पक्षाचे आपल्यावर टाकलेला विश्वास आणी जबाबदारी यास पुर्णपणे सार्थ करण्याचा प्रयत्न करणार असुन पक्ष वाढीसाठी आहोरात परिश्रम घेवून कार्यकर्त्यांची मोठी फळी जिल्ह्यात उभी करुन जनसामान्यांचे ज्वलंत प्रश्न आणी त्यांच्या न्याय हक्कासाठींचा लढा हा अधिक जोमाने पुढे नेणार आहे सोबतच येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका, महानगर पालिका, ग्रामपंचायत अशा सर्वच निवडणुकीत समाजवादी पक्ष पुर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरणार असल्याचे यावेळी जोएफ जमादार यांनी सांगितले.
आजवरच्या इतिहासात संस्थेला उच्चांकी उत्पन्न व नफा
बेलापुर (प्रतिनिधी) श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी १२ कोटी २४ लाख ५१ हजार ६८१ चा मुळ अर्थसंकल्प पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना सादर केला असुन संस्थेला आजवरच्या वाटचालीत विक्रमी उत्पन्न व नफा मिळाला असल्याची माहिती सभापती सुधीर पा. नवले व प्रभारी सचिव साहेबराव वाबळे पा .यांनी दिली आहे
श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या कामकाजा विषयी माहीती देताना सभापती सुधीर नवले व प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी पुढे सांगितले की, संस्थेची दि.३० एप्रिल २०२३ रोजी निवडणूक होऊन दि.१३ मे २०२३ मा.आ.भानुदास मुरकुटे व युवा नेते करण दादा ससाणे यांच्या नेतृत्वाखाली नवीन संचालक मंडळ कार्यरत झाले आहे. संस्थेला डिसेंबर २०२३ अखेर २ कोटी ४३ लाख ७२ हजार ६६० रुपयांचे उत्पन्न मिळाले असुन ७१ लाख ७० हजार ५८२ रुपयांचा नफा झाला आहे.
या बजेटमध्ये मुख्य बाजार आवारात ८ कोटी १३ लाख व बेलापूर व टाकळीभान उपबाजार आवारातील १ कोटी ९५ लाखांची नियोजित बांधकामे समाविष्ट आहेत. तसेच संस्थेमार्फत एक नवीन उपबाजार, टाकळीभान येथे पेट्रोल पंप उभारणे, जनावरांच्या बाजार वाढीसाठी आवश्यक ते प्रयत्न करणे, फळे व भाजीपाला विभागात शितगृह उभारणी, नवीन डाळिंब मार्केट सुरु करणे आदी कामे करण्याचा मानस आहे. संस्थेला आजपर्यंत झालेल्या अर्थसंकल्पीय बजेटपुर्वीच्या डिसेंबर २०२३ अखेर २ कोटी ४३ लाख ७२ हजारांचे विक्रमी उत्पन्न मिळाले असुन ७१ लाख ७० हजारांचा नफा मिळाला आहे, आजवरच्या वाटचालीत हे उत्पन्न आणि नफा उच्चांकी असल्याचे सभापती नवले यांनी सांगितले. संस्थेचा कारभार अतिशय पारदर्शक व काटकसरी पद्धतीने सुरु असल्याची माहिती प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली.
तसेच संस्थेच्या बँकेत तीन कोटी आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी एक कोटी अशा एकुण चार कोटींच्या मुदत ठेवी आहेत. पणन संचालक यांच्याकडे चार कोटींची कामे मंजुरीसाठी प्रलंबित असल्याचेही सभापती नवले व प्रभारी सचिव वाबळे यांनी सांगितले.
तिलक डुंगरवाल, विकास डेगळे, राहुल रणपिसे, भरत डेगळे, श्रीधर कराळे पाटील, प्रशांत बागुल ,प्रवीण लगडे, सलीम शेख, अमोल नवघरे, ,डाॅ प्रवीण राठोड,,डाॅ सचिन थोरात, राज डेंगळे, भागवत बोंबले, देवराज मुळे ,मनोज बोंबले, मोहन तेलोरे , महेश कवठाळे, प्रवीण काळे ,गणेश भडांगे, शिवा मोरे, संदीप शिरसाट, मुबारक शेख, महबूब प्यारे, युवराज घोरपडे ,निलेश घोरपडे, सतीश सुलताने, अभिजीत राऊत, प्रसाद कटके, अलीम भाई शेख, विशाल शिरसाट, भागवत घुगे ,सुभाष भडांगे, शिवशंकर मोरे, नितीन मोरे ,गणेश पवार, प्रदीप ऊडे, राहुल राऊत, शुभम मालकर, गोकुळ जाधव, जयेश खर्डे, गणेश गवारे, विजय भवार, आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते
बेलापुर (प्रतिनिधी )- अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी प्रभु श्रीरामचंद्राच्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सर्व मांसाहारी पदार्थ ( चिकन मटन मासे )विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा ऐतिहासीक निर्णय बेलापुरातील मांस व मासे विक्री करणाऱ्या व्यवसायीकांनी घेतला असुन या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे . बेलापुर जन्मभूमी असलेले गोविंददेवागिरीजी महाराज तथा आचार्य किशोरजी व्यास यांची प्रभु श्रीराम मंदिराच्या खजिनदार पदी नियुक्ती झाल्यानंतर ते प्रथमच बेलापुरात आले असता मुस्लिम समाजाने त्यांना मस्जिदमध्ये नेवुन राम मंदिर उभारणीसाठी ५१ हजार रुपयांची देणगी दिली होती तसेच आषाढी एकादशी व बकरी ईद हे सण एकाच दिवशी येत असल्यामुळे हिंदु बांधवच्या उपवासाचे महत्व लक्षात घेवुन दोन दिवस कुर्बानी न देण्याचा निर्णयही बेलापुरातील मुस्लिम बांधवांनी घेतला होता . त्याच धर्तीवर बेलापुर ग्रामपंचायतीच्या वातीने
बेलापूर बु ग्रामपंचायत कार्यालय येथे चिकन,मटन, मासे विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली.या बैठकीत अयोध्या येथे दिनांक २२ जानेवारी रोजी प्रभु श्रीराम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असल्याने या दिवशी चिकन, मटण, मासे आदी विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात यावी अशी विनंती उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख, चंद्रकांत नवले यांनी सर्व विक्रेत्यांना केली या विनंतीला मान देत सर्व व्यवसायीकांनी दिनांक २२ जानेवारी रोजी आपली दुकाने बंद ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला. यावेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,चंद्रकांत नवले,ग्राम विकास अधिकारी मेघशाम गायकवाड, बाबुराव पवार,मारुती गायकवाड, फरहान कुरेशी, शाहरुख शेख, मुस्तकिम सय्यद, फिरोज सय्यद, श्रीलाल गुडे, जुबेर कुरेशी, अबीद पठाण,रामू गुडे रज्जाक पटेल, मुझफर कुरेशी,कय्युम कुरेशी, उबेद कुरेशी, गोलू आतार आदी उपस्थित होते.