भूमी अमोलीक हीचे सीबीएसई परिक्षेत घवघवीत यश
बेलापुर (प्रतिनिधी )-नुकत्याच झालेल्या सीबीएसई परिक्षेत बेलापुरची कन्या भुमी सुभाष आमोलीक हीने पद़्श्री विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या इंग्लीश मिडीयम स्कूल मधुन प्रथम क्रमांक मिळवीला असुन तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. बेलापुरच्या प्रथम नागरीक सरपंच स्वाती अमोलीक यांची बहीण तसेच येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष आमोलीक यांची कन्या भूमी हीने सीबीएसई परिक्षेत ९६.२ टक्के गुण मिळवुन विळद घाट येथील विखे पाटील फाऊंडेशनच्या इंग्लिश मिडीयम स्कूलमधुन प्रथम क्रमांक मिळवीला .तिच्या यशाबद्दल बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे जि प सदस्य शरद नवले बाजार समीतीचे उपसभापती अभिषेक खंडागळे सरपंच स्वाती अमोलीक उपसरपंच मुस्ताक शेख आदिंनी अभिनंदन केले आहे.
Post a Comment