Latest Post

खेळाडूंच्या पालकांच्या हस्ते श्रीफळ फोडून झाली स्पर्धेला सुरुवात 


श्रीरामपुर(गौरव डेंगळे): आरोग्य व शारीरिक क्षमता यामधील फरक खेळाडूंना क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक व पालक यांनी लहान वयात लक्षात आणून देणे खूपच गरजेचे आहे.यश-अपयश,संघात निवड याहीपेक्षा खेळाडूंनी खेळण्याच्या फायद्यांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे,असे प्रतिपादन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक विजेते प्रा सुभाष देशमुख यांनी पुणे विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या निवड चाचणी प्रसंगी केले.

येथील महाले पोदार क्रीडा संकुलच्या व्हॉलिबॉल मैदानावर चौदा वर्षाखालील मुला-मुलींच्या पुणे विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेची आज निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या निवड चाचणीसाठी पुणे जिल्हा,अहमदनगर जिल्हा व सोलापूर जिल्ह्यातून सुमारे १५० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन प्रा सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाले प्रतिष्ठानचे श्री ओम महाले, दैनिक स्नेहप्रकाश कार्यकारणी संपादक श्री स्वामीराज कुलथे,श्री सनी हिरन,श्री पार्थ दोशी, कुलदीप कोंडे,श्री पापा शेख, नितीन बलराज,श्री शैलेंद्र त्रिपाठी,श्री शंभूराजे मनुर,सर्वेश राठी,धनंजय माळी, नितीन फुलपगार सह आदी मान्यवर उपस्थित होते .प्रा देशमुख यांनी निवड चाचणी स्पर्धेपूर्वी सर्व खेळाडूं तंदुरुस्त राहण्यासाठी काही व्यायामाचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी या सर्व व्यायाम प्रकाराचा खेळाडूंबरोबर पालकांनी देखील आनंद घेतला.

या निवडचाचणीतून संभाव्य १६ मुले व १६ मुलीच्या पुणे विभाग संघाची घोषणा करण्यात आली आहे. स्पर्धेपूर्वी होणाऱ्या शिबिरातून अंतिम १२ मुले व १२ मुलीच्या संघाची घोषणा करण्यात येईल अशी माहिती श्री नितीन बलराज यांनी दिली. दिनांक २४ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान मिरज येथे राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित होणार आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-  अनुगामी लोकराज्य महाभियान अर्थात अनुलोम संस्थेच्या माध्यमातून राज्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असुन येत्या २२ तारखेला आयोध्देत होणाऱ्या सोहळ्याचे औचित्य साधुन श्रीरामपुर तालुक्यात प्रभू श्रीरामचंद्राच्या  एकुण ३२ मूर्तीचे वाटप करण्यात येणार असुन उक्कलगाव येथील वस्ती मित्र शाम नागरे यांना सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगीरीजी महाराज यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची मूर्ती प्रदान करण्यात आली                        महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतुन अनुलोम संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजीक उपक्रम राबविण्यात येत असुन येत्या २२ जानेवारीला आयोध्येत प्रभू श्रीराम चंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे .त्याच धर्तीवर अनुलोम संस्थेच्या सहकार्याने राज्यात प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीचे वितरण करण्यात आले श्रीरामपुर तालुक्यातील उक्कलगाव येथील वस्ती मित्र शाम नागरे यांना प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचे मठाधिपती महंत रामगीरीजी महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले श्रीरामपुर तालुक्यातील उक्कलगाव येथील नागरे परिवाराला हा बहुमान मिळाला महंत रामगीरीजी महाराज यांच्या हस्ते  नागरे परिवारातील सामाजिक कार्यकर्ते शाम नागरे व मुकुंद नागरे यांना मूर्ती प्रदान करण्यात आली उक्कलगाव येथे सडा रांगोळी काढुन वाजत गाजत प्रभू श्रीरामाची मूर्ती नागरे यांच्या निवासस्थानी आणण्यात आली या वेळी अनुलोम संस्थेच्या सौ सुनंदा आदिक यांच्या हस्ते विधीवत पुजा करुन मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली या वेळी राज्याचे उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाम नागरे यांना पाठविलेल्या पत्राचे वाचन करण्यात आले या वेळी उक्कलगावच्या लोकनियुक्त महीला सरपंच कु. रविना शिंदे उक्कलगाव ग्रामपंचायत सदस्य दिलीप थोरात, अनिल जनार्धन थोरात, रविंद्र जगधने, पत्रकार शरद थोरात, परशुराम आदिक ,हरिहर केशव गोविंद मंदिराचे पुजारी अरविंद तांबे, विनायक तांबे ,सोपान पगारे, मधुकर पुजारी, सुरेश मुसमाडे ,शुभम जगधने, केसापुर येथील डोखे, श्री शिव प्रतिष्ठाण हिंदुस्थान उक्कलगावचे मावळे, श्री हरिहर भजनी मंडळ तसेच उक्कलगावचे ग्रामस्थ उपस्थित होते या वेळी अनुलोम संस्थेच्या सौ सुनंदा आदिक यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार देविदास देसाई यांनी केले तर ग्रामपंचायत सदस्य दिलीप थोरात यांनी आभार मानले

श्रीरामपूर प्रतिनिधी:महाराष्ट्रातील सर्व बारा कोटी जनतेसाठी अतिशय महत्त्वाची व लाभदायक ठरणारी पाच लाख रुपयांची आरोग्य विमा योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना विविध आजारांवरील उपचारासाठी होणारा ५ लाख रूपयांपर्यंतचा खर्च राज्य सरकार देणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र साऊ एकल महिला पुनर्वसन समितीचे समन्वयक, मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य व भाजपचे श्रीरामपूर शहर उपाध्यक्ष मिलिंदकुमार साळवे यांनी केले.

ज्येष्ठ संपादक शौकत शेख व त्यांचे चिरंजीव मोहसीन शेख यांनी पत्रकारदिनी सुरू केलेल्या "मोहसिन-ए-मिल्लत" या मासिकाच्या प्रकाशनप्रसंगी येथील समता कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूट समोरील संत मदर तेरेसा सर्कल प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हाजी इलाहिबक्ष कुरेशी हे होते. 

मासिकाचे संपादक मोहसिन शेख यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ संपादक शौकत शेख,

माजी नगरसेवक नजीर मुलाणी,  महेबुब कुरेशी, तौफिक शेख,  असिफ तांबोळी, जाफर शहा,  सलाऊद्दीन शेख, मुखतार मनियार,असलम बिनसाद, हाजी लतीफ सय्यद, रियाजखान पठाण, स्वामीराज कुलथे, विजय खाजेकर, डी.एल.भोंगळे, आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मिलिंदकुमार साळवे म्हणाले, महाराष्ट्रातील झोपडपट्टी पासून ते महालापर्यंत राहणाऱ्या सर्व आर्थिक व सामाजिक घटकातील वर्गाला ५ लाख रूपयांच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करणाऱ्या या मोफत आरोग्य विम्याचा गोरगरीब जनतेस मोठा लाभ होणार आहे.

२८ जुलै २०२३ रोजी या अतिशय महत्त्वाच्या योजनेचा शासन निर्णय जारी झाला आहे.  त्यानुसार महाराष्ट्र सरकारची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व केंद्र सरकारची आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. महाराष्ट्रात २ जुलै २०१२ पासून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू करण्यात आली. त्यानुसार वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा त्यापेक्षा कमी अशा कुटुंबांचा म्हणजेच दारिद्र्यरेषेखालील पिवळे शिधापत्रिकाधारक, अंत्योदय, अन्नपूर्णा व दारिद्र्यरेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारक यांचा या योजनेत समावेश होता. पात्र कुटुंबाला मोफत आरोग्य विमा संरक्षण देण्यात आले होते. यासाठीचा विमा हप्ता महाराष्ट्र सरकार भरत होते. त्यामुळे रुग्णाला मान्यताप्राप्त रुग्णालयात कोणतीही रक्कम द्यावी लागत नव्हती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर २०१४ मध्ये या योजनेचे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे नामकरण करून यासाठी मंत्रालयात विशेष कक्षही सुरू करण्यात आला. दरम्यान २३ सप्टेंबर २०१८ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  देशभरात केंद्र सरकारची आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना २३ सप्टेंबर २०१८ पासून लागू केली. १ एप्रिल २०२० च्या शासन निर्णयानुसार केंद्र व राज्याच्या दोन्ही योजनांची एकत्रित अंमलबजावणी सुरू झाली. केंद्राच्या योजनेत ५ लाखांचा, तर राज्याच्या योजनेत दीड लाख रुपये प्रति कुटुंब, प्रतिवर्ष आरोग्य विमा संरक्षण लाभ देय करण्यात आला. 

२८ जुलै २०२३ ला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयानुसार केंद्र व राज्य अशा दोन्ही योजनांची एकत्रित सांगड घालून महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या सर्व १२ कोटी जनतेला सरसकट ५ लाख रूपयांचे आरोग्य विमा संरक्षण लागू करण्यात आले. राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबे व महाराष्ट्राचे रहिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांना सुधारित महात्मा फुले ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना लागू केली आहे. विम्याचे पैसे महाराष्ट्र सरकार संबंधित विमा कंपनीस देणार असल्याने १२ कोटी महाराष्ट्रवासियांना योजनेच्या यादीतील रूग्णालयांमधून ५ लाख रूपये खर्चापर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत, असेही साळवे यांनी सांगितले.

----------------------------

*सध्या यांना मिळते केंद्राचे कार्ड*

सध्या २०११ च्या सामाजिक, आर्थिक, जातनिहाय सर्वेक्षणाच्या यादीत नाव असणारांनाच केंद्र सरकारच्या योजनेचे कार्ड ऑनलाईन मिळत आहे. त्यासाठीही शिधापत्रिकेचा बारा अंकी क्रमांक व आधार क्रमांक गरजेचा आहे. अनेकांकडे शिधापत्रिकेचा बारा अंकी ऑनलाईन क्रमांक नसल्याने त्यांना हे  कार्ड मिळत नाही. त्यामुळे शिधापत्रिकेऐवजी थेट आधार क्रमांक व मतदार ओळखपत्राद्वारे रहिवासी असल्याची खात्री करून नव्या योजनेचे कार्ड तातडीने वाटप करण्याची मागणी मिलिंदकुमार साळवे यांनी केली आहे.

-------------------------------

*यामुळे रखडली योजना*

अंमलबजावणी सहाय्य संस्था व अंगीकृत रूग्णालयात आरोग्य मित्रांची नियुक्ती, योजनेच्या आज्ञावलीत बदल, राज्य आरोग्य हमी सोसायटी स्तरावर मनुष्यबळ  नियुक्ती, एकत्रित योजनेच्या अंमलबजावणीसाठी नव्या विमा कंपनीची निवड अशी कार्यवाही न झाल्याने योजना मंत्रालयात रखडली आहे.

--------------------------------

*जनतेतून साकारली योजना*

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी जनतेकडून सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार मी विदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी किमान ५ लाख रूपयांचा आरोग्य विमा (मेडिक्लेम) योजना लागू करण्याची सूचना केली होती. तिची दखल घेऊन ही योजना साकारली, याचा आनंद आहे. शासन जनतेचा आवाज ऐकते,याचा प्रत्यय यातून आला. मंत्रालयातील कार्यवाही जलदगतीने पूर्ण करून तातडीने योजनेची अंमलबजावणी झाली पाहिजे.

*--मिलिंदकुमार साळवे,* मिशन वात्सल्य शासकीय समिती, महाराष्ट्र साऊ एकल महिला पुनर्वसन समिती.

----------------------------------------


👇 *बॉक्स मध्ये घेणे* 👇


*प्रत्येक समाजातील महिलांनी पुढे येवून प्रत्येक कार्यक्रमात सहभाग नोंदवणे गरजेचे - दिपालीताई ससाणे*


*पत्रकार दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या मोहसिन ए मिल्लत या* *वर्तमानपत्र प्रकाशन सोहळ्यात महिलांचा मोठा सहभाग लाभला*

*या कार्यक्रमास महिलांसाठी खास स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली होती. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव दिपालीताई ससाणे यांच्या हस्ते यावेळी मोहसिन शेख संपादित मोहसिन ए मिल्लत या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.*

*या प्रसंगी मोहसिन ए मिल्लत या वृतपत्रास शुभेच्छा व्यक्त करताना आपल्या शुभेच्छापर भाषणात सौ.ससाणे  म्हणाल्या की, महिलांनी चुल आणि मुल यापर्यंतच मर्यादित न राहता प्रत्येक समाजातील महिलांनी प्रत्येक कार्यक्रमात पुढे येवून कामे केली पाहिजेत असे प्रोत्साहनही यावेळी त्यांनी महिलांना दिले. तसेच या कार्यक्रमात महिला भगीनींची मोठी उपस्थिती पाहून तथा मोहसिन ए मिल्लत या वृतपत्राच्या अनावरण सोहळ्यास उपस्थित राहुन मनाला मोठे समाधान मिळाले असल्याचे ते म्हणाल्या.*

----------------------------------------

यावेळी महेबुब कुरेशी, हाजी लतीफभाई सय्यद,नजीर मुलाणी, रियाजखान पठाण, जोएफ जमादार, हाजी इलाहिबक्ष कुरेशी, मुखतार मनियार, आसिफ मनियार, असलम बिनसाद, विजयराव खाजेकर , शौकत शेख, ॲड. मुमताज बागवान, सलवा शेख, फरजाना शेख आदींची शुभेच्छापर भाषणे झाली.

यावेळी बोलताना शौकत शेख म्हणाले की ज्येष्ठ पत्रकार मिलिंद कुमार साळवे यांनी शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती ही खुपच सविस्तरपणे याप्रसंगी दिली आहे,

 मोहसिन ए मिल्लत या वर्तमानपत्राच्या माध्यमातून देखील घराघरात शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती पोहोचविण्याची कामे केली जाणार असुन त्या अनुषंगाने अभा कार्ड/ आयुष्यमान भारत कार्ड कार्ड/ ई- श्रम कार्ड/ पेन्शन कार्ड याची सविस्तर माहिती सदरील अंकात सविस्तरपणे प्रकाशित करण्यात आलेली आहे, याप्रमाणेच शासनाच्या आणखी ज्या काही विविध जनकल्याणकारी योजना आहेत त्याची माहिती देखील प्रत्येक अंकात सविस्तरपणे दिली जाणार आहे, आमच्या मोहसिन ए मिल्लत कमेटी चा उद्देश केवळ हाच आहे की शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती ही तळागळातील जनसामान्यांपर्येंत पोहोचावी आणी त्यात त्यांचा फायदा व्हावा,शासनाने त्यांच्यासाठी निर्माण केलेल्या विविध जनकल्याणकारी योजनांची त्यांना घरबसल्या माहीती मिळावी,यासाठी खास करुन सदरील कामी कार्यरत असलेल्या विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या मुलाखती देखील क्रमाक्रमाने या अंकात सविस्तरपणे प्रकाशित केल्या जाणार असल्याचेही ते म्हणाले.

या कार्यक्रमास माजी नगरसेवक नजीर मुलाणी, रियाजखान पठाण, हाजी लतीफभाई,  महेबुब कुरेशी, जाफर शाह,  शेख नजीर गफूर (मामु),  जोएफ जमादार,  तौफिक शेख (एकता),  शेख शब्बीर (सर),  अजहर शेख (एबीएस),  असिफ तांबोळी,  फिरोज शेख,  रज्जाक पठाण,  शेख जाकीर (सर), मास्टर सरवरअली सय्यद, सलाऊद्दीन शेख, इब्राहिम शेख, असलम बिनसाद, इम्रान एस. शेख, विजयराव खाजेकर, दशरथ भोंगळे, प्रविण साळवे, डॉ. पंडितराव पगारे, रमाताई भालेराव, परवीनभाभी शाह, विजय पाठक,  दिलीप शेंडे (सर), ॲड.मुमताज बागवान, हाजी साजीद मिर्जा, शकील बागवान (सर), जलील कुरेशी (सर),  समीर बागवान, लकी सेठी, जावेद पिंजारी, अजिज अत्तार, असिफ मंडपवाले, पत्रकार बाबासाहेब चेडे, राजेश भवार, नंदकुमार बगाडे, सचिन भालेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

तर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मोहसिन ए मिल्लत कमेटी चे शौकतभाई शेख, मोहसिन शेख, हाजी इलाहिबक्ष कुरेशी, ॲड. हारुन बागवान, नदीमताज गुलाम, शब्बीर (राजु) कुरेशी , सरताज शेख, आरिफ कुरेशी, इब्राहिम बागवान (सर), मो.शफी अन्सारी, अफजल मेमन, मोहसिन बागवान, शब्बीर शेख, जावेद शेख, युनूस कुरेशी, हाजी फयाज बागवान, मुखतार मनियार, कलीम शेख, जाकीर शाह, समदानी शाह,जुबेर पटेल, वाजीद शेख तसेच सलवा शेख, फरजाना शेख,जेबा शाह,  हिना मुलाणी, आस्मा सय्यद, जबीन पटेल, निलोफर बागवान, आर्शिया नदीम गुलाम, पूजा सकट, अनम खान आदिंनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी मोहसिन ए कमेटीचे कार्याध्यक्ष हाजी इलाहिबक्ष कुरेशी यांनी आभार मानले.

श्रीरामपुर (गौरव डेंगळे):श्रीरामपूर नगरपरिषद व संस्कार स्पोर्ट्स क्लब श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय पींच्याक सिल्याट स्पर्धा दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी प्रियदर्शनी मंगल कार्यालय श्रीरामपूर या ठिकाणी संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये तालुका व परिसरातील ४० हून आदीक शाळेंच्या व क्लबच्या जवळजवळ  २०० च्या वर खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला.संस्कार स्पोर्ट्स क्लब श्रीरामपूर हे या स्पर्धेमध्ये  चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन क्रमांकाची ट्रॉफी चे मानकरी  ठरले. तसेच पहिल्या क्रमांकाचे ट्रॉफी चे मानकरी सुजाता इंटरनॅशनल स्कूल सोनई, दुसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफी चे मानकरी अशोक इंग्लिश मीडियम स्कूल श्रीरामपूर, तिसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफी चे मानकरी संघर्ष स्पोर्ट्स क्लब ठरले. या स्पर्धेसाठी श्रीरामपूर तालुका व परिसरातील पालक व क्रीडाप्रेमींनी आपली  उपस्थिती दर्शवली. 

         पिंच्याक सिलाट हा खेळ इंडोनेशियन मार्शल आर्टचा प्रकार असून १) स्टॅंडिंग २) तुंगल ( सिंगल काता) ३) रेगु ( ग्रुप काता ) ४) गंडा ( डेमो फाईट ) ५) सोलो ( क्रिएटिव्हिटी ) या पाच प्रकारात खेळला जातो.हा खेळ भारतीय क्रीडा मंत्रालय, 5% नोकरी आरक्षण , युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार, भारतीय विश्वविद्यालय संघ, अखिल भारतीय पोलीस खेळ नियंत्रण बोर्ड , ऑलम्पिक कौन्सिल ऑफ एशिया , एशियन गेम , एशियन मार्शल आर्ट गेम , एशियन युथ गेम व एशियन बीच गेम , राष्ट्रकुल स्पर्धा अशा ऑफिसियल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये  खेळला जातो . या स्पर्धेचे मुख्य अतिथी व आयोजक नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री गणेश शिंदे  यांनी खेळाडूंना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देऊन खेळातून खेळाडूंचे नक्कीच उज्वल भविष्य निर्माण होऊ शकते , व खेळाडूंचे मानसिक व शारीरिक आरोग्य राखण्यास मदत मिळू शकते असे मोलाचे मार्गदर्शन केले. स्प

र्धा संपन्न करण्यासाठी संस्कार स्पोर्ट्स क्लबचे मुख्य प्रशिक्षक तसेच अहमदनगर असोसिएशनचे अध्यक्ष श्री प्रवीण कुदळे, राष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक नरेंद्र कुदळे, राष्ट्रीय खेळाडू  राधिका खरात, कल्याणी भोसले, नारायण झांबरे, प्रशिक्षक श्री चेतन खावडिया संस्कार स्पोर्ट्स क्लबचे सर्वच खेळाडू,  नगरपालिकेच्या ग्रंथपाल कुमारी स्वाती पुरे , स्वप्नील चव्हाण, इत्यादींनी यांनी परिश्रम घेतले. 

सर्व यशस्वी खेळाडूंना राजकीय सामाजिक क्रीडा व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

कोपरगाव( गौरव डेंगळे) : कोळपेवाडी येथील राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर येथे दि २ ते ४ जानेवारी रोजी ५१ वे कोपरगाव तालुकास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शन संपन्न झाले. श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल येथील इयत्ता दहावीचा विद्यार्थीनी कुमारी मृणाल नीरज डंबिर हिने इयत्ता ९ ते १२ या गटांमध्ये गणित प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक पटकावला व जिल्हास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनासाठी पात्र ठरली आहे.मृणालला विज्ञान चे शिक्षक नारायण गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल मृणालचे शाळेचे प्राचार्य श्री के एल वाकचौरे,उपप्राचार्या शुभांगी अमृतकर,प्रज्ञा पहाडे,पल्लवी ससाणे,नैथिलिन फर्नांडिस, रणजीत खळेअर्चना गायकवाड, रूपाली भोरकडे,स्वरूपा वडांगळे आदींनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

बेलापूर (वार्ताहर) येथील श्री. साई पावन प्रतिष्ठान निर्मित श्री. साईबाबा मंदिरांच्या प्रांगणात आकर्षक अशा गाय- वासरु पुतळ्याची पंडीत महेश व्यास,आ. लहू कानडे व अशोक कानडे बंधूंच्या हस्ते विधिवत पूजन करुन स्थापना तसेच मध्यान्ह महाआरती करण्यात आली.


