अनिकेत देसाई अकाऊंट विषयात राज्यात प्रथम मिळाले १००पैकी १००गुण
श्रीरामपुर (प्रतिनिधी )-श्रीरामपुर तालुक्यातील नाऊर सारख्या ग्रामीण भागातुन शिक्षण घेवुन देखील चिरंजीव अनिकेत नवनाथ देसाई याने अकाऊंट या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवुन राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवीला आहे अनिकेत देसाई याने चंद्ररुप डाकले जैन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना इयत्ता बारावीच्या परिक्षेत एकुण ८५ % गुण मिळवीले तसेच अकाऊंट या विषयात १०० पैकी १०० गुण मीळवुन राज्यात पहीला आला आहे अनिकेत नवनाथ देसाई हा पत्रकार देविदास देसाई यांचा पुतण्या आहे. सी डी जैन महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ,सुहास निंबाळकर जी एस क्षिरसागर सर व्ही बी दळवी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले . त्याच्या यशाबद्दल आमदार लहु कानडे साईबाबा संस्थानचे मा. विश्वस्त सचिन गुजर अशोक उद्योग समुहाचे सर्वेसर्वा भानुदास मुरकुटे पत्रकार देविदास देसाई भास्कर खंडागळे दिलीप दायमा सुहास शेलार असलम बिनसाद सदिंप जगताप आदिंनी अभिनंदन केले आहे ,
Post a Comment