Latest Post

बेलापुर (प्रतिनिधी  )-गुन्हेगारी रोखण्याच्या दृष्टीने चौकाचौकात उच्च दर्जाचे सी सी टी व्ही लावण्याचा निर्णय बेलापुर गावाने घेतला ही निश्चितच कौतुकास्पद बाब असुन व्यापाऱ्यांनी देखील अशाच प्रकारे सीसीटीव्ही कँमेरे बसवावेत असे अवाहन अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मेयांनी केले बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने तीन ठिकाणी मुख्य चौकात अति उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कँमेरे बसविण्यात आले त्याचे उद़्घाटन अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे यांचे हस्ते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डाँक्टर बसवराज शिवपुजे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आले या वेळी बोलताना अप्पर पोलीस वैभव कलुबर्मे म्हणाले की गावात शांतता व कायदा सुव्यवस्था रहावी या करीता ग्रामस्थ प्रयत्नशिल आहेत ही आनंदाची बाब आहे परंतु कुणी कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचाही चोख बंदोबस्त केला जाईल या वेळी बोलताना पोलीस निरीक्षक नितीन देशमुख म्हणाले की कँमेरे लावल्यामुळे अनेक बेकायदेशीर व्यवसाय बंद होतील काही अनुचित घटना घडल्यास पोलीसांना तपास करणे सोयीचे होणार आहे त्यामुळे घर असेल किंवा व्यवसाय प्रत्येकाने सीसीटीव्ही कँमेरे बसवावे असेही देशमुख म्हणाले  या वेळी बोलताना जि प सदस्य शरद नवले म्हणाले की सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे गावात शांतता रहावी या करीता गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर व वहानावर या कँमेऱ्याची नजर असणार आहे .गावात येणाऱ्या तीन मुख्य चौकात साडेआठ लाख रुपये खर्चाचे कँमेरे बसविण्यात आलेले आहे,या कँमेऱ्यात अर्धा किलोमीटर पर्यंतचे चित्रण चित्रीत होणार आहे रात्र व दिवस आसे २४ तास हे चित्रण सुरु राहणार आहे ,या वेळी बाजार समीतीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी प्रास्ताविक केले तर प्रफुल्ल डावरे यांनी आभार मानले पत्रकार देविदास देसाई यांनी सूत्रसंचलन केले या वेळी सरपंच स्वाती अमोलीक उपसरपंच मुस्ताक शेख अशोक कारखान्याचे माजी व्हा चेअरमन जालींदर कुर्हे  प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष लहानु उर्फ एकनाथ नागले बेलापुर सोसायटीचे माजी चेअरमन सुधाकर खंडागळे तंटामूक्ती अध्यक्ष बाळासाहेब दाणी जनार्धन ओहोळ मोहसीन सय्यद भाऊसाहेब  तेलोरे रमेश काळे पत्रकार दिलीप दायमा सहाय्यक फौजदार सुधीर हापसे पोलीसा काँन्स्टेबल भारत तमनर संपत बडे रघुवीर कारखीले नंदकिशोर लोखंडे गौतम लगड हवालदार औटी हवालदार भालेराल दादासाहेब कुताळ अजीज शेख महेश कुर्हे जाकीर शेख प्रविण बाठीया बाबुराव पवार शहानवाज सय्यद मोजीम शेख बाबुलाल पठाण आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर व परिसरातील महिलांकरीता बचत गटाच्या माध्यमातून नवनविन लघु उद्योग, व्यवसाय सुरु करुन महीलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य  करु असे अश्वासन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी दिले.                           जि प सदस्य शरद नवले व श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापूर बु ग्रामपंचायतीच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधुन कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच स्वाती अमोलीक या होत्या.आपल्या भाषणात शालीनीताई विखे पाटील पुढे म्हणाल्या की, आज सर्वच क्षेत्रात महीला अघाडीवर असुन त्यांचे कार्यही जोमाने सुरु आहे. जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या लघु उद्योगातुन जवळपास ४० हजार महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिलेला आहे अनेक छोटे छोटे उद्योग आहेत जे की महीला  यशस्वीपणे करु शकते. बचत गटाच्या माध्यमातून महीलांना पुढे येण्याची खुप मोठी संधी आहे .बरेच उद्योग असे आहेत की त्यात कच्चा मालही पुरविला जातो व पक्का मालही खरेदी केला जातो त्याकरीता महीलांनी पुढे येण्याची गरज आहे. बचत गटाच्या माध्यमातून एकत्र या व व्यवसाय सुरु करा तुम्हाला सर्वतोपरि सहकार्य जनसेवा फौंडेशन व विखे पाटील परिवाराच्या वतीने करण्यात येईल. मात्र हे करताना महीलेनेच महीलेला आधार दिला पाहीजे. जुन्या रुढी अंधश्रध्दा या पासुन दुर रहा, विधवा महीलेच्या भावना समजुन घ्या त्यांनाही जगण्याचा आनंद मिळविण्याचा हक्क आहे ,पती मयत झाला तर त्या महीलेचा त्यात काय दोष असतो त्यामुळे विधवांना सन्मान द्या त्यांना प्रवाहाबाहेर टाकू नका. कर्ज काढुन सोहळे समारंभ करु नका समारंभात अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्या.सध्या फास्ट फूड खाण्याची फँशन सुरु झालेली आहे पण आपण काय खातो याचे पण भान ठेवा समाजातील वंचित निराधार लोकांना मदत करा जेष्ठांना वयोवृध्दांना सन्मानाची वागणूक द्या. घर फोडायला महीलाच कारणीभूत असतात हे ही लक्षात घ्या घर सावरा घर उभ करा पण घर फोडू नका मुलाप्रमाणे मुलीचेही संगोपन करा असेही त्या म्हणाल्या.यावेळी सरपंच स्वाती अमोलिक यांनी देखील मनोगत व्यक्त केले. या वेळी शालीनीताई विखे पाटील यांच्या हस्ते  वैद्यकीय ,वकीली, शिक्षकी ,उद्योजिका ,माजी सरपंच ,उत्कृष्ठ गृहीणी, महीला शेतमजुर, भजनी मंडळ चित्रकार, शेती, बँक, पतसंस्था, विमा, खेळ, आरोग्य ,एस टी महामंडळ, सामाजिक,  गायन, ग्रामपंचायत स्वच्छता आदि क्षेत्रात काम करणाऱ्या महीलांचा सन्मान करण्यात आला यावेळी सौ.स्नेहल नवले,सौ. मानवी खंडागळे,सौ. प्रतिभा देसाई,संगीता देसाई सौ. जया भराटे,रुपाली लोंढे सौ. करिमा सय्यद,सौ. माधुरी ढवळे,ग्रामपंचायत सदस्या सौ.तबसुम बागवान,सौ.प्रियंका कुऱ्हे,सौ. सुशिलाबाई पवार, सौ. मीना साळवी, सौ. उज्वला कुताळ यांचे सह महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ योगीता अमोलीक यांनी केले .अध्यक्षपदाची सूचना सौ तबसूम बागवान यांनी केली तर सौ प्रियंका कुर्हे यांनी अनुमोदन दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ संगीता फासाटे यांनी केले तर सौ उज्वला कुताळ यांनी आभार मानले.

बेलापूरःबेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर नामदार राधाकृष्ण विखे पाटील प्रणित शरद नवले, अभिषेक खंडागळे यांच्या नेतृत्वाखालील गावकरी मंडळाचे मुश्ताक शेख यांची बिनविरोध निवड झाली.यानिमित्ताने गावकरी मंडळाने मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिले.                        बेलापूरच्या उपसरपंच पदासाठी सरपंच स्वाती अमोलिक यांचे अध्यक्षतेखाली निवडणुक झाली. या बैठकीस माजी सरपंच महेन्द्र साळवी, माजी उपसरपंच अभिषेक खंडागळे ,तबसुम बागवान,चंद्रकांत नवले,मिना साळवी,प्रियंका कुऱ्हे,सुशीलाबाई पवार, वैभव कुऱ्हे,उज्वला कुताळ,रविंद्र खटोड,भरत साळुंके,रमेश अमोलिक,ग्रामविकास अधिकारी मेघशाम गायकवाड उपस्थित होते.                                                           उपसरपंच पदासाठी शरद नवले व अभिषेक खंडागळे यांचे नेतृत्वाखालील गावकरी मंडळाचे मुश्ताक शेख तसेच रविंद्र खटोड,सुधीर नवले,भरत साळुंके ,अरुण पा.नाईक यांच्या नेतृत्वा खालील जनता विकास आघाडीचे रमेश आमोलिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.निवडणूक होणार अशी चर्चा असताना  रमेश आमोलिक यांनी संख्याबळ जमत नसल्याचे लक्षात आल्याने  ऐनवेळी माघार घेतली .त्यामुळे  मुश्ताक शेख यांची बिनविरोध निवड झाली.                                                निवडीनंतर गावकरी मंडळाची विजयी व आभार सभा संपन्न झाली.यावेळी शरद नवले, अभिषेक खंडागळे, प्रफुल्ल डावरे,स्वाती अमोलिक, मोहसीन सय्यद, तबसुम बागवान, उज्वला कुताळ, गोपी दाणी,रफिक शेख,आदिंची भाषणे झाली.यावेळी जालिंदर कुऱ्हे, सुधाकर खंडागळे,एकनाथ नागले,पुरुषोत्तम भराटे,हाजी इस्माईल शेख,प्रभाकर बाळासाहेब दाणी,अन्नू सय्यद,रमेश काळे, ज्ञानेश्वर वाबळे,भाऊसाहेब तेलोरे,रावसाहेब अमोलिक,विशाल आंबेकर,बाबुराव पवार, रविंद्र कुताळ,श्रीहरी बारहाते,महेश कुऱ्हे, भैय्या शेख, रियाज सय्यद,दिलीप अमोलिक,विनायक जगताप, सचिन वाघ,गफूर शेख,सुधीर तेलोरे, बाळासाहेब शेलार, बाबुलाल पठाण, जीना शेख यांचे सह गावकरी मंडळाचे प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

