प्रिंट मिडियासाठी बातमी कशी लिहावी,बातमीसाठी फोटो कसे असावे त्याकरीता कोणते ॲंगल वापरावे यासोबतच बातमी लिहिताना कोणकोणत्या प्रकारची खबरदारी घेण्यात यावी आदी विषयांवर स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांचे तर इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी बातमी करताना शुटिंग (व्हॅयूज्वल) कसे असावे,ॲंगल कसे असावे किती.दुर, किती जवळ, आवाज स्पष्ट असण्याकरीता काय पद्धत वापरावी बातमीसाठी स्क्रीप्ट कशी थोड्याच शब्दात असावी बातमी चलतचित्रामागे व्हाईस (आवाज) कसा असावा आदी विषयांवर स्वाभिमानी संपादक सेवा संघ संचलित इलेक्ट्रॉनिक मिडिया सेल चे प्रदेशाध्यक्ष असलमभाई बिनसाद यांचेकडून सुयोग्य मार्गदर्शन लाभते, ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभराच्या विविध जिल्हा आणी तालुकास्तरावर अनेक शेकडो असे दैनिक, साप्ताहिक,पाक्षिक, मासिक वर्तमानपत्र यासोबच हजारो संपादक जोडले गेलेले आहेत.
त्याच प्रमाणे असलमभाई बिनसाद यांचे कार्य देखील मोठे विशाल आहे, राज्यभरातील विविध ठिकाणी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मिडिया क्षेत्रातील युट्यूब चॅनल संपादकांना मोठे पाठबळ दिलेले आहे, इलेक्ट्रॉनिक मिडिया क्षेत्रातील नुतन संपादकांच्या या विषयीच्या कोणत्याही जटील समस्या असल्यास ते केवळ एका फोन कॉल वर सॉल करुन देतात ही त्यांची मोठी महारथ आहे, म्हणून शौकतभाई शेख आणी असलमभाई बिनसाद यांच्या निर्पेक्ष एकाविचाराने इलेक्ट्रॉनिक ॲंड प्रिंट मिडिया क्षेत्रातील नवोदित पत्रकार, संपादकांसाठी वेळोवेळी श्रीरामपूर येथील स्वाभिमानी संपादक सेवा संघाच्या प्रमुख कार्यालयात विनामूल्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असते. यासोबतच नवीन वर्तमानपत्र किंवा न्यूज पोर्टल/ न्यूज चॅनल सुरु करण्यासाठी तथा त्यांची अत्यल्प दरात सर्व्हिस मिळविण्यासाठी देखील सुयोग्य मार्गदर्शन केले जाते.ज्या कोणास आवश्यकता आहे तथा जे कोणी पत्रकारिता क्षेत्रात आपले करिअर घडविण्याची आपल्या उराशी इच्छा बाळगतात त्यांनी जरुर *9561174111* या क्रमांकावर संपर्क करुन सदरील वेळोवेळी होत असलेल्या या शिबीराचा आवश्य लाभ घ्यावा असे इलेक्ट्रॉनिक ॲंड प्रिंट मिडिया च्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
Post a Comment