पक्षाचे आपल्यावर टाकलेला विश्वास आणी जबाबदारी यास पुर्णपणे सार्थ करण्याचा प्रयत्न करणार असुन पक्ष वाढीसाठी आहोरात परिश्रम घेवून कार्यकर्त्यांची मोठी फळी जिल्ह्यात उभी करुन जनसामान्यांचे ज्वलंत प्रश्न आणी त्यांच्या न्याय हक्कासाठींचा लढा हा अधिक जोमाने पुढे नेणार आहे सोबतच येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका, महानगर पालिका, ग्रामपंचायत अशा सर्वच निवडणुकीत समाजवादी पक्ष पुर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरणार असल्याचे यावेळी जोएफ जमादार यांनी सांगितले.
समाजवादी च्या जिल्हाध्यक्षपदी जोएफ जमादार यांची नियुक्ती.
श्रीरामपूर प्रतिनिधी: श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा जे.जे. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जोएफ जमादार यांची समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार आबु आझमी यांच्या आदेशान्वये समाजवादी पक्षाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.श्री.जमादार पुर्वी पक्षाचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष या पदावर कार्यरत असताना त्यांनी पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजाभिमुख उपक्रम राबविले तथा उपेक्षित आणि दुर्लक्षितांच्या ज्वलंत प्रश्नांबाबत सातत्याने आवाज उठवत त्यांना उचित न्याय मिळवून देणेकामी सातत्याने संघर्ष केला असल्याने त्यांच्या अशा या उत्कृष्ट कार्याची दखल घेवून पक्षाने त्यांची अहमदनगर जिल्हाध्यक्ष या पदावर नियुक्ती केली आहे.यावेळी नियुक्ती पत्र देताना समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रमुख महासचिव परवेज़ सिद्दीकी, महाराष्ट्र प्रदेश महासचिव रऊफ शेख,महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रताप होगाड़े, युवा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष फहद अहमद, माजी नगरसेवक शान ए हिंद,महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा श्रीमती साजेदा निहालअहमद (मालेगांव), धुळे शहराध्यक्ष गुड्डू काकर, धुळे येथील माजी नगरसेवक डॉ. सरफराज अन्सारी, माजी नगरसेवक अमीन पटेल,जमील मन्सूरी आदी मान्यवर उपस्थित होते.श्री.जमादार यांच्या या नियुक्ती बद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
Post a Comment