५१ वे कोपरगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल घवघवीत यश..
कोपरगाव( गौरव डेंगळे) : कोळपेवाडी येथील राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर येथे दि २ ते ४ जानेवारी रोजी ५१ वे कोपरगाव तालुकास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शन संपन्न झाले. श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल येथील इयत्ता दहावीचा विद्यार्थीनी कुमारी मृणाल नीरज डंबिर हिने इयत्ता ९ ते १२ या गटांमध्ये गणित प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक पटकावला व जिल्हास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनासाठी पात्र ठरली आहे.मृणालला विज्ञान चे शिक्षक नारायण गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल मृणालचे शाळेचे प्राचार्य श्री के एल वाकचौरे,उपप्राचार्या शुभांगी अमृतकर,प्रज्ञा पहाडे,पल्लवी ससाणे,नैथिलिन फर्नांडिस, रणजीत खळेअर्चना गायकवाड, रूपाली भोरकडे,स्वरूपा वडांगळे आदींनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
Post a Comment