Latest Post


बेलापुर  (प्रतिनिधी  )- बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्था ही श्रीरामपुर तालुक्यातील सर्वात मोठी  संस्था असुन संचालक मंडळाने पारदर्शी व काटकसरीने कारभार केल्यामुळे या ही वर्षी सभासदांना १५ % लांभाश व दहा किलो साखर तसेच मिठाई भेट देणे शक्य झाले असल्याची माहीती श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले यांनी दिली .         दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी बेलापुर  विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने  ९०० सभासदांना १५% लाभांश तसेच दिवाळी भेट म्हणून १० किलो साखर व मिठाई भेट  देण्याचा कार्यक्रम नुकताच संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाला त्या वेळी नवले यांनी वरील माहीती दिली . या वेळी बोलताना संस्थेचे चेअरमन शेषराव पवार म्हणाले की तालुक्यात चांगला ,स्वच्छ कारभार असणारी ही संस्था असुन विरोधकांनी सत्तेचा दुरुपयोग करुन संचालक मंडळावर अनेक आरोप केले परंतु संचालक मंडळावर केलेले आरोप हे राजकीय हेतूने करण्यात आलेले होते संस्थेचा कारभार चोख असल्यामुळे सभासदांना लाभांश देता आला असेही पवार म्हणाले या वेळी माजी सरपंच भरत साळूंके पत्रकार देविदास देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले .या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक, जनता अघाडीचे अध्यक्ष रविंद्र खटोड ,शिवाजी वाबळे, विलास मेहेत्रे ,राजेंद्र सातभाई,  व्हा चेअरमन विश्वनाथ गवते, पत्रकार अशोक गाडेकर,  प्रकाश कुर्हे ,नंदकिशोर नवले, चंद्रकांत नाईक , ज्ञानदेव वाबळे, त्रिंबक कुर्हे अयाजअली सय्यद भगवान सोनवणे ,संजय रासकर, विजय कुर्हे, अशोक कुर्हे,  किशोर नवले, पंडीतराव बोंबले ,अशोक राशिनकर, सुहास शेलार ,दिलीप दायमा ,प्रसाद खरात,  संजय नवले, अंतोन अमोलीक, आदिसह सभासद उपस्थित होते

बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्रीरामपुर तालुक्यात सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या बेलापुर गावाला ऐन सणासुदीच्या काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागत असुन पिण्याच्या पाण्याचे रोटेशन तातडीने सोडण्यात यावे अशी मागणी बेलापुर ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांनी केली आहे                   बेलापुर गावची लोकसंख्या जवळपास तीस हजाराच्या घरात गेली असुन गावाला पाणी पुरवठा करणारी तीनही साठवण तळी रिकामी झालेली आहेत लवकर पिण्याच्या पाण्याचे रोटेशन आले नाही तर ऐन दिवाळीच्या तोंडावर गावाला भिषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे .बेलापुरला पाणी टंचाईचा सामना करावा लागणार हे लक्षात घेवुन गावातील सर्वपक्षीय नेतेमंडळी ग्रामपंचायत कार्यालयात जमा झाली .पाणी टंचाईचा सामना कसा करावा? या विषयावर चर्चा करण्यात आली. सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे ,बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले, ग्रामपंचायत सदस्य व खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड, सदस्य भरत साळूंके, रमेश अमोलीक ,मुस्ताक शेख,शफिक बागवान,गोपी दाणी,वैभव कुर्हे  शफीक बागवान, पत्रकार देविदास देसाई, ग्रामविकास अधिकारी मेघशाम गायकवाड आदिंनी सहभाग घेतला या वेळी एका तळ्यात काही प्रमाणात पाणी शिल्लक असुन ते उचलुन मुख्य फौंटनला जोडल्यास काही प्रमाणात पाणी टंचाईची समस्या टाळता येईल असा निष्कर्ष चर्चेअंती निघाला .त्या वेळी सदस्य रविंद्र खटोड यांनी आपल्या कडील साडेसात एच पी ची मोटार तसेच जनरेटर देण्याचे मान्य केले बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले यांनीही आपल्या कडील दहा एच पी ची मोटार देण्याचे कबुल केले. गावाला भेडसावणाऱ्या पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी सत्ताधारी विरोधक एकत्र आले व पाणी टंचाईवर उपाय शोधला. या बद्दल पत्रकार देविदास देसाई यांनी सर्वांचे आभार मानले.बैठकीत ठरलेल्या उपाय योजने नुसार उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक, मुस्ताक शेख यांनी ग्रामपंचायतीच्या आरोग्य व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या मदतीने कार्यवाहीला सुरुवात केली.काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा .नाईक यांनी आमदार लहु कानडे यांच्याशी संपर्क करुन रोटेशन सोडण्याकरीता प्रयत्न करावेत अशी विनंती केली.                                   [ या वेळी बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले यांनी उपसरपंचाची खुर्ची रिकामी असल्याचे सांगितले त्यावर उपसरपंच अभिषेक खंडागळे म्हणाले की येथील खुर्ची रिकामी आहे तसेच बाजार समीतीच्या उपसभापतीचीही खुर्ची मोकळीच आहे यावर एकच हशा पिकला ]

राहुरी प्रतिनिधी,मिनाष पटेकर-गेल्या तीन दिवसांपासून राहुरी येथील तहसील कार्यालया समोर मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरु आहे. या उपोषणास पाठिंबा म्हणून आज आरपीआय आठवले गट, तालूका वकिल संघटना तसेच महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे मित्र मंडळ आदिवासी संघटनेच्या वतीने पाठिंबा देऊन निवेदन दिले. 

          आरपीआय च्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, मनोज जरांगे पाटील यांनी पुढाकार घेऊन राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठे आंदोलन उभे केले. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी निजामकालीन पुरावे सापडले आहेत. राज्य शासन मराठा समाजाला आरक्षण देण्याचे केवळ आश्वासन देत आहे. त्यामुळे सध्या आरक्षणासाठी तीव्र आंदोलने सुरु आहेत. मराठा आरक्षणचा मुद्दा न्यायालयात सक्षमपणे मांडणे गरजेचे आहे. खासदारांनी मराठा आरक्षणाचा मुद्या केंद्र शासनामध्ये प्रभावीपणे मांडुन आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आरपीआय मराठा समाजाच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व तालूकाध्यक्ष विलास साळवे यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपोषणाला पाठिंबा दिला. 

         तसेच राहुरी येथील वकिल संघटनेच्या वतीने उपोषणाला पाठिंबा देऊन मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झाल्यास विनामुल्य खटला चालवीण्याचे आश्वासन वकिल संघटेच्या वतीने देण्यात आले. तसेच महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे मित्र मंडळ व आदिवासी संघटनेच्या वतीने मराठा आंदोलनास पाठिंबा व्यक्त करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे, डाॅ. नारायण माळी आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मडगाव,गोवा(गौरव डेंगळे): येथील के एस सी आर क्रिकेट मैदानावर टी ट्वेंटी क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने १८ राज्यांचे निमंत्रित क्रिकेट स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे.

आज झालेल्या पहिल्या सामन्यात वरद कुंभकर्णच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने मध्य प्रदेशवर २२ धावांनी विजय मिळवला.नाणेफेक जिंकून मध्यप्रदेश संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.महाराष्ट्र संघाने निर्धारित १५ षटकांमध्ये ५ गडी बाद १०८ धावा फटकावल्या. महाराष्ट्र संघाकडून वरदने नाबाद २५,आरमने १७ धावा तर सर्वेशने १२ धावांचे योगदान दिले.मध्यप्रदेश संघाकडून राहुल व रोहितने १-१ गडी बाद केला.१०९ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मध्य प्रदेशचा संघ वरद व आराम यांच्या भेदक माऱ्यापुढे टिकाऊ धरू शकला नाही व संघ १२ षटकात ८६ धावांवर गारद झाला.वरद व आराम प्रत्येकी ३-३ गडी बाद केले तर मितांश व या दोन्ही प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

मध्यप्रदेश संघाकडून रोहितने सर्वाधिक १२ धावांची योगदान दिले.२५ धावा व ३ गडी बाद करणारा वरद सामन्याचा सामनामानकरी ठरला. साखळीतील दुसऱ्या सामनात महाराष्ट्राची गाठ पडेल ती बलाढ्य छत्तीसगड संघाबरोबर.

श्रीरामपूर प्रतिनिधी:ये

थील गोंधवणी रोड अत्यंत वर्दळीचा रस्ता असुन शहराच्या इतर रस्त्याच्या तुलनेत हा रस्ता तसा खुपच चिवळ देखील आहे.

या रस्त्यावर नेहमी प्रचंड प्रमाणात वाहतूक त्यात पाटाच्या पुलावर अनेक वाहन धारकांनी अनाधिकृत पार्किंग निर्माण केली असल्याने दररोजच अपघातांच्या घटना हे तसे नित्याचेच,म्हणाव्या लागेल.मात्र आज सकाळी ११:०० वाजेच्या दरम्यानं गोंधवणी रोड पाटाच्या पुलाजवळील कलगीधर हॉल शेजारी ,श्री.गुरुवाडा यांच्या घरासमोर एक सिमेंटचा ट्रक पलटी होता होता वाचला,सुदैवाने यात कोणतीच जीवीत हानी नाही

सदरील सिमेंट ट्रक मागे घेत असताना चक्क तो नगर पालिका जनरल गटार चेंबरमध्ये एक चाक गेल्याने ट्रक पलटी होता होता वाचला यात सुदैवाने कोणतीच जीवीत हानी झाली नाही हे एक चांगलच म्हणावे लागेल.

शहरात उघडे गटारीचे चेंबर्स आणी बेशिस्त वाहतूकीवर न राहिलेले शहर पोलिसांचे नियंत्रण अशी स्थिती असल्याने कारण 

याकडे संबंधित पोलिस यंत्रणा आणी नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांमधून नाराजगीचा सुर निघत आहे.

गौरव डेंगळे (पणजी):गोवा येथे संपन्न झालेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत,वेटलिफ्टिंग स्पर्धेत बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या खेळाडूंनी नेत्र दीपक कामगिरी केली. कु. कोमल वाकळे हिने ८७ किलो वजन गटात २०५ किलो वजन उचलून सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले तर कु. योगिता खेडकर हिने +८७ किलो वजन गटात १९८ किलो वजन उचलून महाराष्ट्र संघास कास्यपदक मिळवून दिले. भारताच्या प्रतिष्ठित असलेल्या या स्पर्धेत एकूण ४३ क्रीडाप्रकारात, २८ राज्य, ८ केंद्रशासित प्रदेशतील १० हजार खेळाडूंनी सहभाग घेतला. यशाबद्दल पाथर्डी तालुका वेटलिफ्टिंग असोसिएशनचे व पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव आव्हाड,  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.पी. ढाकणे, अहमदनगर जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुभाष देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, प्रा. संजय धोपावकर, रवींद्र सांगळे यांनी अभिनंदन केले. त्यांना जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव व महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विजय देशमुख यांचे  मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल जिल्ह्यातून खेळाडूंवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

बेलापुर - १५ वर्षीय अल्पवयीन हिंदू मुलीला मोबाईलवर नागडे फोटो पाठवणारा बेलापूरचा लिंगपिसाट,३२ वर्षीय योगेश साहेबराव पवार याच्यावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल…१५ वर्षीय अल्पवयीन हिंदू मुलीला मोबाईलवर नागडे फोटो पाठवणारा बेलापूरचा लिंगपिसाट,३२ वर्षीय योगेश साहेबराव पवार याच्यावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल…बेलापूर बुद्रुक गावातील एका हिंदुत्ववादी संघटनेचा प्रमुख म्हणून काम करणारा लिंगपिसाट,३२ वर्षीय आरोपी योगेश साहेबराव पवार,रा.नवले गल्ली,बेलापूर बुद्रुक,श्रीरामपूर याने १५ वर्षीय अल्पवयीन हिंदू मुलीला सहा महिन्यापासून पाठलाग करून,तिच्या मोबाईलवर स्वतःचे नागडे फोटो आरोपीने पाठवून अतिशय नीचपणे वर्तणुक करुन तिचा विनयभंग केला म्हणून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 1154/2023 प्रमाणे कलम 354-D,509,506 व पोक्सो कायद्यातील कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   या १५ वर्षीय अल्पवयीन हिंदू मुलीने पोलीसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,आरोपी योगेश साहेबराव पवार याने ०६ महिन्यापासून तिचा पाठलाग केला,तसेच २७ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास तिला मोबाईलवर इंस्टाग्रामच्या माध्यमातून आरोपीने स्वतःचे नागडे फोटो पाठवले,तसेच आरोपीने तू मला आवडतेस,आपण लग्न करू ,आपण रूम घेऊन भेटू ,तुझे कपडे काढलेले फोटो मला पाठव,मला तुझे ओपन फोटो पाठव असे म्हणत शरीरसुखाची मागणी केली.यावर या १५ वर्षीय अल्पवयीन हिंदू मुलीने नकार दिला असता आरोपी योगेश साहेबराव पवार तिला शिवीगाळ करून कोणाला काही सांगू नको,नाहीतर बघून घेण्याची तिला धमकी दिली.त्यानंतर मुलीने तिच्या वडिलांना आरोपी योगेश साहेबराव पवार याच्या कृत्यांबद्दल सांगितले.त्यानुसार मुलीच्या वडिलांनी,परिवाराने काल संध्याकाळी पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. 

  याबाबत १५ वर्षे अल्पवयीन हिंदू मुलीच्या वडिलांनी आम्हाला सांगितले की,३२ वर्षीय योगेश साहेबराव पवार हा व त्याचे सहकारी हे माझ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसह परिसरातील मुलींना नवरात्रीमध्ये दुर्गा माता दौड कार्यक्रमाला घेऊन जायचे.तसेच त्याने या मुलींना केरला स्टोरी पिक्चर दाखवण्यासाठी श्रीरामपूर शहरातील एका थिएटरमध्ये देखील त्याच्या मित्रांसह नेले होते.त्यावेळी योगेश साहेबराव पवार याचे बेलापुरातील व श्रीरामपुरातील मित्र उपस्थित होते. हिंदुत्वाचे काम असल्यामुळे मी माझ्या मुलीला त्याच्या सोबत जाऊ दिले.परंतु योगेश साहेबराव पवार या आरोपीने माझ्या अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेऊन असे अतिशय हीन व नीचपणाचे कृत्य केले आहे.   या प्रकरणी अशी धक्कादायक माहिती समजते की,श्रीरामपूर शहरातील काही संघटनेच्या लोकांनी व बेलापुरातील काही नेतेमंडळींनी या अल्पवयीन हिंदू मुलीच्या परिवारावर पोलीसात केस करु नका असा दबाव टाकला. जेणेकरून लिंग पिसाट योगेश साहेबराव पवार यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये व त्याचे काळे कृत्य जगासमोर येऊ नये.परंतू या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी आपल्या इज्जतीचा विषय असल्यामुळे या दबावाला जुमानले नाही व माघार घेतली नाही.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget