Latest Post

श्रीरामपुर (प्रतिनिधी  )- ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे ओबीसी समाजाच्या ३५० जातीवर हा अन्याय असुन या आरक्षणास आमची हरकत असल्याचे लेखी पत्र श्रीरामपुर तालुक्यातील ओबीसी समाजाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले या  वेळी बोलताना समता परिषदेचे नेते चंद्रकांत झुरगे म्हणाले की मंडल आयोगाच्या शिफारशी नुसार आम्हाला आरक्षण मिळालेले आहे या आरक्षणात असलेला अठरा पगड जातीचा समाज गोर गरीब दिन दलीत कुटुंबाचा समावेश  आहे त्यामुळे ओबीसी समाजाच्या कोट्यातून आरक्षण दिल्यास सर्वात मोठ्या असणाऱ्या ओबीसी समाजावर अन्याय होईल.तसेच मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी तयार करण्यात आलेली प्रश्नावली चुकीची व आक्षेपार्ह असुन सगेसोयरे या बाबत काढलेला आदेशही चुकीचा असल्याचे झुरंगे म्हणाले या वेळी नायाब तहसीलदार व्ही आर कल्हापुरे यांनी निवेदन स्विकारले त्यानंतर  ओबीसी समाजाच्या वतीने आमदार लहु कानडे यांनाही निवेदन देण्यात आले त्या वेळी बोलाताना आमदार लहु कानडे म्हणाले की तिन चाकाचे हे शासन सर्व सामान्यांना मुलभुत गरजांच्या प्रश्नापासुन दुर ठेवण्यासाठी ही जातीयवादाची खेळी खेळत आहे सर्व सामान्य नागरीकांना आपल्या हक्कापासुन वंचित ठेवण्यासाठी हे जातीयवादाचे विष कालवले जात आहे सुज्ञ मतदारांनी वेळीच सावध व्हावे असेही ते म्हणाले या वेळी दत्तात्रय साबळे बेलापुरचे माजी सरपंच भरत साळूंके यांनीही मनोगत व्यक्त केले या वेळी सुभाष गायकवाड विठ्ठल दुधाळ वासंत लिंगायत सुनिल ससाणे अनिल मुंडलीक अशोक शिरसाठ राजेंद्र साताभाई राजेंद्र टेकाडे मारुती राशिनकर शिवाजी जेजुरकर प्रकाश कुर्हे कलेश सातभाई जाकीर शेख एकनाथ नागले अशोक गवते फैय्याज बागवान दिपक गीरमे किरण बोरावके बाबासाहेब ढगे आदिसह तालुक्यातील ओबीसी बांधव उपस्थित होते

भविष्यात प्रत्येक ग्रामपंचायतीत सोलर पँनल बसविण्याचा प्रयत्न - आ. कानडे  

बेलापूर-श्रीरामपूर रस्ता केल्याने आ. कानडे यांचा सत्कार, अनेकांकडून कौतुकाचा वर्षाव   

श्रीरामपूर- बेलापूर गाव सुंदर करण्याच्या दृष्टीने प्रवरा नदीकाठच्या दोन्ही बाजूला घाट करण्याचा तसेच मतदार संघातील प्रत्येक ग्रामपंचायतीत सोलर पँनल बसविण्याचा आपला प्रयत्न असल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली.

    बेलापूर-श्रीरामपूर रस्त्याचे १८ कोटी रुपये खर्चाचे चौपदरीकरण करून त्यावर दीड कोटी रुपये आमदार निधीतून स्ट्रीट लाईट बसविल्याबाद्द्ल बेलापूर येथे ग्रामपंचायतीच्यावतीने आ. कानडे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. जिल्हा कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद नवले, माजी सरपंच महेद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, अजय डाकले, इस्माईल शेख व्यासपीठावर उपस्थित होते. 

आ. कानडे म्हणाले, गेली साडे चार वर्ष कुठल्याही भानगडीत न पडता तालुक्यात असलेले प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले. कामांच्या बाबतीत भेदभाव केला नाही. माझ्या अनुभवाचा ज्ञानाचा फायदा तालुक्यातील जनतेचे प्रश्न, रस्ता, विज ,पाणी, महीला व तरुणांच्या समस्या, बेरोजगारी याकडे लक्ष देवुन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. भविष्यात अजुन पुष्कळ कामे करावायाची आहेत. अनेक ठिकाणी कामाचे श्रेय लाटण्याची स्पर्धाच सुरु झालेली असते त्यामागे टक्केवारी हे वेगळेच कारण असते. शासनाचा निधी हा एकदाच येत असतो त्यामुळे कामे दर्जेदार करा, हा सर्वसामान्यांचा पैसा आहे याबाबत जनतेत जनजागृती करा. 

   कायदा, घटना एवढी मोठी आहे कि, त्यातून कोणी वाचू शकत नाही, त्यामुळे ज्याने त्याने जबाबदारी ओळखून वागले पाहिजे, आमदार म्हणून तुम्हाला खाली पाहण्याची वेळ येणार नाही, असेच आपण वागलो असून यापुढेही वागेल, हल्ली नेत्यांच्या गाडीत गुन्हेगार कसे येतात, याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे,असे यापूर्वी कोणीही बोलले नाही. याबाबत विधानभवनात बोलणारा आपण एकमेव आमदार असल्याचे ते म्हणाले.      

     सचिन गुजर म्हणाले, रस्त्याच्या माध्यमातून श्रीरामपूर-बेलापूर ही दोन गावे जोडण्याचे काम आ. कानडे यांनी केले आहे. जलजीवन योजनेसाठी त्यांनी मदत केली. दुसरा कोणी असता तर त्यांनी या योजनेत खोट कशी येईल,असे पहिले असते. परंतु आ. कानडे यांनी गट तट न पाहता विकस कामे केली. बेलापुरकरांनीही राजकारणापलीकडे जाऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले. ही अभिमानाची बाब असल्याचे नमूद केले. राजकारणापलीकडे जाऊन गावात सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम पूर्वीपासून सुरु असल्याचे सांगून अरुण पाटील नाईक यांनी आ. कानडे यांनी गावात केलेल्या विकास कामांची सविस्तर माहिती दिली.  

      जि.प.चे माजी सभापती शरद नवले, उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी, ग्रामसभेत केलेल्या ठरावानुसार या सत्कार समारंभाचे आयोजन केल्याचे सांगून आ. कानडे यांच्या संकल्पनेतून पुणे, मुंबई प्रमाणे बेलापूर-श्रीरामपूर रस्ता झाल्याचे नमूद करून हा रस्ता जिल्ह्याचे रोल मॉडेल ठरणार असल्याचे सांगितले. जलजीवन योजनेतील त्रुटी सांगून ही योजना कशी मार्गी लागेल, याविषयी आमदार कानडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केल्याचे श्री. नवले म्हणाले. या योजनेसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठी मदत केल्याचे ते म्हणाले. 

     यावेळी माजी सरपंच महेंद्र साळवी, इस्माईल शेख, लहानु नागले, मोहसीन सय्यद, पत्रकार ज्ञानेश गावले, देविदास देसाई, भाजपाचे प्रफुल्ल डावरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाऊसाहेब कुताळ, चंद्रकांत नाईक, प्रसाद खरात,शफिक बागवान, मुस्ताक शेख, बाळासाहेब दाणी, जाकीर हसन शेख, बाबूलाल पठाण, समीर जहागीरदार, बाळासाहेब वाबळे, विशाल आंबेकर, राहुल माळवदे, दादासाहेब कुताळ, भाऊसाहेब तेलोरे,विजय अमोलिक, रफिक शेख, जीना शेख, भैय्या शेख, महेश कुऱ्हे,सचिन वाघ,शफिक आतार, अँड. अरविंद साळवी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी प्रारंभी प्रास्ताविक करून शेवटी आभार मानले. 

......

कोपरगाव (गौरव डेंगळे):सोमैया विद्याविहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूलचा शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा २०२३ चा निकाल १००% लागला आहे.इंटरमिजिएट परीक्षेस विद्यालयातील एकूण १४८ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ११ विद्यार्थी 'अ' श्रेणीत,१५ विद्यार्थी ' ब ' श्रेणीत तर 

१२२ विद्यार्थी ' क ' श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.इंटरमिजिएट परीक्षेत घवघवीत यश संपादन करून दैदिप्यमान निकालाची परंपरा कायम राखली.परीक्षेस प्रविष्ट सर्व  विद्यार्थ्यांना शाळेचे कला शिक्षक श्री मंगेश गायकवाड यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले होते.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री.के.एल.वाकचौरे, उपमुख्याधिका सौ.अमृतकर, पर्यवेक्षिका सौ.पहाडे,सौ. ससाणे,के.जी.प्रमुख सौ. फर्नांडिस,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील श्रीमती डाँक्टर सुमनबई बिहारीलालजी गंगवाल यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी जावई सुना नातवंडे नातसुना पणतु असा परिवार आहे .डाँक्टर जयप्रकाश गंगवाल डाँक्टर कैलास गंगवाल बेलापुर येथील डाँक्टर रविंद्र गंगवाल यांच्या त्या मातोश्री तसेच डाँक्टर प्रशांत गंगवाल डाँक्टर सुशिल गंगवाल व प्रतिथयश व्यापारी किरण गंगवाल यांच्या त्या आजी होत त्यांची अंत्ययात्रा उद्या रविवार दिनांक २८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता निवासस्थानापासुन निघेल

श्रीरामपूर प्रतिनिधी: श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा जे.जे. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जोएफ जमादार यांची समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार आबु आझमी यांच्या आदेशान्वये समाजवादी पक्षाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.श्री.जमादार पुर्वी पक्षाचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष या पदावर कार्यरत असताना त्यांनी पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजाभिमुख उपक्रम राबविले तथा उपेक्षित आणि दुर्लक्षितांच्या ज्वलंत प्रश्नांबाबत सातत्याने आवाज उठवत त्यांना उचित न्याय मिळवून देणेकामी सातत्याने संघर्ष केला असल्याने त्यांच्या अशा या उत्कृष्ट कार्याची दखल घेवून पक्षाने त्यांची अहमदनगर जिल्हाध्यक्ष या पदावर नियुक्ती केली आहे.यावेळी नियुक्ती पत्र देताना समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रमुख महासचिव परवेज़ सिद्दीकी, महाराष्ट्र प्रदेश महासचिव रऊफ शेख,महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रताप होगाड़े, युवा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष फहद अहमद, माजी नगरसेवक शान ए हिंद,महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा श्रीमती साजेदा  निहालअहमद (मालेगांव), धुळे शहराध्यक्ष गुड्डू काकर, धुळे येथील माजी नगरसेवक डॉ. सरफराज अन्सारी, माजी नगरसेवक अमीन पटेल,जमील मन्सूरी आदी मान्यवर उपस्थित होते.श्री.जमादार यांच्या या नियुक्ती बद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

पक्षाचे आपल्यावर टाकलेला विश्वास आणी जबाबदारी यास पुर्णपणे सार्थ करण्याचा प्रयत्न करणार असुन पक्ष वाढीसाठी आहोरात परिश्रम घेवून कार्यकर्त्यांची मोठी फळी जिल्ह्यात उभी करुन जनसामान्यांचे ज्वलंत प्रश्न आणी त्यांच्या न्याय हक्कासाठींचा लढा हा अधिक जोमाने पुढे नेणार आहे सोबतच येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका, महानगर पालिका, ग्रामपंचायत अशा सर्वच निवडणुकीत समाजवादी पक्ष पुर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरणार असल्याचे यावेळी जोएफ जमादार यांनी सांगितले.

 

आजवरच्या इतिहासात संस्थेला उच्चांकी उत्पन्न व नफा 

बेलापुर  (प्रतिनिधी) श्रीरामपुर  कृषी उत्पन्न बाजार समितीने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी १२ कोटी २४ लाख ५१ हजार ६८१ चा मुळ अर्थसंकल्प पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना सादर केला  असुन संस्थेला आजवरच्या वाटचालीत विक्रमी उत्पन्न व नफा मिळाला असल्याची माहिती सभापती सुधीर पा. नवले व प्रभारी सचिव साहेबराव वाबळे पा .यांनी दिली आहे 


श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या कामकाजा विषयी माहीती देताना सभापती सुधीर नवले व प्रभारी सचिव साहेबराव  वाबळे यांनी पुढे सांगितले की, संस्थेची दि.३० एप्रिल २०२३ रोजी निवडणूक होऊन दि.१३ मे २०२३ मा.आ.भानुदास मुरकुटे व युवा नेते करण दादा ससाणे यांच्या नेतृत्वाखाली नवीन  संचालक मंडळ कार्यरत झाले  आहे. संस्थेला डिसेंबर २०२३ अखेर २ कोटी ४३ लाख ७२ हजार ६६० रुपयांचे उत्पन्न मिळाले  असुन ७१ लाख ७० हजार ५८२ रुपयांचा नफा झाला आहे.


या बजेटमध्ये  मुख्य बाजार आवारात ८ कोटी १३ लाख व  बेलापूर व टाकळीभान उपबाजार आवारातील १ कोटी ९५ लाखांची नियोजित बांधकामे समाविष्ट आहेत. तसेच संस्थेमार्फत एक नवीन उपबाजार, टाकळीभान येथे पेट्रोल पंप उभारणे, जनावरांच्या बाजार वाढीसाठी आवश्यक ते प्रयत्न करणे, फळे व भाजीपाला विभागात शितगृह उभारणी, नवीन डाळिंब मार्केट सुरु करणे आदी कामे करण्याचा मानस आहे. संस्थेला आजपर्यंत झालेल्या अर्थसंकल्पीय बजेटपुर्वीच्या डिसेंबर २०२३ अखेर  २ कोटी ४३ लाख ७२ हजारांचे विक्रमी उत्पन्न मिळाले असुन ७१ लाख ७० हजारांचा नफा मिळाला आहे, आजवरच्या वाटचालीत हे उत्पन्न आणि नफा उच्चांकी असल्याचे सभापती नवले यांनी सांगितले. संस्थेचा कारभार अतिशय पारदर्शक व काटकसरी  पद्धतीने सुरु असल्याची माहिती प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली.


तसेच संस्थेच्या बँकेत तीन कोटी आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी एक कोटी अशा एकुण चार कोटींच्या मुदत ठेवी आहेत. पणन संचालक यांच्याकडे चार कोटींची कामे मंजुरीसाठी प्रलंबित असल्याचेही सभापती नवले व प्रभारी सचिव वाबळे यांनी सांगितले.

श्रीरामपूर -अयोध्येत ५०० वर्षाच्या प्रदीर्घ  प्रतीक्षेनंतर  प्रभू श्रीरामाची  प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने देशभरात आज जल्लोषचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. या कार्यक्रमानिमित्त आप व समर्थ ग्रुप च्या वतीने  नेवासा रोड समर्थ चौक येथे रामध्वज उभारण्यात आला यावेळी मोठी रॅली काढून चौकामध्ये सडा, रांगोळी काढून, भगवे झेंडे, फुलांची सजावट, आतिशबाजी करत मोठ्या उत्साहात प्रभू श्रीरामचंद्र की जय जय श्रीराम, जय हनुमान अशा घोषणा देत मोठ्या आनंद उत्सवात कार्यक्रम साजरा करण्यात आला.या वेळी आप चे जिल्हाअध्यक्ष  तिलक डुंगरवाल म्हणाले की ज्या पद्धतीने प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशामध्ये जल्लोषाचे आणि उत्सवाचे वातावरण दिसत आहे  त्याचप्रमाणे भारतात रामराज्य ही आले पाहिजे राज्यकर्त्यांनी रामराज्य प्रमाणेच राज्य चालून  जनतेला सुख समृद्ध करून  देशात असंच उत्साही वातावरण ठेवून रामराज्य प्रमाणेच काम करावे  अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली, यावेळी विकास डेंगळे म्हणाले देशामध्ये असाच आनंद उत्सव व प्रेम कायम राहो सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र आनंदाने रावे सर्व देश वासियांना  प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी

तिलक डुंगरवाल, विकास डेगळे, राहुल रणपिसे, भरत डेगळे, श्रीधर कराळे पाटील, प्रशांत बागुल ,प्रवीण लगडे, सलीम शेख, अमोल नवघरे, ,डाॅ प्रवीण राठोड,,डाॅ सचिन थोरात, राज डेंगळे, भागवत बोंबले, देवराज मुळे ,मनोज बोंबले, मोहन तेलोरे , महेश कवठाळे, प्रवीण काळे ,गणेश भडांगे, शिवा मोरे, संदीप शिरसाट, मुबारक शेख, महबूब प्यारे, युवराज घोरपडे ,निलेश घोरपडे, सतीश सुलताने, अभिजीत राऊत, प्रसाद कटके, अलीम भाई शेख, विशाल शिरसाट, भागवत घुगे ,सुभाष भडांगे, शिवशंकर मोरे, नितीन मोरे ,गणेश पवार, प्रदीप ऊडे, राहुल राऊत, शुभम मालकर, गोकुळ जाधव, जयेश खर्डे, गणेश गवारे, विजय भवार, आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget