गुन्हेगारी रोखण्याच्या दृष्टीने सीसीटीव्ही कँमेरे महत्वाचे-अपर पोलीस अधिक्षक कलुबर्मे
बेलापुर (प्रतिनिधी )-गुन्हेगारी रोखण्याच्या दृष्टीने चौकाचौकात उच्च दर्जाचे सी सी टी व्ही लावण्याचा निर्णय बेलापुर गावाने घेतला ही निश्चितच कौतुकास्पद बाब असुन व्यापाऱ्यांनी देखील अशाच प्रकारे सीसीटीव्ही कँमेरे बसवावेत असे अवाहन अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मेयांनी केले बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने तीन ठिकाणी मुख्य चौकात अति उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कँमेरे बसविण्यात आले त्याचे उद़्घाटन अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे यांचे हस्ते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डाँक्टर बसवराज शिवपुजे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आले या वेळी बोलताना अप्पर पोलीस वैभव कलुबर्मे म्हणाले की गावात शांतता व कायदा सुव्यवस्था रहावी या करीता ग्रामस्थ प्रयत्नशिल आहेत ही आनंदाची बाब आहे परंतु कुणी कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचाही चोख बंदोबस्त केला जाईल या वेळी बोलताना पोलीस निरीक्षक नितीन देशमुख म्हणाले की कँमेरे लावल्यामुळे अनेक बेकायदेशीर व्यवसाय बंद होतील काही अनुचित घटना घडल्यास पोलीसांना तपास करणे सोयीचे होणार आहे त्यामुळे घर असेल किंवा व्यवसाय प्रत्येकाने सीसीटीव्ही कँमेरे बसवावे असेही देशमुख म्हणाले या वेळी बोलताना जि प सदस्य शरद नवले म्हणाले की सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे गावात शांतता रहावी या करीता गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर व वहानावर या कँमेऱ्याची नजर असणार आहे .गावात येणाऱ्या तीन मुख्य चौकात साडेआठ लाख रुपये खर्चाचे कँमेरे बसविण्यात आलेले आहे,या कँमेऱ्यात अर्धा किलोमीटर पर्यंतचे चित्रण चित्रीत होणार आहे रात्र व दिवस आसे २४ तास हे चित्रण सुरु राहणार आहे ,या वेळी बाजार समीतीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी प्रास्ताविक केले तर प्रफुल्ल डावरे यांनी आभार मानले पत्रकार देविदास देसाई यांनी सूत्रसंचलन केले या वेळी सरपंच स्वाती अमोलीक उपसरपंच मुस्ताक शेख अशोक कारखान्याचे माजी व्हा चेअरमन जालींदर कुर्हे प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष लहानु उर्फ एकनाथ नागले बेलापुर सोसायटीचे माजी चेअरमन सुधाकर खंडागळे तंटामूक्ती अध्यक्ष बाळासाहेब दाणी जनार्धन ओहोळ मोहसीन सय्यद भाऊसाहेब तेलोरे रमेश काळे पत्रकार दिलीप दायमा सहाय्यक फौजदार सुधीर हापसे पोलीसा काँन्स्टेबल भारत तमनर संपत बडे रघुवीर कारखीले नंदकिशोर लोखंडे गौतम लगड हवालदार औटी हवालदार भालेराल दादासाहेब कुताळ अजीज शेख महेश कुर्हे जाकीर शेख प्रविण बाठीया बाबुराव पवार शहानवाज सय्यद मोजीम शेख बाबुलाल पठाण आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते
Post a Comment