बेलापूर येथे शनैश्वर याञोत्सवानिमित्त गावकरी मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने कुस्त्यांचा हगामा व होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन
बेलापूरःशानिजयंती निमित्त बेलापूर येथे याञोत्सव संपन्न होत आहे.यानिमित्त गावकरी मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने 'ग्रामोत्सव २०२४' चे आयोजन करण्यात आले आहे. शनिजयंतीनिमित्त शनैश्वर देवतेला आज (गुरुवारी)दहावी व बारावीचे गुणवंत विद्यार्थी ओंकार रावताळे,शिवराज नवले,पवन बावचे,अजय चव्हाण यांचे हस्ते अभिषेक करण्याचा अभीनव उपक्रम पार पडला. शनिवार(ता.८)रोजी दुपारी ४ वा. जि.प.मराठी शाळेच्या मैदानावर कुस्त्यांचा हगामा होणार आहे. कुस्त्यांमध्ये सहभागी होणाऱ्या मल्लांना योग्य ती बिदागी आयोजकां कडून देण्यात येणार आहे.अनेक वर्षांनंतर कुस्यांचा हगामा होत असून यात नामांकित मल्ल सहभागी होणार असल्याने ग्रामस्थांना उत्कंठा आहे.तर सोमवार (ता.१०)रोजी सायं.६ वा. वाबळे पाटील मैदान, अरुण कुमार वैद्य पथ येथे क्रांतीनाना मळेगावकर(ठाणे)प्रस्तुत होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा हा महिलांसाठी चा मनोरंजनात्मक कार्यक्रम संपन्न होणार आहे.या कार्यक्रमात सहभागी होऊन विजेत्या होणाऱ्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.या कार्यक्रमा साठी राजस्थानी गृह उद्योग चे विशेष सहकार्य लाभले आहे.तरी ग्रामस्थ व पंचक्रोशितील भाविकांनी याप्रसंगी उपस्थित राहावे असे आवाहन गावकरी मंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.
Post a Comment