन महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ,सुहास निंबाळकर जी एस  क्षिरसागर सर व्ही बी दळवी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले . त्याच्या यशाबद्दल आमदार लहु कानडे साईबाबा संस्थानचे मा. विश्वस्त सचिन गुजर अशोक उद्योग समुहाचे सर्वेसर्वा भानुदास मुरकुटे  पत्रकार देविदास देसाई भास्कर खंडागळे दिलीप दायमा सुहास शेलार असलम बिनसाद सदिंप जगताप आदिंनी अभिनंदन केले आहे ,

बेलापुर (प्रतिनिधी  )-नुकत्याच झालेल्या सीबीएसई परिक्षेत बेलापुरची कन्या भुमी सुभाष आमोलीक हीने पद़्श्री विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या इंग्लीश मिडीयम स्कूल मधुन प्रथम क्रमांक  मिळवीला असुन तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.           बेलापुरच्या प्रथम नागरीक सरपंच स्वाती अमोलीक यांची बहीण तसेच येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष आमोलीक यांची कन्या भूमी हीने सीबीएसई परिक्षेत ९६.२ टक्के गुण मिळवुन विळद घाट येथील विखे पाटील फाऊंडेशनच्या इंग्लिश मिडीयम स्कूलमधुन प्रथम क्रमांक मिळवीला .तिच्या यशाबद्दल बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे जि प सदस्य शरद नवले बाजार समीतीचे उपसभापती अभिषेक खंडागळे सरपंच स्वाती अमोलीक उपसरपंच मुस्ताक शेख आदिंनी अभिनंदन  केले आहे.

बेलापुर (प्रतिनिधी  )-जोरदार आलेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर बेलापुर खूर्द येथील हरिश्चंद्र दगडू पुजारी यांची दिड एक केळीची बाग भुईसपाट झाली आहे .बेलापुर खुर्द येथील शेतकऱ्याच्या दिड एकर क्षेत्रात असलेली केळीची बाग पुर्णतः उध्वस्त झाली दिड एकर क्षेत्रात २०० झाडाची लागवड केलेली होती त्या बागेतील  केळी तयार झाली होती काल आलेल्या जोरदार वादळामुळे त्यांची दिड एकर बागेतील सर्व केळीची झाडे जमीनीवर झोपली त्यामुळे पुजारी यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे तसेच अनेक शेतकऱ्यांचे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी झाडाखाली कैऱ्यांचा सडा पहावयास मिळाला वादळी वाऱ्याबरोबर आलेल्या पावासामुळे अनेक शेतकऱ्यांचा शेतात असलेला कांदाही भिजला

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget