आजवरच्या इतिहासात संस्थेला उच्चांकी उत्पन्न व नफा
बेलापुर (प्रतिनिधी) श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी १२ कोटी २४ लाख ५१ हजार ६८१ चा मुळ अर्थसंकल्प पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना सादर केला असुन संस्थेला आजवरच्या वाटचालीत विक्रमी उत्पन्न व नफा मिळाला असल्याची माहिती सभापती सुधीर पा. नवले व प्रभारी सचिव साहेबराव वाबळे पा .यांनी दिली आहे
श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या कामकाजा विषयी माहीती देताना सभापती सुधीर नवले व प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी पुढे सांगितले की, संस्थेची दि.३० एप्रिल २०२३ रोजी निवडणूक होऊन दि.१३ मे २०२३ मा.आ.भानुदास मुरकुटे व युवा नेते करण दादा ससाणे यांच्या नेतृत्वाखाली नवीन संचालक मंडळ कार्यरत झाले आहे. संस्थेला डिसेंबर २०२३ अखेर २ कोटी ४३ लाख ७२ हजार ६६० रुपयांचे उत्पन्न मिळाले असुन ७१ लाख ७० हजार ५८२ रुपयांचा नफा झाला आहे.
या बजेटमध्ये मुख्य बाजार आवारात ८ कोटी १३ लाख व बेलापूर व टाकळीभान उपबाजार आवारातील १ कोटी ९५ लाखांची नियोजित बांधकामे समाविष्ट आहेत. तसेच संस्थेमार्फत एक नवीन उपबाजार, टाकळीभान येथे पेट्रोल पंप उभारणे, जनावरांच्या बाजार वाढीसाठी आवश्यक ते प्रयत्न करणे, फळे व भाजीपाला विभागात शितगृह उभारणी, नवीन डाळिंब मार्केट सुरु करणे आदी कामे करण्याचा मानस आहे. संस्थेला आजपर्यंत झालेल्या अर्थसंकल्पीय बजेटपुर्वीच्या डिसेंबर २०२३ अखेर २ कोटी ४३ लाख ७२ हजारांचे विक्रमी उत्पन्न मिळाले असुन ७१ लाख ७० हजारांचा नफा मिळाला आहे, आजवरच्या वाटचालीत हे उत्पन्न आणि नफा उच्चांकी असल्याचे सभापती नवले यांनी सांगितले. संस्थेचा कारभार अतिशय पारदर्शक व काटकसरी पद्धतीने सुरु असल्याची माहिती प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली.
तसेच संस्थेच्या बँकेत तीन कोटी आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी एक कोटी अशा एकुण चार कोटींच्या मुदत ठेवी आहेत. पणन संचालक यांच्याकडे चार कोटींची कामे मंजुरीसाठी प्रलंबित असल्याचेही सभापती नवले व प्रभारी सचिव वाबळे यांनी सांगितले.
Post a Comment