विविध सामाजिक उपक्रमाने महेश नवमी उत्सहात साजरी
बेलापुर (प्रतिनिधी )- महेश नवमी या निमित्ताने बेलापुर माहेश्वरी समाजाच्या वतीने विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व प्रथम झेंडा चौक येथे भगवान महेश च्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले, त्यानंतर ग्रामपंचायत बेलापुर येथेही पुजन करण्यात आले त्यावेळेस सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत पद्माधिकारी, वा गावातील सर्व पक्षीय नेते, सर्म समाज बाधंव मोठ्या संख्येने उपस्थीत होते. त्यानंतर गोशाळा रोड येथे वृक्षारोपन करण्यात आले. दुपारी 5 वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.शोभायात्रेच्या मार्गावर लिंबू सरबत, थंड पाणी यांचे ग्रामस्थ व समाज बांधवांकडून वाटप करण्यात आले. शोभायात्रेमध्ये युवा, युवती, महीला व समाज बाधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले त्यानंतर महेश्वरी बालाजी मंदीरात भजनाच कार्यक्रम झाला तसेच समाजातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर आरती करून समाज बाधवाकरिता महाप्रसादाच्या कार्यक्रम सप्पन्न झाला, तसेच राजस्थानी युवा संघटनेच्या वतीने व जनकल्याण रक्तपेढी आहिल्यानगर यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान व हिमोग्लोबिन तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले •या वेळी•६९ बाटली रक्ताचे रक्तदान करण्यात आले. त्यानंतर प्रसाद सेतु कार्यालय याच्या सहकार्याने समाज बांधवाच्या विवीध सरकारी कागद पत्राची पुर्तता करून तयार दाखल्याचे वाटप करण्यात आले: तसेच क्रिकेट सामन्याचेही आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये महीला युवक, युवतीनी व समाज बांधवांनी सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला सर्व कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व समाज बाधंव महीला मंडळ, युवा संघटन आदिंनी विशेष परिश्रम घेतले.
Post a Comment