शासकीय इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेत शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचा १००% निकालाची परंपरा कायम. रेकॉर्ड ब्रेक १४८ विद्यार्थी परीक्षेत एकाच शाळेतील उत्तीर्ण.

कोपरगाव (गौरव डेंगळे):सोमैया विद्याविहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूलचा शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा २०२३ चा निकाल १००% लागला आहे.इंटरमिजिएट परीक्षेस विद्यालयातील एकूण १४८ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ११ विद्यार्थी 'अ' श्रेणीत,१५ विद्यार्थी ' ब ' श्रेणीत तर 

१२२ विद्यार्थी ' क ' श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.इंटरमिजिएट परीक्षेत घवघवीत यश संपादन करून दैदिप्यमान निकालाची परंपरा कायम राखली.परीक्षेस प्रविष्ट सर्व  विद्यार्थ्यांना शाळेचे कला शिक्षक श्री मंगेश गायकवाड यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले होते.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री.के.एल.वाकचौरे, उपमुख्याधिका सौ.अमृतकर, पर्यवेक्षिका सौ.पहाडे,सौ. ससाणे,के.जी.प्रमुख सौ. फर्नांडिस,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget