वादळी वाऱ्यामुळे बेलापुर खुर्द येथील शेतकऱ्यांची केळी बाग उध्वस्त
बेलापुर (प्रतिनिधी )-जोरदार आलेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर बेलापुर खूर्द येथील हरिश्चंद्र दगडू पुजारी यांची दिड एक केळीची बाग भुईसपाट झाली आहे .बेलापुर खुर्द येथील शेतकऱ्याच्या दिड एकर क्षेत्रात असलेली केळीची बाग पुर्णतः उध्वस्त झाली दिड एकर क्षेत्रात २०० झाडाची लागवड केलेली होती त्या बागेतील केळी तयार झाली होती काल आलेल्या जोरदार वादळामुळे त्यांची दिड एकर बागेतील सर्व केळीची झाडे जमीनीवर झोपली त्यामुळे पुजारी यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे तसेच अनेक शेतकऱ्यांचे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी झाडाखाली कैऱ्यांचा सडा पहावयास मिळाला वादळी वाऱ्याबरोबर आलेल्या पावासामुळे अनेक शेतकऱ्यांचा शेतात असलेला कांदाही भिजला
Post a Comment