श्रीरामपूर शहरात माहेश्वरी समाजाच्या वतीने महीला क्रिकेट लिग चे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये महिलांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला. दर वर्षी प्रमाणे यावर्षीही रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले. यामध्ये ४० युनीट रक्त जमा झाले. याबरोबरच सेतू कार्यालयातर्फे शिबिर आयोजित केले गेले. यामध्ये १०० हून अधिक व्यक्तींनी आपले आधार कार्ड, आयुष्मान कार्ड, रेशन कार्ड ऑनलाईन केले, अद्ययावत केले. महेश नवमी दिवशी शैक्षणिक व सामाजिक कार्यामध्ये विशेष कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान करुन गौरविण्यात आले. नगरसेवक श्री. श्रीनिवासजी बिहाणी व सौ. राखीजी बिहाणी यांच्या सौजन्याने १०० रोपांचे वितरण करण्यात आले. संगठन आपल्या दारी या विषयावर समाजातील बहुतेक व्यक्तींनी आपले मत मांडले व त्यावर चर्चा केली गेली.
श्रीरामपूर शहरातील प्रख्यात डॉ. श्री. आदित्य द्वारकादास दमाणी प्लास्टीक सर्जन यांना समाजगौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले. डॉ. दमाणी यांनी तीन वर्षाच्या गरीब मुलीचे मनगटापासून पूर्णपणे कापला गेलेला हात पूर्णपणे व्यवस्थित करून तिला अपंग होण्यापासून वाचवले.
महिला क्रिकेटच्या विजेत्यांचा यावेळी मेडल्स व ट्रॉफी देवून सन्मान करण्यात आला. सर्व बक्षीस हे महेश नागरी पतसंस्था, श्रीरामपूर यांच्या सौजन्याने दिले गेले.
बक्षिस वितरणानंतर महेश भगवान ची आरती तसेच महाप्रसादाचा सर्व उपस्थितांनी लाभ घेतला . सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्रीरामपूर माहेश्वरी सभेचे अध्यक्ष संदीप बुब, मंत्री योगेश करवा, जीवन सोमाणी, युवा अध्यक्ष सागर मुंदडा, युवामंत्री कुंदन मुंदडा, रितेश सोनी, कैलास सोमाणी, सौ. पूजा मुंदडा यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी महिला मंडळ अध्यक्षा सौ. शितल भुतडा , माहेश्वरी हरियाली मंच अध्यक्षा सौ. गितांजली बंग, प्रगती मंडळ अध्यक्ष सोमनाथ मुंदडा, नगरसेवक श्रीनिवासजी बिहाणी, प्रदेश प्रतिनिधी महेश बंग, जिल्हाकोश उपाध्यक्ष चेतन भुतडा, जिल्हा प्रतिनिधी पुरुषोत्तम झंवर, राजेश राठी, विशाल पोफळे, राकेश न्याती, उषा मुंदडा, डॉ सपना करवा, डॉ .अतूल करवा, डॉ. सतीश भट्टड, अनिल न्याती, शांतीलाल बुब, रविंद्र सोनी, सूरज सोमाणी, गोपाल चांडक, विनित जाजू, अमोल बूब, मुकेश न्याती, मनोज राठी, पुरुषोतम बूब, डॉ. के.डी. मुंदडा, महेश नागरी पतसंस्थेचे कर्मचारी वृंद व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment