उक्कलगावात प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीचे जल्लोषात स्वागत
बेलापुर (प्रतिनिधी )- अनुगामी लोकराज्य महाभियान अर्थात अनुलोम संस्थेच्या माध्यमातून राज्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असुन येत्या २२ तारखेला आयोध्देत होणाऱ्या सोहळ्याचे औचित्य साधुन श्रीरामपुर तालुक्यात प्रभू श्रीरामचंद्राच्या एकुण ३२ मूर्तीचे वाटप करण्यात येणार असुन उक्कलगाव येथील वस्ती मित्र शाम नागरे यांना सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगीरीजी महाराज यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची मूर्ती प्रदान करण्यात आली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतुन अनुलोम संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजीक उपक्रम राबविण्यात येत असुन येत्या २२ जानेवारीला आयोध्येत प्रभू श्रीराम चंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे .त्याच धर्तीवर अनुलोम संस्थेच्या सहकार्याने राज्यात प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीचे वितरण करण्यात आले श्रीरामपुर तालुक्यातील उक्कलगाव येथील वस्ती मित्र शाम नागरे यांना प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचे मठाधिपती महंत रामगीरीजी महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले श्रीरामपुर तालुक्यातील उक्कलगाव येथील नागरे परिवाराला हा बहुमान मिळाला महंत रामगीरीजी महाराज यांच्या हस्ते नागरे परिवारातील सामाजिक कार्यकर्ते शाम नागरे व मुकुंद नागरे यांना मूर्ती प्रदान करण्यात आली उक्कलगाव येथे सडा रांगोळी काढुन वाजत गाजत प्रभू श्रीरामाची मूर्ती नागरे यांच्या निवासस्थानी आणण्यात आली या वेळी अनुलोम संस्थेच्या सौ सुनंदा आदिक यांच्या हस्ते विधीवत पुजा करुन मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली या वेळी राज्याचे उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाम नागरे यांना पाठविलेल्या पत्राचे वाचन करण्यात आले या वेळी उक्कलगावच्या लोकनियुक्त महीला सरपंच कु. रविना शिंदे उक्कलगाव ग्रामपंचायत सदस्य दिलीप थोरात, अनिल जनार्धन थोरात, रविंद्र जगधने, पत्रकार शरद थोरात, परशुराम आदिक ,हरिहर केशव गोविंद मंदिराचे पुजारी अरविंद तांबे, विनायक तांबे ,सोपान पगारे, मधुकर पुजारी, सुरेश मुसमाडे ,शुभम जगधने, केसापुर येथील डोखे, श्री शिव प्रतिष्ठाण हिंदुस्थान उक्कलगावचे मावळे, श्री हरिहर भजनी मंडळ तसेच उक्कलगावचे ग्रामस्थ उपस्थित होते या वेळी अनुलोम संस्थेच्या सौ सुनंदा आदिक यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार देविदास देसाई यांनी केले तर ग्रामपंचायत सदस्य दिलीप थोरात यांनी आभार मानले
Post a Comment