श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या सचिव पदाबाबत पणन मंत्र्यांनी दिलेला आदेश हायकोर्टाकडून रद्द
बेलापुर (प्रतिनिधी )-श्रीरामपूर कृषि उत्पन्न बाजार समीतीच्या प्रभारी सचिवपदी साहेबराव वाबळे यांच्या नावावर औरंगाबाद खंडपिठाने शिक्का मोर्तब केला असुन पणन मंत्री तसेच जाँईंड रजिस्टार यांनी दिलेले आदेशही रद्द करण्यात आल्याची माहीती बाजार समितीचे प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली आहे श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या सचिव पदाबाबत चारच दिवासापूर्वी पणन मंत्र्यांनी सचिव पदाचा पदभार संस्थेचे सचिव काळे यांना देण्याचे आदेश दिले होते तसेच जाँईंड रजिस्टार यांचे आदेश कायम केले होते त्यामुळे सचिव काळे यांनी सहाय्यक निबंधक तसेच बंदोबस्तात सचिव पदाचा पदभार घेण्याचा प्रयत्न केला त्या वेळी प्रभारी सचिव हे रजेवर होते सभापती सुधीर नवले यांनी सांगीतले की संचालक मंडळाच्या बैठकीत या निर्णयावर चर्चा करु परंतु सचिव काळे यांनी एकतर्फी चार्ज घेतला पणन मंत्र्यांनी दिलेल्या आदेशा विरोधात प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली .त्या याचिकेचा नुकताच निकाल हाती आला असुन वाबळे यांच्या वतीने अँड राहुल कर्पे व अँड महेश देशमुख यांनी काम पाहीले तर काळे यांच्या वतीने अँड विनायक होन व अँड अश्विन होन यांनी काम पाहीले
Post a Comment