बेलापुर ग्रामपंचायत सदस्या स्वाती अमोलीक यांना जातपडताळणी समितीची नोटीस
बेलापुर (प्रतिनिधी )- बेलापुर ग्रामपंचायत सदस्या सविता उत्तम अमोलीक याच्या जातवैधता प्रमाणपत्रावर बेलापुरचे सरपंच महेंद्र साळवी व किरण साळवी यांनी हराकत घेतली असुन या बाबत औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल करण्यात आली होती त्या नुसार दिनांक २० डिसेंबर रोजी सविता अमोलीक यांनी जातपडताळणी कार्यालयात हजर राहुन म्हणणे सादर करण्याची नोटीस बजावण्यात आलेली आहे या बाबत बेलापुरचे सरपंच महेंद्र साळवी यांनी स्वाती अमोलीक या ख्रीस्त असुन चुकीच्या कागदपत्राच्या अधारे जातपडताळणी प्रमाणपत्र घेवुन शासकीय राजकीय तसेच आर्थिक फायदे घेत असल्यामुळे त्यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र रद्द करावे अशी मागणी जातपडताळणी कार्यालयाकडे केली होती परंतु त्यांच्या अर्जाची दखल न घेतल्यामुळे सरपंच महेंद्र साळवी यांनी औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली होती त्या याचिकेत सविता अमोलिक यांचा बापतिस्मा बेलापुर येथील सेंट पिटर चर्च येथे झाला आसुन पिटर पी पी ओहोळ यांनी तिचा बापतिस्मा केला होता तसेच अमोलीक यांनी गेल्या चार ते पाच पिढ्यापासुन ख्रीस्त धर्म स्वीकारला असुन त्यांचा परिवार ख्रीस्त धर्माचे तंतोतंत पालन करत आसल्याचे औरंगाबाद खंडपिठात दाखल केलेल्या खाचिकेत साळवी यांनी म्हटले असुन तसे पुरावे त्यांनी सोबत जोडले होते त्या अनुषंगाने मा उच्च न्यायालयाने सविता आमोलीक यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे आदेश पडताळणी समितीला दिले होते त्यामुळे संशोधन अधिकारी तथा सदस्य जिल्हा जाती पडताळणी समिती अहमदनगर यांनी सविता आमोलीक यांना नोटीस बजावली असुन त्यात म्हटले आहे की उच्च न्यायालयात दाखल रिट याचिका क्रमांक 14632/2023 नुसार उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आपले महार या जातीदाव्याचे प्रकरण समितीकडे फेरपडताळणीसाठी प्राप्त झाले आसुन समितीने सदर प्रकरणामध्ये सुनावणी घेण्याचे ठरविले आहे त्या अनुषंगाने जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समीती अहमदनगर कार्यालयात आपणास सुनावणीसाठी दिनांक २० डिसेंबर २०२३ रोजी उपस्थित राहुन खूलासा सादर करावा आपण सुनावणीस उपस्थित न राहील्यास आपले जाती दावा प्रकरणात समीती उपलब्ध कागदपत्राच्या अधारे निर्णय घेईल असेही नोटीसमध्ये नमुद करण्यात आले आहे बेलापुर ग्रामपंचायतीमध्ये गेल्या काही दिवसापासून राजकीय घडामोडी घडत आहेत काही महीन्यापूर्वी सरपंच साळवी यांनी अचानक गावकरी मंडळाशी काडीमोड घेत बाजार समितीचे सभापती सुधीर नवले रविंद्र खटोड गटाशी हातमिळवणी केली त्यानंतर गावकरी मंडळाचे नेते दोनच दिवसात साळवी यांना स्वगृही आणण्यात यशस्वी झाले होते त्या वेळी मोठ्या प्रामाणात फटाक्याची अतिषबाजी करण्यात आली होती माझा बुद्धीभेद झाला असा दावा साळवी यांनी त्या वेळी केला होता त्या नंतरकाही दिवसात राजीनामा देतो असे साळवी यांनी सांगितले होते परंतु पुढे त्यांनी राजीनामा देण्याचे टाळले त्यामुळे बरीच वादावादी झाली अनेक वेळा सत्ताधारी तर कधी विरोधक सत्ताधारी अशा बैठका पार पडल्या पण फलीत काहीच निघाले नाही साळवी राजीनामा न देण्याच्या निर्णयावर ठाम राहीले सरपंच साळवी यांनी राजीनामा न दिल्यामुळे राजीनाम्याचा चेंडू पालकमंत्री नामदार विखे पाटील यांच्या दालनात गेला त्यानंतर सरपंच साळवी यांची चौकशी मा जिल्हाधिकारी यांचेसमोर सुरु होती ती आता पुर्ण झाली असुन केव्हाही त्या बाबत निकाल येवू शकतो आपल्यावर अपात्रतेची कुऱ्हाड कोसळणारच आहे हे लक्षात घेवुन साळवी यांनी न्यायालयात धाव घेतली आहे स्वाती आमोलीक या भावी सरपंच पदाच्या दावेदार आहेत जि प सदस्य शरद नवले यांच्या त्या कट्टर समर्थक आहेत त्यामुळे आता जातपडताळणी समीती काय निर्णय देते यावर पुढील आकडेवारीचा मेळ घालुन ग्रामपंचायतीत खेळ सुरु राहाणार आहे