बेलापुरला पाणी पुरवठा करणारी तीनही तळी कोरडीठाक? पिण्याच्या पाण्याचे रोटेशन सोडण्याची मागणी
बेलापुर (प्रतिनिधी )-श्रीरामपुर तालुक्यात सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या बेलापुर गावाला ऐन सणासुदीच्या काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागत असुन पिण्याच्या पाण्याचे रोटेशन तातडीने सोडण्यात यावे अशी मागणी बेलापुर ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांनी केली आहे बेलापुर गावची लोकसंख्या जवळपास तीस हजाराच्या घरात गेली असुन गावाला पाणी पुरवठा करणारी तीनही साठवण तळी रिकामी झालेली आहेत लवकर पिण्याच्या पाण्याचे रोटेशन आले नाही तर ऐन दिवाळीच्या तोंडावर गावाला भिषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे .बेलापुरला पाणी टंचाईचा सामना करावा लागणार हे लक्षात घेवुन गावातील सर्वपक्षीय नेतेमंडळी ग्रामपंचायत कार्यालयात जमा झाली .पाणी टंचाईचा सामना कसा करावा? या विषयावर चर्चा करण्यात आली. सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे ,बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले, ग्रामपंचायत सदस्य व खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड, सदस्य भरत साळूंके, रमेश अमोलीक ,मुस्ताक शेख,शफिक बागवान,गोपी दाणी,वैभव कुर्हे शफीक बागवान, पत्रकार देविदास देसाई, ग्रामविकास अधिकारी मेघशाम गायकवाड आदिंनी सहभाग घेतला या वेळी एका तळ्यात काही प्रमाणात पाणी शिल्लक असुन ते उचलुन मुख्य फौंटनला जोडल्यास काही प्रमाणात पाणी टंचाईची समस्या टाळता येईल असा निष्कर्ष चर्चेअंती निघाला .त्या वेळी सदस्य रविंद्र खटोड यांनी आपल्या कडील साडेसात एच पी ची मोटार तसेच जनरेटर देण्याचे मान्य केले बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले यांनीही आपल्या कडील दहा एच पी ची मोटार देण्याचे कबुल केले. गावाला भेडसावणाऱ्या पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी सत्ताधारी विरोधक एकत्र आले व पाणी टंचाईवर उपाय शोधला. या बद्दल पत्रकार देविदास देसाई यांनी सर्वांचे आभार मानले.बैठकीत ठरलेल्या उपाय योजने नुसार उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक, मुस्ताक शेख यांनी ग्रामपंचायतीच्या आरोग्य व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या मदतीने कार्यवाहीला सुरुवात केली.काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा .नाईक यांनी आमदार लहु कानडे यांच्याशी संपर्क करुन रोटेशन सोडण्याकरीता प्रयत्न करावेत अशी विनंती केली. [ या वेळी बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले यांनी उपसरपंचाची खुर्ची रिकामी असल्याचे सांगितले त्यावर उपसरपंच अभिषेक खंडागळे म्हणाले की येथील खुर्ची रिकामी आहे तसेच बाजार समीतीच्या उपसभापतीचीही खुर्ची मोकळीच आहे यावर एकच हशा पिकला ]
Post a Comment