Latest Post

नेवासा (गौरव डेंगळे):येथील रोजलँड इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये दिनांक २८,२९ व  ३० डिसेंबर दरम्यान वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे.या महोत्सवाचे उद्‍घाटन क्रीडा प्रशिक्षक श्री सुरेश लव्हाटे, व्हॉलिबॉल प्रशिक्षक श्री पापा शेख यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री भाऊसाहेब अंबाडे पाटील यांनी शालेय क्रीडा क्षेत्राचा आढावा सादर केला.या वेळी सुरेश लव्हाटे 

 यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना खेळाविषयी मार्गदर्शन करून खेळाचे महत्त्व पटवून दिले. तसेच, खेळातून होत असलेल्या व्यायामामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होत असल्याचे सांगितले. उद्घाटन कार्यक्रमावेळी राज्य,जिल्हा, विभाग पातळीवर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खेळाडूंनी क्रीडा ज्योत प्रांगणात मिरवली.या वेळी स्पर्धकांनी स्पर्धेपूर्वी खेळाविषयी शपथ घेतली.या तीन दिवसीय वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये व्हॉलीबॉल,क्रिकेट,कबड्डी,खो-खो,१०० मीटर धावणे,२०० मीटर धावणे,४०० मीटर धावणे,लांब उडी,रस्सीखेच अशा विविध स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे.या वेळी संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब अंबाडे पाटील, सदस्या निकिता दिपक अंबाडे, रूपाली अजित अंबाडे,शाळेचे प्राचार्य हेमंत सोलंकी, सुनिलकुमार जैन

तसेच शिक्षक-शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते.

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-सार्वजनिक व सामाजिक क्षेञात कार्य करणाऱ्या  व्यक्तींना काही अन्यायकारक घडले तर पोलिस स्टेशनला जावेच लागते.अशाच एका प्रकरणी भाजपचे सुनिल मुथ्था व आप पक्षाचे तिलक डुंगरवाल काही कार्यकर्त्यांसह शहर पोलिस स्टेशनला गेले असता काही समाजकंटकांनी त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकविण्यचा प्रयत्न केला.माञ सर्वपक्षिय नेते व सामाजिक संघटनांनी संघटीतपणे विरोध करुन समाजकंटकांचा डाव उधळून लावला. याची सर्वदूर चर्चा होत आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,एका प्रकरणी महिलेने खोटी फिर्याद दाखल करुन प्राॕपर्टी बळकाविण्याचा प्रयत्न केला.हे समजताच सुनिल मुथ्था व तिलक डुंगरवाल हे  शहर पोलिस स्टेशनला गेले.तेथे पोलिसांना वस्तुस्थिती विशद केली.माञ काही समाजकंटकांनी सदर महिलेला चुकीचा सल्ला देवून संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांवर विनयभंगाची खोटी केस दाखल करायला सांगीतले.तथापि, पोलिस तपासात सदर केस खोटी व हेतूप्रेरीत असल्याचे निष्पन्न झाले.  खोटी केस दाखल केल्याची कुणकुण लागताच माजी आ.भाऊसाहेब कांबळे, सिध्दार्थ मुरकुटे ,काँग्रेसचे करण ससाणे,आशिष धनवटे,राजेंद्र सोनवणे,रितेश एडके,रियाज पठाण,अनितीन दिनकर,दिपक पटारे,प्रकाश चित्ते,संजय पांडे,रुपेश हरकल,शंतनु फोपसे,अतुल वढणे,दत्ता जाधव ,अमजद पठाण,शाकिर शेख,शिवसेनेचे  सचिन बडधे, लाखान भगत,निखिल पवार,संजय छल्लारे,अशोक थोरे,रमेश घुले,सुनिल फुलारे,रोहित भोसले,तेजस बोरावके,आम आदमी पक्षाचे विकास डेंगळे,राहुल रणपिसे,प्रवीण जमदाडे,अक्षय कुमावत,भरत डेंगळे,श्रीराम दळवी,श्रीधर कारले,डाॕ.सचिन थोरात,डाॕ.प्रविण राठोड,भैरव मोरे,प्रविण काळे,प्रशांत बागुल,राजमोहंमद शेख,बी.एम.पवार,आर.पी.आय.चे सुरेन्द्र थोरात,सुभाष ञिभूवन,संदीप मगर,राष्ट्रवादीचे अजयभाऊ डाकले,शिवप्रहारचे चंद्रकांत आगे,वंचितचे चरण ञिभूवन,मनसेचे बाबा शिंदे,व्यापारी असोसिएशनचे राहुल मुथ्था,मुन्ना झंवर,गौतम उपाध्ये,बाळासाहेब खाबिया,कल्याण कुंकुलोळ,स्वप्नील चोरडीया,भाग्येश चोरडीया,अनुप लोढा, सामाजिक कार्यकर्ते संजय गांगड,चंद्रकांत सगम,नाना गांगड,संकेत संचेती,युवराज घोरपडे,मुबारक शेख,प्रसाद कटके,चेतन बोगे,संदेश मेहेर,आकाश निकाळजे,निलेश गिते,तेजस उंडे  आदी सर्व पक्षीय नेते,विविध संघटनांचे कार्यकर्ते पोलिस स्टेशनला जमले.त्यांनी समाजकंटकांना पोलिसांनी थारा देवू नये अशी मागणी केली.सामाजिक व सार्वजनिक क्षेञातील कार्यकर्त्यांवर असे खोटे गुन्हे दाखल करुन दबाव आणणे उचित नाही.त्यामुळे शहनीशा व खातरजमा केल्याशिवाय पोलिसांनीही अशा खोट्या केसची दखल घेवू नये.दरम्यान जिल्हा पोलिस आधिक्षक राकेश ओलांशी संपर्क केला गेला.त्यांना या प्रकरणाची सविस्तर  माहिती देण्यात आली.त्यावर श्री.ओला यांनी खातरजमा केल्याशिवाय कोणतीही कारवाई करु नये अशा सूचना दिल्या.यावार पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी या वेळी ताक्रारीची  शहानिशा केल्याशिवाय नोंद घेतली  जाणार नाही तसेच फिर्याद खोटी निघाल्यास संबंधितावर गुन्हा दाखल केला जाईल  असे आश्वासन दिले.त्यामुळे खोट्या गुन्ह्याता .मुथ्था व .डुंगरवाल यांना अडकविण्याचा समाज कंटकाचा डाव उधळला गेला.