बेलापुर (प्रतिनिधी )-श्रीरामपूर कृषि उत्पन्न बाजार समीतीच्या प्रभारी सचिवपदी साहेबराव वाबळे यांच्या नावावर औरंगाबाद खंडपिठाने शिक्का मोर्तब केला असुन पणन मंत्री तसेच जाँईंड रजिस्टार यांनी दिलेले आदेशही रद्द करण्यात आल्याची माहीती बाजार समितीचे प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली आहे                             श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या सचिव पदाबाबत  चारच दिवासापूर्वी पणन मंत्र्यांनी सचिव पदाचा पदभार संस्थेचे सचिव काळे यांना देण्याचे आदेश दिले होते तसेच जाँईंड रजिस्टार यांचे आदेश कायम केले होते त्यामुळे सचिव काळे यांनी सहाय्यक निबंधक तसेच बंदोबस्तात सचिव पदाचा पदभार घेण्याचा प्रयत्न  केला त्या वेळी प्रभारी सचिव हे रजेवर होते सभापती सुधीर नवले यांनी सांगीतले की संचालक मंडळाच्या बैठकीत या निर्णयावर चर्चा करु परंतु सचिव काळे यांनी एकतर्फी चार्ज घेतला पणन मंत्र्यांनी दिलेल्या आदेशा विरोधात प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली .त्या याचिकेचा नुकताच निकाल हाती आला असुन वाबळे यांच्या वतीने अँड राहुल कर्पे व अँड महेश देशमुख यांनी काम पाहीले तर काळे यांच्या वतीने अँड विनायक होन व अँड अश्विन होन यांनी काम पाहीले

बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्री. विरभद्रेश्वर देवस्थान ऐनतपुर येथे महाशिवरात्र  निमित्त बेलापूर ऐनतपुर ग्रामस्थांच्या सहकार्याने मंगळवार दिनांक 5 मार्च 2024 ते 7 मार्च 2024 पर्यंत तीन दिवसीय शिवलीलामृत सामुदायिक पारायणसेवा करण्यात आली असुन शुक्रवार दिनांक  8मार्च 2024 रोजी सकाळी 8 ते 9 या वेळेतश्री विरभद्रेश्वराचा अभिषेक श्री प्रदीप नवले सर व सौ प्रेरणा प्रदीप नवले यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर 9ते 12 या वेळेत देवी भक्त केशवगुरु दिमोटे देवळाली प्रवरा यांच्या रेणुकादेवी सत्संग मंडळाचा सत्संग सोहळा व महाआरती आयोजित केली असून त्यानंतर खिचडी महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी व नागरिकांनी या शिवभक्ती सत्संगाचा व  खिचडी महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.

बेलापुर (प्रतिनिधी  )- भाजपा महिला अघाडीच्या वतीने बेलापुरात शक्ती वंदन पद यात्रा काढण्यात आली होती.  भाजपा महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष मंजुश्रीताई ढोकचौळे भाजपा महिला अघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी कानडे भाजपा महिला मोर्चा सोशल मिडीया सौ कविता दुबे भाजपा महिला मोर्चा जिल्हा चिटणीस सौ अनिता शर्मा ,भाजपा महिला शहराध्यक्षा सौ पुष्पलता हरदास भाजपाच्या महिला अघाडीच्या जिल्हा सरचिटणीस पुजा चव्हाण भाजपा जिल्हा कार्यकारीणी सदस्या रेखाताई रिंघे यांच्या नेतृत्वाखाली शक्ती वंदन पदयात्रा  काढण्यात आली होती  या शक्ती वंदन पदयात्रेत अब की बार मोदी सरकार ,अब की बार ४०० पार , येवुन येवुन येणार कोण मोदी शिवाय दुसरे कोण अशा घोषणा महीलांनी दिल्या या फेरीत शितल सोनवणे ,सोनाली ठोंबरे ,वैशाली शिरसाठ ,स्वाती घोरपडे ,आसमा सय्यद , सरीता मोकाशी ,पुजा चव्हाण ,सरपंच स्वाती अमोलीक  ,रेश्मा पटेल ,बेलापुर ग्रामपंचायत सदस्या तबस्सूम बागवान ,माधुरी ढवळे ,करीमबी सय्यद ,समीना शेख , लैला शेख , रोशनी शेख , सुलताना शेख , सलीमा शेख नसरीन शेख ,योगीता अमोलीक ,निकीता जाधव आदि महीला सहभागी झाल्या होत्या .

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील मराठी मुलांच्या शाळेतील इयत्ता चौथीत शिकणारा विद्यार्थी चिरंजीव प्रेमकुमार अशोक आघाडे याने शालेय क्रिडा स्पर्धेत उंच उडीत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवीला त्यामुळे त्याची निवड जिल्हा पातळीवर करण्यात आली होती चिरंजीव आघाडे याने जिल्हा पातळीवरही  उंच उडीत दुसरा क्रमांक मिळविला त्याबद्दल बेलापुर ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समीतीच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच स्वाती अमोलीक या होत्या या वेळी माजी  जिल्हा परिषद सदस्य शरद नवले  सदस्य मुस्ताक शेख पत्रकार देविदास देसाई  तसेच शाळेच्या शिक्षीका श्रीमती शांताबाई गागरे ,श्रीमती शहाबाई उदमले श्रीमती कल्याणी हुमणे ,श्रीमती अमृता वनारसे श्रीमती अंजली देवढे शालेय व्यवस्थापन समितीचे राजुभाई सय्यद अमन सय्यद उपस्थित होते

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget