कोपरगावचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक धनंजय देवकर यांना राज्यस्तरीय क्रीडाभूषण पुरस्कार जाहीर.
कोपरगाव येथील शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचे ज्येष्ठ क्रीडाशिक्षक श्री धनंजय बाबुराव देवकर यांना २०२४ चा राज्यस्तरीय क्रीडाभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. श्री देवकर यांनी मागील ३० वर्षापासून क्रीडा क्षेत्रामध्ये मोठे योगदान दिले असून त्यांनी तयार केलेले खेळाडू राष्ट्रीय,राज्य,विभागीय स्पर्धेमध्ये चमकले आहेत. यापूर्वीही देवकर यांना दुधारे फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार तसेच उत्तर महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार मिळालेला आहे. राज्यस्तरीय क्रीडाभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री देवकर यांचे प्राचार्य के.एल.वाकचौरे,मंगेश गायकवाड,साईनाथ चाबुकस्वार,नारायण गाडेकर,गणेश वाघ,गणेश मलिक,सुहास गगे ,भिकाजी तुकरणे,मच्छिंद्र ननवरे,महेश मोरे, विशाल अल्हाट,पब्लिक रिलेशन ऑफिसर दत्ता सांगळे,कार्यालयीन अधीक्षक किरण सांगळे तसेच शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.