केशव गायकवाड स्पर्धेतील सर्वोत्तम सेंटरनादेड (गौरव डेंगळे): स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड येथे पश्चिम विभागीय मुलांची व्हॉलीबॉल स्पर्धा दिनांक १४ ते १८ डिसेंबर २०२३ पर्यंत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र,मध्यप्रदेश,गुजरात,राजस्थान  या राज्यातील १०० विद्यापीठांनी सहभाग नोंदवला होता.पुण्याच्या भारतीय विद्यापीठ संघाने या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत पश्चिम विभागीय स्पर्धेचं उपविजेतेपद मिळवून अखिल भारतीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी संघ पात्र ठरला आहे. स्पर्धेमध्ये भारतीय विद्यापीठाचा खेळाडू केशव गायकवाड स्पर्धेतील सर्वोत्तम सेंटर ठरला आहे.भारतीय विद्यापीठाने आपल्या पहिल्या सामन्यांमध्ये मुंबई विद्यापीठाचा

३-०(२५-१८,२५-२० व २५-१९) ने पराभव केला.दुसऱ्या सामन्यांमध्ये भारतीय विद्यापीठ संघाने श्री कुशदास विधापीठ हनुमानगड संघाचा देखील ३-० (२५-११,२५-२३ व २५-२१ ने  पराभव केला. स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यांमध्ये भारतीय विद्यापीठला LNIPE ग्वाल्हेर विद्यापीठ संघाकडून १-३ (१८-२५,१९-२५,२५-२२ व २४-२६) ने पराभव पत्करावा लागला.भारतीय विद्यापीठ संघाने आपल्या चौथ्या सामन्यांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर संघाचा ३-०(२५-१७,२५-१४ व २५-१५) ने पराभव करून पश्चिम विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकावले. स्पर्धेत कर्णधार केशव गायकवाड सह,आदित्य कुडपणे,साईराज बांदल, लक्ष्मी नारायण, प्रणव चिकणे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.उपविजेत्या संघाला राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक डॉ संतोष पवार व शिवाजी जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.उपविजेत्या संघाचे डॉ नेताजी जाधव क्रीडा संचालक भारती विद्यापीठ पुणे, डॉ स्वप्निल विधाते प्राचार्य, शारीरिक शिक्षण महाविद्यालय भारती विद्यापीठ,पुणे तसेच सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

