छोट्या व्यवसायीकांना अकरा वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास अनुमती द्यावी मागणी
बेलापुर (प्रतिनिधी )-छोट्या व्यवसायीकांना व्यवसाय करण्यासाठी वेळ वाढवुन देण्यात यावी अशी मागणी बेलापुरकरांच्या वतीने बेलापुर पोलीसांना करण्यात आली या बाबत पोलीसांनी छोट्या व्यवसायीकांना दहा वाजता दुकाने बंद करण्याबाबत ताकीद दिली होती त्यामुळे छोटे व्यवसायीक अडचणीत सापडले होते लवकर दुकाने बंद केल्यामुळे दुकानदारांना प्रपंच चालविणे अवघड झाले होते त्यामुळे व्यवसायीकांनी बेलापुर ग्रामपंचायत तसेच पत्रकारांनी यात लक्ष घालावे अशी विनती केली होती त्यांच्या सुचनेनुसार बाजार समीतीचे उपसभापती अभिषेक खंडागळे पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा उपसरपंच मुस्ताक शेख लहानु नागले संदीप सोनवणे यांनी बेलापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्याशी चर्चा केली. त्या वेळी छोट्या व्यवसायीकांना आगोदरच धंदा होत नाही उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ग्राहक शितपेय दुध घेण्याकरीता उशिरा बाहेर येतात. लवकर दुकाने बंद केल्यास व्यवसाय मोडकळीस येतील त्यामुळे अकरा वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी मिळावी तसेच बेलापुर परिसरात आता अति उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कँमेरे बसविण्यात आलेले आहे त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे सोपे होणार आहे त्यामुळे छोट्या व्यवासायीकांना आपले व्यवसाय करण्यासाठी रात्री अकरा वाजेपर्यंत मुदत द्यावी अशी विनंती करण्यात आली. या वेळी एपीआय सुरेश आव्हाड यांनी सांगितले की वरिष्ठाच्या सुचनांचे पालन करुनच आपण व्यवसायीकांना लवकर व्यवसाय बंद करण्याच्या सुचना दिल्या होत्या आता सर्वांशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे सांगितले आहे*
Post a Comment