बेलापुर जि प शाळेचा विद्यार्थी आघाडे उंच उडीत जिल्ह्यात दुसरा
बेलापुर (प्रतिनिधी )-येथील मराठी मुलांच्या शाळेतील इयत्ता चौथीत शिकणारा विद्यार्थी चिरंजीव प्रेमकुमार अशोक आघाडे याने शालेय क्रिडा स्पर्धेत उंच उडीत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवीला त्यामुळे त्याची निवड जिल्हा पातळीवर करण्यात आली होती चिरंजीव आघाडे याने जिल्हा पातळीवरही उंच उडीत दुसरा क्रमांक मिळविला त्याबद्दल बेलापुर ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समीतीच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच स्वाती अमोलीक या होत्या या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले सदस्य मुस्ताक शेख पत्रकार देविदास देसाई तसेच शाळेच्या शिक्षीका श्रीमती शांताबाई गागरे ,श्रीमती शहाबाई उदमले श्रीमती कल्याणी हुमणे ,श्रीमती अमृता वनारसे श्रीमती अंजली देवढे शालेय व्यवस्थापन समितीचे राजुभाई सय्यद अमन सय्यद उपस्थित होते
Post a Comment