बेलापुर (प्रतिनिधी  )- बेलापुर ग्रामपंचायत सदस्या सविता उत्तम अमोलीक याच्या जातवैधता प्रमाणपत्रावर बेलापुरचे सरपंच महेंद्र साळवी व किरण साळवी यांनी हराकत घेतली असुन या बाबत औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल करण्यात आली होती त्या नुसार दिनांक २० डिसेंबर रोजी सविता अमोलीक यांनी जातपडताळणी कार्यालयात हजर राहुन म्हणणे सादर करण्याची नोटीस बजावण्यात आलेली आहे                             या बाबत बेलापुरचे सरपंच महेंद्र साळवी यांनी स्वाती अमोलीक या ख्रीस्त असुन चुकीच्या कागदपत्राच्या अधारे जातपडताळणी प्रमाणपत्र घेवुन शासकीय राजकीय तसेच आर्थिक फायदे घेत असल्यामुळे त्यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र रद्द करावे अशी मागणी जातपडताळणी कार्यालयाकडे केली होती परंतु त्यांच्या अर्जाची दखल न घेतल्यामुळे सरपंच महेंद्र साळवी यांनी औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली होती त्या याचिकेत सविता अमोलिक यांचा बापतिस्मा बेलापुर येथील सेंट पिटर चर्च येथे झाला आसुन पिटर पी पी ओहोळ यांनी तिचा बापतिस्मा केला होता तसेच अमोलीक यांनी गेल्या चार ते पाच पिढ्यापासुन ख्रीस्त धर्म स्वीकारला असुन त्यांचा परिवार ख्रीस्त धर्माचे तंतोतंत पालन करत आसल्याचे  औरंगाबाद खंडपिठात दाखल केलेल्या खाचिकेत साळवी यांनी म्हटले असुन तसे पुरावे त्यांनी सोबत जोडले होते त्या अनुषंगाने मा उच्च न्यायालयाने सविता आमोलीक यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे आदेश पडताळणी समितीला दिले होते त्यामुळे संशोधन अधिकारी तथा सदस्य जिल्हा जाती पडताळणी समिती अहमदनगर यांनी सविता आमोलीक यांना नोटीस बजावली असुन त्यात म्हटले आहे की उच्च न्यायालयात दाखल रिट याचिका क्रमांक 14632/2023 नुसार उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आपले महार या जातीदाव्याचे प्रकरण समितीकडे फेरपडताळणीसाठी प्राप्त झाले आसुन समितीने सदर प्रकरणामध्ये सुनावणी घेण्याचे ठरविले आहे त्या अनुषंगाने जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समीती अहमदनगर कार्यालयात आपणास सुनावणीसाठी दिनांक २० डिसेंबर २०२३ रोजी उपस्थित राहुन खूलासा सादर करावा आपण सुनावणीस उपस्थित न राहील्यास आपले जाती दावा प्रकरणात समीती उपलब्ध कागदपत्राच्या अधारे निर्णय घेईल असेही नोटीसमध्ये नमुद करण्यात आले आहे बेलापुर ग्रामपंचायतीमध्ये गेल्या काही दिवसापासून राजकीय घडामोडी घडत आहेत काही महीन्यापूर्वी सरपंच साळवी यांनी  अचानक गावकरी मंडळाशी काडीमोड घेत बाजार समितीचे सभापती सुधीर नवले रविंद्र खटोड गटाशी हातमिळवणी केली त्यानंतर गावकरी मंडळाचे नेते दोनच दिवसात साळवी यांना स्वगृही आणण्यात यशस्वी झाले होते त्या वेळी मोठ्या प्रामाणात फटाक्याची अतिषबाजी करण्यात आली होती माझा बुद्धीभेद झाला असा दावा साळवी यांनी त्या वेळी केला होता त्या नंतरकाही दिवसात राजीनामा देतो असे साळवी यांनी सांगितले होते परंतु पुढे त्यांनी राजीनामा देण्याचे टाळले त्यामुळे बरीच वादावादी झाली अनेक वेळा सत्ताधारी तर कधी विरोधक सत्ताधारी अशा बैठका पार पडल्या पण फलीत काहीच निघाले नाही साळवी राजीनामा न देण्याच्या निर्णयावर ठाम राहीले सरपंच साळवी यांनी राजीनामा न दिल्यामुळे राजीनाम्याचा चेंडू पालकमंत्री नामदार विखे पाटील यांच्या दालनात गेला त्यानंतर सरपंच साळवी यांची चौकशी मा जिल्हाधिकारी यांचेसमोर सुरु होती ती आता पुर्ण झाली असुन केव्हाही त्या बाबत निकाल येवू शकतो आपल्यावर अपात्रतेची कुऱ्हाड कोसळणारच आहे हे लक्षात घेवुन साळवी यांनी न्यायालयात धाव घेतली आहे स्वाती आमोलीक या भावी सरपंच पदाच्या दावेदार आहेत जि प सदस्य शरद नवले यांच्या त्या कट्टर समर्थक आहेत  त्यामुळे आता जातपडताळणी समीती काय निर्णय देते यावर पुढील आकडेवारीचा मेळ घालुन ग्रामपंचायतीत खेळ सुरु राहाणार आहे

