अशक्य ही शक्य करणारा ऋषभ पंत,गंभीर जखमी झाला असताना देखील केले राष्ट्रीय संघात धमाक्यात पुनरागमन

!२० डिसेंबर २०२२ रोजी भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतचा कार अपघात झाला होता. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला.यामुळे पंत एक वर्षाहून अधिक काळ क्रिकेटपासून दूर राहिला आणि एकदिवसीय विश्वचषक खेळू शकला नाही. आता पंतने सांगितले की तीन चमत्कारांमुळे तो पुन्हा खेळण्याच्या स्थितीत आहे.

२०२२ मध्ये एका भीषण कार अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतने सांगितले की,त्या अपघातानंतर 'तीन चमत्कारांनी' त्याचे आयुष्य आणि करिअर वाचवले.आप की अदालत या कार्यक्रमात ऋषभने हे सांगितले.

पंत म्हणाला,मला बरे होण्यासाठी दोन ते तीन वर्षे लागतील,असे डॉक्टरांनी सांगितले होते. माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर दिनशा पार्डीवाला यांनी खूप छान काम केले.ते माझ्याकडे आला आणि म्हणाले,ऋषभ बघ,तुला ३ चमत्कार हवे आहेत. तु आधीच २ चमत्कार केले आहेत.पहिले म्हणजे,तू अपघातातून वाचलात,दुसरे म्हणजे, तुमचा उजवा गुडघा जो ९० अंश उजवीकडे वळला होता, तो अपघातानंतर लगेचच कोणाच्या तरी मदतीने पुन्हा जागी ठेवण्यात आला.त्याने हे सर्व केले नसते तर तुम्ही अपंग होऊ शकले असते.तु आधीच दोन चमत्कार केले आहेत,आता ACL (Anterior Cruciate Ligament) आणि PCL (Posterior Cruciate Ligament) साठी शस्त्रक्रिया झाली नाही तर हा तिसरा चमत्कार असेल.


#पंत_भाग्यवान_होता!

ऋषभ पुढे म्हणाला,माझे लिगामेंट खराब झाले होते, काहीही राहिले नाही.मी डॉक्टरांना म्हणालो,साहेब काळजी करू नका.मी पण हे करेन.हा तिसरा चमत्कार होता कारण डॉक्टरांनी मला सांगितले की लाखो केसेसपैकी फक्त काही केसेस आहेत ज्यात ACL आणि PCL दोन्ही स्वतःहून बरे होतात. देव खूप दयाळू होता.एसीएल आणि पीसीएल दोन्ही स्वतःहून बरे झाले.पुन्हा क्रिकेट खेळण्याच्या प्रश्नावर पंत म्हणाला, एक-दोनदा मला असे वाटले की मी पुन्हा खेळू शकणार नाही,पण मी ते स्वीकारण्यास मानसिकदृष्ट्या तयार नव्हते.हळूहळू व्यायाम करण्यास सुरुवात केली.शरीर साथ देण्यास सुरुवात झाली एक नवीन आशा पल्लवीत झाली की आता आपण क्रिकेटमध्ये पुन्हा पुनरागमन करू शकतो.जिद्दीने वेदनावर मात करीत क्रिकेटच्या सरावाला सुरुवात केली.असंख्य वेदना होत असताना देखील जिद्द सोडली नाही.हळूहळू क्रिकेटचे सामने खेळण्यास सुरुवात केली.सराव सामन्यांमध्ये प्रदर्शन चांगलं होत गेले. दिल्ली कॅपिटल संघाकडून कर्णधारपद मिळाले.निश्चय केला होता की आयपीएलमध्ये अफलातून प्रदर्शन करायचे व टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळायचे.डीसी संघाचा कर्णधार म्हणून खेळताना पंतने आयपीएल २०२४ मध्ये शानदार कामगिरी केली आहे.त्याने १० सामन्यांमध्ये ४६.३८ च्या सरासरीने आणि १६०.६० च्या स्ट्राइक रेटने ३७१ धावा केल्या आहेत.ऑरेंज कॅप शर्यतीच्या यादीत डावखुरा फलंदाज सहाव्या क्रमांकावर होता.आयपीएल मधल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर त्याने T-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघामध्ये स्थान पटकाविले. आयर्लंड विरुद्ध पहिल्या सामन्यात ३६ धावा तर पाकिस्तान विरुद्ध दुसऱ्या सामन्यांमध्ये ४२ धावांची विजयी खेळी केली.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget