पिंच्याक सिलाट हा खेळ इंडोनेशियन मार्शल आर्टचा प्रकार असून १) स्टॅंडिंग २) तुंगल ( सिंगल काता) ३) रेगु ( ग्रुप काता ) ४) गंडा ( डेमो फाईट ) ५) सोलो ( क्रिएटिव्हिटी ) या पाच प्रकारात खेळला जातो.हा खेळ भारतीय क्रीडा मंत्रालय, 5% नोकरी आरक्षण , युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार, भारतीय विश्वविद्यालय संघ, अखिल भारतीय पोलीस खेळ नियंत्रण बोर्ड , ऑलम्पिक कौन्सिल ऑफ एशिया , एशियन गेम , एशियन मार्शल आर्ट गेम , एशियन युथ गेम व एशियन बीच गेम , राष्ट्रकुल स्पर्धा अशा ऑफिसियल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळला जातो . या स्पर्धेचे मुख्य अतिथी व आयोजक नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री गणेश शिंदे यांनी खेळाडूंना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देऊन खेळातून खेळाडूंचे नक्कीच उज्वल भविष्य निर्माण होऊ शकते , व खेळाडूंचे मानसिक व शारीरिक आरोग्य राखण्यास मदत मिळू शकते असे मोलाचे मार्गदर्शन केले. स्प
र्धा संपन्न करण्यासाठी संस्कार स्पोर्ट्स क्लबचे मुख्य प्रशिक्षक तसेच अहमदनगर असोसिएशनचे अध्यक्ष श्री प्रवीण कुदळे, राष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक नरेंद्र कुदळे, राष्ट्रीय खेळाडू राधिका खरात, कल्याणी भोसले, नारायण झांबरे, प्रशिक्षक श्री चेतन खावडिया संस्कार स्पोर्ट्स क्लबचे सर्वच खेळाडू, नगरपालिकेच्या ग्रंथपाल कुमारी स्वाती पुरे , स्वप्नील चव्हाण, इत्यादींनी यांनी परिश्रम घेतले.
सर्व यशस्वी खेळाडूंना राजकीय सामाजिक क्रीडा व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
Post a Comment