कोपरगाव (प्रतिनिधी):तेजस फाऊंडेशन,नाशिक या नोंदणीकृत सामाजिक संस्थेच्या वतीने गतवर्षा प्रमाणे या ही वर्षी समाजातील सामाजिक,शैक्षणीक साहित्यिक,कला,क्रीडा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या गुणवंत व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.हा पुरस्कार वितरण सोहळा दि.१४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता कर्जत, जि रायगड या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.

कोपरगाव येथील शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचे ज्येष्ठ क्रीडाशिक्षक श्री धनंजय बाबुराव देवकर यांना २०२४ चा राज्यस्तरीय क्रीडाभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. श्री देवकर यांनी मागील ३० वर्षापासून क्रीडा क्षेत्रामध्ये मोठे योगदान दिले असून त्यांनी तयार केलेले खेळाडू राष्ट्रीय,राज्य,विभागीय स्पर्धेमध्ये चमकले आहेत. यापूर्वीही देवकर यांना दुधारे फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार तसेच उत्तर महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार मिळालेला आहे. राज्यस्तरीय क्रीडाभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री देवकर यांचे प्राचार्य के.एल.वाकचौरे,मंगेश गायकवाड,साईनाथ चाबुकस्वार,नारायण गाडेकर,गणेश वाघ,गणेश मलिक,सुहास गगे ,भिकाजी तुकरणे,मच्छिंद्र ननवरे,महेश मोरे, विशाल अल्हाट,पब्लिक रिलेशन ऑफिसर दत्ता सांगळे,कार्यालयीन अधीक्षक किरण सांगळे तसेच शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.



श्रीरामपुर (प्रतिनिधी): दिनांक १९ डिसेंबर ते २१ डिसेंबर दरम्यान कोलकत्ता पश्चिम बंगाल येथे १९ वर्षाखालील मुला-मुलींच्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सेंट तेरेझा गर्ल्स हायस्कूल हरेगाव,श्रीरामपूरचे नितीन बलराज यांची महाराष्ट्र राज्य योगासन संघाच्या संघ व्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.मागील १० ते १२ वर्षा पासून श्रीरामपुर क्रीडा क्षेत्रात बलराज यांची भरीव कामगिरी आहे तसेच विविध खेळाचा त्यांना दाडगा अनुभव असुन या अनुभवाचा महाराष्ट्राच्या संघाला निश्चित फायदा होईल व राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघ पदक प्राप्त करेल अशी खात्री आहे.निवड झाल्याबद्दल बलराज यांचे क्रीडा व युवा संचालनालय,महाराष्ट्र राज्याचे संचालक श्री अनिल चोरमुले,उपसंचालक श्री उदय जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री दिलीप दिघे,पार्थ दोशी,मुख्याध्यापिका सिस्टर ज्योती गजभिव,राजेंद्र कोहकडे,

गौरव डेंगळे,प्रशांत होन आदीनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

कोपरगाव ( गौरव डेंगळे):क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी अहमदनगर आयोजित शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये १४ वर्षे वयोगटात शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचा हर्षल लंगोटे जिल्हास्तरीय ताइक्वांडो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.दिनांक ६ व ७ डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर वाडिया पार्क येथे जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.जिल्ह्याभरातून १०० पेक्षा अधिक शालेय खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.हर्षलला कराटे प्रशिक्षिका वर्षा देठे यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल हर्षलचे शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य श्री के एल वाकचौरे तसेच सर्व शिक्षक वृंदांनी अभिनंदन केलं व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget