श्री साई मंदिराच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त उद्या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन
बेलापुर (प्रतिनिधी )- श्री साईबाबा मंदिराच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त श्री साई पावन प्रतिष्ठाण व श्री साई सेवा समिती बेलापुर तसेच एस एम बी टी हाँस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती श्री साई पावन प्रतिष्ठाणचे अध्यक्ष कैलास चायल यांनी दिली आहे . या शिबीरात शुगर ,रक्तदाब , ब्लड आँक्सीजन तपासणी ,ई सी जी केला जाईल तसेच तज्ञ डाँक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार केले जातील .या शिबीरात हृदय रोगासंबधीत छातीत दुखणे ,चालताना दम लागणे ,दरदरुन घाम येणे ,छातीवर दबाव असणे, छातीत डाव्या बाजुला वेदना होणे ,हाताला मुंग्या येणे वेदना होणे आदि आजारावर मोफत निदान केले जाणार आहे. तसेच ई सी जी मोफत काढला जाणार आहे ,हर्निया ,हायट्रोसिल , अपेंडिक्स ,आतड्याच्या शस्रक्रिया स्वादुपिंडाच्या शस्रक्रिया ,मुळव्याध ,पित्ताशयातील खडे ,भगंदर आदि आजारावर मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहे.तिरळेपणा,मोतीबिंदु रातआंधळेपणा ,दृष्टी कमी होणे आदि डोळ्याच्या तसेच नाक कान घसा यातील आजाराच्या देखील तपासणी करुन उपचार केले जाणार आहे तरी शिबीरार्थींनी रविवार दिनांक ५ मे रोजी सकाळी ११ वाजता श्री साई मंदिर बेलापुर येथे उपस्थित रहावे असे अवाहन श्री साई पावन प्रतिष्ठाण व साई सेवा समिती बेलापुर यांच्या वतीने करण्यात आले आहे तसेच श्री साईबाबा मंदिरांच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त सांयकाळी ६ ते ९ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असुन भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे अवाहनही सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Post a Comment