उत्तम आरोग्यासाठी मैदानावरचे खेळ विद्यालयीन जीवनात महत्त्वाचे - जन्मजय टेकावडे.
श्रीरामपूर (गौरव डेंगळे):विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबर खेळाची गोडी निर्माण करण्याकरीता मैत्रीपूर्ण स्पर्धाचे आयोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.या दृष्टीने श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार जन्मजय टेकावडे यांनी संस्थेअंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा आयोजित होणाऱ्या आहेत.या अंतर्गत आज ५ ते ७ या वयोगटासाठी खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेत मुलांमध्ये श्रीराम अकॅडमी संघाने तर मुलींमध्ये श्रीरामपूर एज्युकेशन हायस्कूल संघाने विजेतेपद पटकावले.स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे खजिनदार जन्मजय टेकावडे व माध्यमिक विभाग स्कूल कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब ओझा यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संगिता कासलीवाल,चित्रा खटोड, एस मुंदडा, प्रा जयश्री पोडघन,प्रा डॉ योगेश पुंड, प्रा करंदीकर आदी मान्यवर उपस्थित होते.उद्घाटन प्रसंगी खेळाडूना मार्गदर्शन करतात श्री टेकावडे म्हणाले की आरोग्य हा मुलांच्या सर्वांगीण विकासामधील एक महत्वाचा घटक आहे.मुलांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर त्याचे स्वास्थ्य चांगले असणे आवश्यक आहे.चांगल्या स्वस्तासाठी मुला-मुलींनी मैदानावरचे खेळ खेळणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन टेकावडे यांनी केले.स्पर्धा यशस्वी करण्याकरीता श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटी हायस्कूलचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
Post a Comment