सुमारे सव्वा लाख रुपये खर्चाच्या या गोमाता स्थापनेच्या उपक्रमासाठी सर्वश्री सोमनाथ पलोड , प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र लखोटिया आणि विश्वस्त दिपक सिकची यांनी प्रत्येकी एक्केचाळीस हजारांची देणगी दिली.


या कार्यक्रमास सर्वश्री आ. लहू कानडे, अशोक कानडे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा.नाईक, उद्योजक सुवालाल लूंकड, सचिन गुजर, शरद नवले,विराज भोसले, विलास थोरात, ज्ञानेश्वर मुरकुटे, अशोक भोसले, राजेंद्र ओहोळ, भरत साळुंके, प्रमोद कर्डीले, आनंदराम उपाध्ये, प्रा .माधव पगारे,नारायण शेडगे, सुभाष पा.नाईक,झांजरी,श्रीमती सरस्वती चायल, विश्वस्त सौ. सुरेखा चायल, सुजाता मालपाठक, सौ. पलोड,  सौ.संगीता लखोटिया, आरती बिहाणी, संजना चायल, आरती सिकची,आरती झंवर,आदी उपस्थित होते. यावेळी अशोक कानडे यांना वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी सन्मानित केले.


प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कैलास चायल यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत करुन शेवटी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी साई पावन प्रतिष्ठान व साई सेवा समितीच्या सर्वश्री कैलास चायल, राजेंद्र लखोटीया, संजय लड्डा, रामबिलास झवर, दत्तात्रय दाभाडे, प्रशांत बिहाणी, प्रमोद कर्डीले, दिपक सिकची, रमेश पवार, शशिकांत कापसे, गोपाल चायल, आदींनी परिश्रम घेतले.

बेलापुर  (प्रतिनिधी )-अवकाळी पावसामुळे  तालुक्यातील शेतकऱ्यांच्या  शेत पिकांच्या  नुकसानीचे सरसकट पंचनामे करुन वंचित राहिलेल्या सर्व शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने श्रीरामपूर प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले

या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की  राज्य शासनाने सर्व शेतकऱ्यांचे बांधावर जाऊन सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा असे आदेश असताना देखील श्रीरामपूर तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत श्रीरामपूर तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन आपले महसुलचे सर्कल अधिकारी, तलाठी हे व्यवस्थित रित्या पंचनामा करुन आपल्याकडे व शासनाकडे शेतकर्‍यांचे नाव,गाव, पत्ता बँकेचे अकौंट नंबर, पासबुक झेरॉक्स व्यवस्थित न दिल्याने अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. तसेच अनेक शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन शेतजमीनीचे सर्कल व तलाठ्याने पंचनामे न करता शेतकर्‍यांकडूनच फोटो व माहिती मागून घेऊन अर्धवट माहिती  आपल्या महसुल अधिकार्‍यांनी शासनाकडे पाठविली. आपल्या महसुल अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळेच अनेक शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.अनेक शेतकर्‍यांनी आमच्याकडे  तक्रार केले आहे. आपण स्वत: पुढाकार घेऊन सर्व शेतकर्‍यांशी संवाद साधून खरच महसुल अधिकारी शेतकर्‍यांच्या बांधवर जाऊन पंचनामा केला की नाही याची खातरजमा करुन दोषी आढळणार्‍या अधिकार्‍यांवर कर्तव्यात कसुरु केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात यावी. जेणे करुन यापुढे कामात कामचुकारपना होणार नाही व आपला अन्नदाता शेतकर्‍यांवर कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही अशी काळजी यापुढे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी घ्यावी असेही मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे   . आमच्या निवेदनाची दखल घेऊन श्रीरामपूर तालुक्यातील सर्व शेतकर्‍यांना त्वरीत अनुदान (मदत) देण्यात यावे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा  मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी दिला आहे , याप्रसंगी बाबासाहेब शिंदे मनसे जिल्हाध्यक्ष,विलास पाटणी,मनसे उपजिल्हाध्यक्ष,

  गणेश दिवसे मनसे तालुकाध्यक्ष,

सतिश कुदळे मनसे शहराध्यक्ष, संतोष धुमाळ प्रसिद्धीप्रमुख डॉक्टर संजय नवथर, भास्कर सरोदे,नितीन जाधव, ऋषभ बर्वे प्रसाद परे, अमोल साबणे, संदीप विशमबर सुरेश शिंदे, दीपक सोनवणे,राजू जगताप, सुरेश शिंदे, विकी परदेसी, नितीन खरे, मारुती शिंदे, आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget