समाजासाठी विघातक कृत्य करणारावर कारवाई करणार पोलीस निरीक्षक नितीन देशमुख

बेलापुर (प्रतिनिधी  )-पोलीस खात्याचे ब्रिदवाक्य सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असुन या ब्रिदवाक्याप्रमाणे चांगल्याला चांगली वागणुक व वाईटाला वाईटच वागणुक दिली जाईल समाजासाठी विघातक असणारे कृत्य करणारावर निश्चितच कारवाई केली जाईल असा ईशारा श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचा नव्यानेच पदभार घेतलेले पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिला बेलापुर ग्रामपंचायत, बेलापुर पत्रकार ,ग्रामस्थ यांच्या वतीने नविन अधीकाऱ्याचे स्वागत व बदली झालेल्या अधिकाऱ्याचा निरोप समारंभाचे आयोजन बेलापुर पोलीस स्टेशन येथे करण्यात आले होते त्या वेळी ते बोलत होत पोलीस निरीक्षक देशमुख पुढे म्हणाले की मी वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी केली त्या निमित्ताने अनेकांशी संपर्क आला परंतु श्रीरामपुर तालुक्यातील बेलापुर गावातील नागरीक सकारात्मक दृष्टिकोन ठेवुन काम करतात याचा आनंद वाटला हिंदु मुस्लिम ऐक्याचे आदर्श उदाहरण या गावात पहायला मिळते अशाच प्रकारे सर्वत्र सर्व समाजाने सामंजस्य दाखविले तर पोलीसांचेही काम कमी होईल या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे म्हणाले की या ठिकाणी काम करताना वेगळाच अनुभव आला या गावातील सर्व नागरीक पुढाकार घेवुन आपल्या समस्या स्वतःच सोडवितात ऐकमेकांचे सण उत्सव साजरे करतात दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होतात अशा गावात काम करण्याची संधी मिळाली आपणाकडून मिळालेल्या चांगल्या कामाची शिदोरी मी जाताना बरोबर घेवुन जात आहे बदली हा नोकरीचा भाग आहे परतु येथे भरपुर काही शिकण्यास मिळाले त्याचा उपयोग भविष्यात काम करताना  निश्चितच होईल गावाने सुरु केलेल्या चांगल्या परंपरा अशाच सुरु ठेवाव्यात असा आग्रह त्यांनी व्यक्त केला या वेळी पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके बाजार समितीचे उपसभापती तथा उपसरपंच अभिषेक खंडागळे  टँक्सी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष व पत्रकार सुनिल मुथा,भाजपा सरचिटणीस प्रफुल्ल डावरे,
 भाजपा अल्पसंंख्यांक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष  हाजी ईस्माईल शेख प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे  मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष दिलीप थोरात बेलापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे आदिंनी मनोगत व्यक्त केले  या वेळी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मांसाहार विक्रीची दुकाने स्वंयम् स्फूर्तीने बंद ठेवणारे व्यापारी रसीद कुरेशी फिरोज कुरेशी फरहान कुरेशी जुबेर कुरेशी यासीन कुरेशी शाहीद कुरेशी ईरफान कुरेशी यासीर कुरेशी रामु गुडे अजीजभाई शेख राज्जाक पटेल दाऊद आतार श्रीलाल गुडे अबेद पठाण कय्युम कुरेशी आदिंचा सन्मान पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला .या वेळीग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,बाळासाहेब दाणी,पत्रकार दिलीप दायमा,सुहास शेलार,प्रसाद खरात,अजीज शेख, मोहसीन सय्यद,जाकीर शेख,रत्नेश गुलदगड, नितीन शर्मा, जीना शेख,बाबुलाल पठाण, हवालदार दिपक कदम ,हवालदार बाळासाहेब कोळपे बेलापुर पोलीस स्टेशनचे  गौतम लगड भारत तमनर संपत बडे नंदु लोखंडे ज्ञानेश्वर वाघमोडे धनंजय वाघमारे महेश थोरात समीर शेख आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन  पत्रकार देविदास देसाई यांनी केले तर ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक यांनी आभार मानले.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget