ओबीसीच्या एल्गार मोर्चाबबत तहसीलदार व आमदार कानडे यांना निवेदन
श्रीरामपुर (प्रतिनिधी )- ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे ओबीसी समाजाच्या ३५० जातीवर हा अन्याय असुन या आरक्षणास आमची हरकत असल्याचे लेखी पत्र श्रीरामपुर तालुक्यातील ओबीसी समाजाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले या वेळी बोलताना समता परिषदेचे नेते चंद्रकांत झुरगे म्हणाले की मंडल आयोगाच्या शिफारशी नुसार आम्हाला आरक्षण मिळालेले आहे या आरक्षणात असलेला अठरा पगड जातीचा समाज गोर गरीब दिन दलीत कुटुंबाचा समावेश आहे त्यामुळे ओबीसी समाजाच्या कोट्यातून आरक्षण दिल्यास सर्वात मोठ्या असणाऱ्या ओबीसी समाजावर अन्याय होईल.तसेच मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी तयार करण्यात आलेली प्रश्नावली चुकीची व आक्षेपार्ह असुन सगेसोयरे या बाबत काढलेला आदेशही चुकीचा असल्याचे झुरंगे म्हणाले या वेळी नायाब तहसीलदार व्ही आर कल्हापुरे यांनी निवेदन स्विकारले त्यानंतर ओबीसी समाजाच्या वतीने आमदार लहु कानडे यांनाही निवेदन देण्यात आले त्या वेळी बोलाताना आमदार लहु कानडे म्हणाले की तिन चाकाचे हे शासन सर्व सामान्यांना मुलभुत गरजांच्या प्रश्नापासुन दुर ठेवण्यासाठी ही जातीयवादाची खेळी खेळत आहे सर्व सामान्य नागरीकांना आपल्या हक्कापासुन वंचित ठेवण्यासाठी हे जातीयवादाचे विष कालवले जात आहे सुज्ञ मतदारांनी वेळीच सावध व्हावे असेही ते म्हणाले या वेळी दत्तात्रय साबळे बेलापुरचे माजी सरपंच भरत साळूंके यांनीही मनोगत व्यक्त केले या वेळी सुभाष गायकवाड विठ्ठल दुधाळ वासंत लिंगायत सुनिल ससाणे अनिल मुंडलीक अशोक शिरसाठ राजेंद्र साताभाई राजेंद्र टेकाडे मारुती राशिनकर शिवाजी जेजुरकर प्रकाश कुर्हे कलेश सातभाई जाकीर शेख एकनाथ नागले अशोक गवते फैय्याज बागवान दिपक गीरमे किरण बोरावके बाबासाहेब ढगे आदिसह तालुक्यातील ओबीसी बांधव उपस्थित होते
Post a Comment