अन्वय क्लासेसचा निकाल या ही वर्षी १०० % गुणवंत विद्यार्थ्यांना टँब देवुन केला सन्मान
बेलापुर (प्रतिनिधी )-नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता दहावी परिक्षेच्या निकालात अन्वय क्लासेसच्या सर्वच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असुन अन्वय क्लासेसचा निकाल हा १०० % लागला असल्याचे क्लासच्या संचालिका सौ भक्ती गवळी यांनी सांगितले ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक स्वर्गीय नामदेवराव देसाई यांची कन्या सौ.भक्ति किशोर गवळी यांनी सुरु केलेल्या अन्वय क्लासेसचा निकाल या ही वर्षी शंभर टक्के लागला नुकत्याच पार पडलेल्या दहावी च्या परिक्षेत ओझर येथील माधवराव बोरस्ते विद्यालयातील अन्वय क्लासेसची विद्यार्थीनी कु.मैथिली प्रदीप घोडेकर विद्यालयात प्रथम आली.तसेच कु.साक्षी काळे ही हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या शाळेची विद्यार्थिनी केंद्रात प्रथम आली आहे. एअर फोर्स जिथे फक्त एअर फोर्स कंपनीतील मुलांना ऍडमिशन मिळते असे सर्वात अवघड सीबीसी पॅटर्न मधले विद्यालय म्हणजे केंद्रीय विद्यालय एअर फोर्स चा विद्यार्थी ज्ञानदीप पाटील याने 93% मार्क मिळवुन विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला तसेच एअरफोर्स विद्यालयातील विद्यार्थी अर्णव श्रीवास्तव याने 92 टक्के गुण मिळवुन द्वितीय क्रमांक पटकावला या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अन्वय क्लासच्या वतीने सौ.भक्ती किशोर गवळी यांनी केला या वेळी क्लासेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना सॅमसंग कंपनीचा टॅब आणि स्मार्ट वॉच देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला .
सौ भक्ती किशोर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली अन्वय क्लासेसमध्ये दर वर्षी तीनशे विद्यार्थी शिक्षण घेत असतात.