महाले पोदार क्रीडा संकुलात रंगणार राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेच्या मुलींच्या संघाचे सराव शिबिर.राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक विजेते खेळाडूंचा देखील सहभाग.
श्रीरामपुर (प्रतिनिधी) :- महाले पोदार क्रीडा संकुलात महाले प्रतिष्ठान व अहमदनगर पासिंग व्हॉलिबॉल असोसिएशनच्या वतीने मिरज येथे दि २३ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान आयोजित होणाऱ्या १४ वर्षाखालील मुला-मुलीच्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धाचे सराव शिबीर दि २० जानेवारी ते २२ जानेवारी पर्यंत आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महाले प्रतिष्ठान ओम महाले यांनी दिली.या सराव शिबीरासाठी अहमदनगर,पुणे व सोलापुर जिल्हातून निवड झालेल्या संभाव्य २० मुली सहभागी होणार आहेत.सकाळ ६:०० ते १०:०० व सायंकाळ ४:०० ते ७:०० अशा दोन सत्रात सराव शिबिर आयोजित होणार आहे.शिबिरा दरम्यान व्यायाम व आहार तज्ञ डॉ सुभाष देशमुख यांच्या देखील चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. निवड झालेल्या संभाव्य २० खेळाडूंमध्ये बहुतेक खेळाडूंनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केलेले आहे, तसेच राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक देखील पटकावले आहे. तीन दिवसीय व्हॉलीबॉल शिबिर महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे माजी अध्यक्ष व लेवल वन प्रशिक्षक पार्थ दोशी व श्रीरामपूरचे क्रीडा रत्न नितीन बलराज यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे. व्हॉलीबॉल शिबिर हे श्रीरामपूरकरांसाठी पर्वणी असून जास्तीत जास्त शाळेच्या विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी या शिबिरासाठी आपल्या पाल्याला बघण्यासाठी घेऊन यायचं आहे, असे आवहान अहमदनगर पासिंग व्हॉलिबॉल असोसिएशनच्या वतीने करण्यात येत आहे.शिबिर महाले पोतदार शाळेमध्ये आयोजित होणार आहे
Post a Comment