बचत गटाच्या माध्यमातून महीलांना उद्योग ,व्यवसायासाठी सहकार्य करु -सौ शालीनीताई विखे पाटील
बेलापुर (प्रतिनिधी )-बेलापुर व परिसरातील महिलांकरीता बचत गटाच्या माध्यमातून नवनविन लघु उद्योग, व्यवसाय सुरु करुन महीलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करु असे अश्वासन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी दिले. जि प सदस्य शरद नवले व श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापूर बु ग्रामपंचायतीच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधुन कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच स्वाती अमोलीक या होत्या.आपल्या भाषणात शालीनीताई विखे पाटील पुढे म्हणाल्या की, आज सर्वच क्षेत्रात महीला अघाडीवर असुन त्यांचे कार्यही जोमाने सुरु आहे. जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या लघु उद्योगातुन जवळपास ४० हजार महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिलेला आहे अनेक छोटे छोटे उद्योग आहेत जे की महीला यशस्वीपणे करु शकते. बचत गटाच्या माध्यमातून महीलांना पुढे येण्याची खुप मोठी संधी आहे .बरेच उद्योग असे आहेत की त्यात कच्चा मालही पुरविला जातो व पक्का मालही खरेदी केला जातो त्याकरीता महीलांनी पुढे येण्याची गरज आहे. बचत गटाच्या माध्यमातून एकत्र या व व्यवसाय सुरु करा तुम्हाला सर्वतोपरि सहकार्य जनसेवा फौंडेशन व विखे पाटील परिवाराच्या वतीने करण्यात येईल. मात्र हे करताना महीलेनेच महीलेला आधार दिला पाहीजे. जुन्या रुढी अंधश्रध्दा या पासुन दुर रहा, विधवा महीलेच्या भावना समजुन घ्या त्यांनाही जगण्याचा आनंद मिळविण्याचा हक्क आहे ,पती मयत झाला तर त्या महीलेचा त्यात काय दोष असतो त्यामुळे विधवांना सन्मान द्या त्यांना प्रवाहाबाहेर टाकू नका. कर्ज काढुन सोहळे समारंभ करु नका समारंभात अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्या.सध्या फास्ट फूड खाण्याची फँशन सुरु झालेली आहे पण आपण काय खातो याचे पण भान ठेवा समाजातील वंचित निराधार लोकांना मदत करा जेष्ठांना वयोवृध्दांना सन्मानाची वागणूक द्या. घर फोडायला महीलाच कारणीभूत असतात हे ही लक्षात घ्या घर सावरा घर उभ करा पण घर फोडू नका मुलाप्रमाणे मुलीचेही संगोपन करा असेही त्या म्हणाल्या.यावेळी सरपंच स्वाती अमोलिक यांनी देखील मनोगत व्यक्त केले. या वेळी शालीनीताई विखे पाटील यांच्या हस्ते वैद्यकीय ,वकीली, शिक्षकी ,उद्योजिका ,माजी सरपंच ,उत्कृष्ठ गृहीणी, महीला शेतमजुर, भजनी मंडळ चित्रकार, शेती, बँक, पतसंस्था, विमा, खेळ, आरोग्य ,एस टी महामंडळ, सामाजिक, गायन, ग्रामपंचायत स्वच्छता आदि क्षेत्रात काम करणाऱ्या महीलांचा सन्मान करण्यात आला यावेळी सौ.स्नेहल नवले,सौ. मानवी खंडागळे,सौ. प्रतिभा देसाई,संगीता देसाई सौ. जया भराटे,रुपाली लोंढे सौ. करिमा सय्यद,सौ. माधुरी ढवळे,ग्रामपंचायत सदस्या सौ.तबसुम बागवान,सौ.प्रियंका कुऱ्हे,सौ. सुशिलाबाई पवार, सौ. मीना साळवी, सौ. उज्वला कुताळ यांचे सह महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ योगीता अमोलीक यांनी केले .अध्यक्षपदाची सूचना सौ तबसूम बागवान यांनी केली तर सौ प्रियंका कुर्हे यांनी अनुमोदन दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ संगीता फासाटे यांनी केले तर सौ उज्वला कुताळ यांनी आभार मानले.
Post a Comment